
आई कुठे काय करते हे आपण वाचले असेलच.आता बाबा काय करतात ते वाचा. माझे बाबा म्हणजेच सागर रामभाऊ तायडे ह्यांचा ३ ऑक्टोबर रोजी ६४ वा वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने लिहावंसं वाटले. लिहायची वाचायची सवय तशी बाबामुळेच लागली,बाबा एक उत्तम लेखक,पत्रकार आणि कामगार नेते,साहित्यिक आणि धम्म प्रचारक अभ्यासक सुद्धा आहेत. असो ते माझे म्हणजे आम्हा सर्व भावंडांचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत ते आमच्या भावंडांचे हिरो आहेत आज मी आणि आम्ही भाऊ बहीण जे काही आहोत ते आमच्या बाबामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे. एक ऊत्तम आयुष्य जगतो आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या बाबामुळे अंत्यत गरीब परिस्थिती मध्ये माझे बाबा घडले आहेत.त्याच्या सुरवातीपासून अगदी लहान पणा पासून त्यांनी अनेक आव्हानांना आणि संकटांना सामोरे गेले आहेत. बाबा एकुलते एकच होते ते ही नवसाचे म्हणे,कारण माझ्या आजीला म्हणजे बाबाच्या आईला होणारी मुलबाळ जगत नव्हती,त्यामुळे बाबा आजी आजोबांचे खूप लाडाचे अगदी जीवाचा तुकडाच होते.आजोबा तसे मुंबई आणि गावी जाऊन येऊन असायचे आजोबांनी बाबांना त्याची दहावी झाली तसे मुंबईला आणले आजोबा आजीचा मुंबई मधील भांडुप येथे भाजीपाल्याचा बाकडा लावायचे आणि त्यातच काही दिवसाने आजोबानी गारमेंट मधील चिंद्या व जुने कपडे विकत घेण्याचा धंदा चालू केला,गारमेंट मधील चिंद्या ह्या ग्ररेज व वर्क शॉप मध्ये विकल्या जात होत्या.तर जुने कपडे घेऊन त्याच वर्गीकरण करून चांगले खराब असे निवडून चांगले कपडे बाजारात जाऊन विकत असत. बाबा मुंबई मध्ये आल्यानंतर सुरवातीच्या काळात नाक्यावर जे काही काम भेटेल ते करत होते अगदी गवंडी,सुतार,सेंटीग फिटर,बिगारी कामगार अशी अनेक प्रकारची काम बाबांनी केले आणि बाबा एक कुशल कारागीर आणि त्यांना असलेल्या कामाच्या आवडी प्रती आमच्या घरी सर्व प्रकारचे सामान होते सुताराच्या करवत पासून ते हँड ड्रिल मशीन ते गोवंडयांची थापी अशे अनेक सामान आमच्या घरी होते.

बाबाच जेव्हा आई सोबत लग्न झाले होते,तेव्हा बाबाची अगदी लहान झोपडी होतो ती ही चार ही बाजूला प्लास्टिकच्या गोणी व पत्राच्या आधारावर बांधलेला घर नव्हे झोपडी होती.पावसाळ्यात जोराचा पाऊस असला की जमिनीच्या ओलाव्याने अक्खा अंथरूण भिजायचं इतका पाणी येत असे.जेव्हा माझ्या आईच्या घरचे म्हणजेच माहेरचे काही नातलग मंडळी मुंबईला येत असत,तेव्हा ते आईची भेट घेण्यासाठी नक्की आवर्जून आमच्या घरी येत असत, आणि जेव्हा भेट घेऊन गावी जायचे तेव्हा माझ्या आईच्या आई भावाना अक्षरशःओरडायचे की काय म्हणून तुम्ही त्या मुलीला म्हणजेच माझ्या आईला त्या घरी लग्न लावून दिले.ह्या सर्व आठवणी तीच लोक आम्हाला गावी म्हणजे डीघीला गेल्यावर सांगायची.आज तीच लोक डिघी गावात गर्वाने माझ्या बाबा आणि आई बद्दल सांगतात. की काय होते तुम्ही आणि आज काय झालात. कष्ट,त्याग व जिद्धीने संसार उभा केला.आज मुंबई सारख्या शहरात स्वतःच्या हक्कची चार घर असने म्हणजे काही खाण्याची गोष्ट नाही.माझ्या आई बाबानी त्यावेळी जे कष्ट केले, जे हाल अपेक्षा भोगल्या त्याची आज गोड फळ आम्हाला खायाला भेटत आहेत.आमची आजी (आईची आई) नेहमी सांगायची की माझ्या जावयाला तोड नाही,खरच आमच्या बाबांच्या कष्ट,त्याग व जिद्धीला तोडच नाही,म्हणूनच मी म्हणतो बाबा तुमच्या सारखे तुम्हीच बाबा.
