
महाराष्ट्राचे आराध्य दैवत,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे जन्मठिकाण असलेलं सिंदखेड राजा हे गांव. महाराष्ट्रातील पवित्र पैनगंगा नदीचे उगमस्थान असलेल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात येते.बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे. याच तालुक्यातील वडनेर भोलजी या गांवात देवाहुनही दैव आणि विश्वाहुनही वैश्विकतेचे वैदीकपण लाभलेल्या, एका अत्यंत गरीब कष्टाळू शेतमजूर मायबापाच्या पोटी जन्म घेतलेला सिद्धार्थ अर्थात सिद्धार्थ लक्ष्मीबाई अशोक तायडे
सिद्धार्थ म्हणजे बुद्ध,शिव,फुले,शाहू,आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारा, महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारा शेतमजूर,आंबेडकरी चळवळीत राहून निर्भीडपणे पत्रकारिता जोपासणारा युवा मुक्त पत्रकार,स्तंभलेखक होय.
आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतातील पडेल ते काम करत राब राब राबणारे सिद्धार्थ हे आपले पाय जमिनीवरच ठेऊन,शेती, माती,नाती आणि संस्कृती यावर मनापासून प्रेम करतात.
शेतमजुरी सोबत वाचन,मनन,चिंतन या छंदाद्वारे गगनाला गवसणी घालणारी चळवळ उभी करून, मागासलेल्या विचारांच्या माणसाला माणुसकीच्या प्रवाहात आणणारा मानवतावादी स्तंभ लेखक, मुक्त पत्रकार सिद्धार्थ. महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैनिक देशोन्नती अकोला,विश्वविजेता बुलढाणा, सहाय्यदैनिक, आज तक मलकापूर,प्रखर प्रहार खामगाव,रिपब्लिकन गार्ड नांदेड, मेहकर टाईप्स मेहकर, बालाघाटचा आवाज लातूर, दैनिक महावृत लातूर, दैनिक क्रांतीशस्त्र परभणी, या दैनिकांतून तसेच झुंजार लेखणी खामगाव, ठाणे वृत्तांत ठाणे, धम्मक्रांती खामगाव इत्यादी साप्ताहिक वृत्तपत्रांतून गेले सात ते आठ वर्षापासून स्तंभ लेखक म्हणून काम करत आहेत. जनता आणि नेता यांच्यातील दुवा म्हणून मुक्तपत्रकारिता करत असताना सामाजिक,राजकीय,कृषी,समाज प्रबोधनात्मक, विल्लेषणात्मक मुक्त लिखाण करणं हा त्यांचा मुक्तछंद असल्याचे त्यांच्या वास्तव सत्य परखड लिखाणातून प्रकर्षाने जाणवते.
स्वतः चा क्षुद्र स्वार्थ विसरुन केवळ परसेवेसाठी आणि परोपकारासाठी देह झिजवण्याची उच्चतम क्षमता सिद्धार्थ यांच्या नसानसांत भरलेली आहे. त्यामुळेच ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण कांहीतरी देणं लागतो या न्यायाने, स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन, स्व:कष्टाने कमावलेल्या पैश्यातील वीस टक्के हिस्सा ते आपल्या समाजातील अत्यंत गोरगरीब,निराधार, बेघर, अनाथ,उपेक्षित आणि वंचितांच्यासाठी सढळ हाताने खर्च करतात. सन २०२४ मध्ये रावेरा लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राम्हणे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या हाती “वोट भी देंगे और नोट भी देंगे” असा चळवळीमय नारा लावत दहा हजाराचा धनादेश सुपूर्द करतांना सिद्धार्थ यांच्यातील दानशूर कर्णाची प्रचिती आल्यावाचून रहात नाही.
कष्टकरी राबत्या हातात चळवळीची धारदार लेखणी घेऊन आपलं मत परखडपणे मांडणारे आणि त्याच हाताने मानव समाजातील दीन दुबळ्यांना मदतीचा हात देऊन, सामाजिक कार्यात सहभागी होऊन, सेवाभाव जोपासणारे सिद्धार्थ तायडे यांच्या अविस्मरणीय समाजसेवा कार्याची आणि निर्भीड पत्रकारितेची दखल घेऊन,आजअखेर महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कार बहाल केले आहेत.त्यापैकी प्रामुख्याने दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य संचलित… शारदा वृद्धसेवाश्रम, सांगली आणि कोल्हापूर यांचे वतीने सिद्धार्थ तायडे यांच्या सेवाकार्याची दखल घेऊन,पहिला “दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय निर्भिंड पत्रकारिता पुरस्कार २०२३” देऊन त्यांना गौरविण्यात आले.
त्यानंतर त्यांना पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता बीड, समाजरत्न दया भाई खराटे फाउंडेशन मलकापूरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान, संघर्ष नायक मीडिया कोल्हापूर च्या वतीने राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव, नालंदा बुद्ध विहार समिती वडनेर भोलजी यांचे वतीने गुणगौरव,तथागत फाउंडेशन मेहकर च्या वतीने “राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण, साऊज्योती सामाजिक संस्था पुणेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गौरव, जनहित फाउंडेशन मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार, परिवर्तन फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त राजश्री शाहू प्रेरणा राष्ट्रीय आणि पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव अश्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अश्या या अष्टपैलू, हरहुन्नरी मुक्त पत्रकाराचा, सामाजिक कार्यकर्त्याचा अर्थात सिध्दार्थ लक्ष्मीबाई अशोक तायडे यांचा आज जन्मदिवस.त्यांच्या पवित्र जन्मदिनानिमित्त…विश्वविधात्याच्या चरणी इतकेच मागणे मागेन की… सिद्धार्थ यांना प्रतापगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता, तसेच रायगडाची श्रीमंती आणि सह्याद्री सारखी उंची लाभो. तसेच विश्वविधाता त्यांना उदंड आयुष्य देवो,निरामय दीर्घायुष्य देवो, याच “महाप्रकट” दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देत,त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस, तसेच पत्रकारिता आणि सामाजिक कार्यास अभाळभर शुभेच्छ…!
■ शुभेच्छुक ■
साहित्यिक,समाजसेवक
हिंदरत्न डॉ.दिपक लोंढे व परिवार, सांगली.
संपर्क : 86 682 55 503

