
माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.
शरद पाटलांचे माफुआंवादी विश्लेषण!स्वातंत्र्योत्तर धार्मिक जातीयवादाची अवस्था.…..राजाराम सूर्यवंशी.
जानेवारी १९८३च्या “समा” मध्ये शरद पाटलांनी धार्मिक जातीयवादाचे बदलते स्वरूप विशद करतांना सांगीतले होते,की ‘स्वातंत्र्या आगोदर धार्मिक जातीवादाचे वैशिष्ट्य धार्मिक पुनरूज्जीवनवाद व जातीय दुराभिमान होते.त्यामुळे कम्युनिस्ट व समाजवादी आणि जहाल राष्ट्रवादी यांना निधर्मी मानले जात होते.व ते त्या कसोटीला उतरत होते.परंतु स्वातंत्र्यानंतर जहाल राष्ट्रवादी हे धार्मिक-जातीय पुनर्जीवनवादी राजकारणाकडे वळून जातीयवादी प्रस्थापित बनलेत.तसेच शेकाप व कम्युनिस्ट हे जातिअंताची लढाई न लढल्यामुळे प्रस्थापित जातीवादी बनलेत.
स्वातंत्र्याबरोबर मुसलमान हि सर्वात मोठी अल्पसंख्यांक जमात राहिली नाही.गोडसेने गांधींवर झालेल्या गोळीसरशी भारतीय धार्मिक जातीयवादाच्या पहिल्या अंकावर पडदा पडला. व जगाच्या सर्वात मोठ्या प्रजासत्तकाच्या नव्या शास्त्या वर्गाच्या जातीय प्रस्थापितांनी त्यांची घटनात्मक महावस्तू डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्याकडून करून घेतली,आणि नंतर भारतीय इतिहासात शूद्रस्त्रीयांना प्रथमच मुक्तीची सनद देऊ पाहणाऱ्या हिंदू कोडबिलाच्या प्रश्नावर आंबेडकरांना कायदे मंत्रिमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले.हे बिल खंडीत स्वरूपात नेहरु सरकारकडून पास करण्यात आले आणि त्याही स्वरुपात त्याच्या तुटपुंज्या लाभांपासून आदिवासींना वंचित करण्यात आले. ‘जसे ओबीसींना मंडल आयोगाच्या पुर्ण सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे,तसेच.या तुटपुंज्या व खंडित शिफारसींनाही संसदेबाहेर सर्वच प्रस्थापित पक्षांनी विरोध केल्यामुळे खंडित सवलतींवर ओबीसींना समाधान मानावे लागले आहे.मराठवाडा विद्यापिठ नामांतराच्या संदर्भातही विधानसभेत सर्व प्रस्थापित पक्ष नामांतराला पाठिंबा देत होते तर बाहेर रस्त्यावर नामांतराला हिंसा व जाळपोळीने विरोध करीत होते.
हिंदू कोडबील,मंडल आयोग व नामांतराचे लढे हे जातिव्यवस्थाविरोधी लढे बनल्याने भल्याभल्यांचे पुरोगामी मुखवटे फाटले होते.तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी जेव्हा मंडल आयोगाला विरोध के़ला होता,तेव्हा शरद पाटलांनी पिंपळनेरला जाऊन त्यांचा पुतळा जाळण्याची धमकी दिली होती.मात्र मुळ मुद्दा आंबेडकरांशी संबधित असल्याने तिकडे वळू.हिंदू जाती-धर्माच्या चौकटीत अतिशूद्रांना समता मिळवून द्यायचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता हा इतिहास ताजा आहे.पण,हा केवळ महाराष्ट्राच्या धार्मिक जातीय परंपरांमध्ये भर घालणारा पुनरूज्जीवनवादी प्रयत्न नव्हता.तर भारताच्या राजकीय समरंगावर असे अल्पसंख्यांक येऊन धडकले होते,की ज्यांच्या बिनीने भारतीय इतिहासातील ब्राह्मणी प्रवाहाशी सर्व संबंध तोडले होते आणि जातीविरोधी व समतावादी अब्राह्मणी प्रवासी नाते जोडले होते.जुने अल्पसंख्यांक मुसलमान व नवे अल्पसंख्यांक जाती-जमाती यात मूलभूत फरक हा होता की,स्वातंत्र्य चळवळीचे यश हिंदू मुसलमान एकजुटीवर अवलंबून होते,तर आजच्या भारतीय लोकशाही क्रांतीचे यश या नव्या अल्पसंख्यांकांनी त्यांचे नेतृत्व करण्यावर अवलंबून आहे.
भारतीय ग्रामीण भागातील सर्वात लढाऊ व दीर्घकालीन जमीनदार विरोधी संघर्ष मुख्यतः अनुसुचित जातींमधून धर्मांतरीत बौध्द व आदिवासी यांनी केला आहे. भारतीय सरंजामशाहीचे चे एक अंग असलेल्या जमीनदारशाहीचे दुसरे अंग असलेल्या जाती व्यवस्थे बरोबर अंत करण्यात अतीशुद्र म्हणून जास्त हितसंबंध त्यांचा आहे. या सर्वात मूलभूत वैशिष्ट्याच्या प्रक्रियेत स्वातंत्र्यकालीन महाराष्ट्रात जातीय धार्मिक परंपरांचा आविष्कार होत आलेला आहे.भारताच्या नव्या लोकशाही क्रांतीसाठी हे शोषित घटक ओबीसींना कसे बरोबर घेतात यावर या समाज परिवर्तक क्रांतीचे भवितव्य अवलंबून आहे.म्हणून,शपा समजून घेणे म्हणजे त़्यांचे नूसते समाज परिवर्तनवादी विचार समजून घेणे ऐवढेच नसून व त्या विचारांना उभे करणार्या सहकार्यांचे व तत्कालीन पक्षांचे,विचारधारेचे मुल्यमापण करणे आहे.हिच खरी सर्जनशील प्रक्रिया आहे.त्यातुन नवक्रांतीची व्युव्हरचना बनवण्यात मदत होणार आहे.
राजाराम सूर्यवंशी,9503867602,धुळे.