माझ्या जन्मा नंतर बाबा कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे,खूप मेहनतीचं आणि अवजड काम असायचं त्यांचे अस मी ऐकलं आहे.आणि त्याच्या त्यावेळच्या कामाच्या पद्धतीचे फोटो ही मी आज पाहतो.बाबा काम करत असताना बाबानी अनेक प्रकारची काम केली आहेत.त्यात कधी उंचावर जाऊन,तर कधी उच्च विद्युतदाबाच्या एच फेम वर, तर कधी जंगलाच्या दऱ्या खोऱ्यात अश्या अनेक ठिकाणी आणि अनेक कठिण परिस्थितीत बाबांनी कामे केली आहेत. आणि आज कदाचित बाबाच्या त्या सर्व परिश्रमाचेच फळ आम्हाला भेटत आहे.अनेकांना हेवा वाटावा असे आम्ही सुखाने समृद्धी ने जगत आहोत.टाटा पॉवर कंपनी मध्ये बारा वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करत असतांनाच बाबाच्या कार्यपद्धती आणि एकनिष्ठ शिस्तबद्ध कामाच्या पद्धतीमुळे बाबांना टाटा पॉवर कंपनी ने त्याच्या कायम स्वरूपी नोकरी मध्ये सामावून घेतले आणि बाबांनी टाटा पॉवर कंपनीचे कायम कामगार म्हणून २७ वर्ष सर्विस केली. त्याबद्ल त्यांना लॉग सर्विस आव्हाड सुद्धा मिळाला आहे.
२७ वर्षाच्या सर्विस मध्ये बाबांनी रायगड जिल्ह्यातील खापोली,भिवपुरी आणि भिरा येथील हैड्रो पॉवर स्टेशनच्या प्रकल्पात महत्वपूर्ण काम करून गौरव प्राप्त करून घेतला आहे. बाबा टाटा पॉवर भिरा प्रकल्पावर जाण्याची आनंदाची बातमी होती.तितकी ती दुखाची बातमी होती.कारण बाबा तिथेच राहणार होते आणि आठवढ्यातून फक्त रविवारी आमच्या सोबत घालवणार होते.त्यामुळे बाबा सोबत आम्हाला आमचा वेळ घालवता येत नव्हता,त्यावेळी आमच्या जवळ फोन पण नसल्या करणाने संवाद हा फक्त बाबा घरी यायचे तेव्हाच होत होता. शनिवारी उशिरा रात्री यायचे आणि सोमवारी सकाळी परत परतीचा प्रवास असायचा.नंतर आम्ही जसे मोठे होत गेलो तसे तसे बाबा आमच्या जवळ म्हणजे मुंबई मध्ये रुजू होऊ लागले होते त्यामुळे बाबा ना रोज भेटता बोलता येत होत.पण बाबा त्याच्या प्रोफेशनल आणि सामाजिक आयुष्यात ही तितकेच व्यस्त असायचे आणि आजही तेवढेच,नव्हे तर त्यापेक्षा व्यस्त असतात.आज बाबानी त्याकाळी केलेल्या मेहनतीमुळे आज आम्ही आमचा परिवार सुखाने जगतो.
बाबा फक्त त्यांच्या टाटा पावर कंपनी मधील कामपूरतेच मर्यादेत नसून ते सामाजिक कामात ही अग्रगण्य होते.बाबा गेली अनेक वर्षे नाका कामगारांना संघटित करून न्याय,हक्क मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलन उभी केली आहेत. रात्र दिवस अविरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी धडपडत करत असतांनाच बाबा त्याच्या खाली वेळेत अनेक राजकीय सामाजिक विषयावर पेपर मध्ये स्तंभलेखन करत असतात.बाबाचे आजच्या घडीला राज्यातील साठ दैनिकामध्ये नियमितपणे लेख प्रसिद्ध होत आहेत.ते आपण वाचक असाल तर नक्की वाचत असाल.बाबांना अनेक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.कुशल कारागीर कामगार ते कामगार नेते,साहित्यिक म्हणूनच प्रसिद्ध आहेत.त्या ६४ वयाच्या बाबाला ४३ वर्ष साथ देणारी त्याच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहणारी आमची आई होती.असे बहुआयामी कर्तृत्व असलेले बाबा केवळ आमच्यासाठी नव्हे तर इतरांच्यासाठी निच्छितच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.त्याच्या ६४ व्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांना हार्दिक शुभेच्छा. बाबा निरोगी रहा,खुश राहा आणि आपली आवड निवड जपत राहा.
प्रशांत सागर तायडे,९८३३८४१३०९,भांडूप,मुंबई.

