बुध्दभूमी नालासोपारा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दैदिप्यमान १३५ वा जयंती महोत्सव साजरा.

बातमी शेअर करा.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आयुनी दर्शना पवार यांनी सादरीकरण केलेल्या माता रमाई एकपात्री प्रयोग हजारो अनुयायांच्या अश्रुधारा वाहून गेला…

विशेष प्रतिनिधी नालासोपारा – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था (रजि.) नालासोपारा पश्चिम,यांच्या वतीने प्रियदर्शी राजा सम्राट अशोकछत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव १२ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात समता,मैत्री व एकात्मतेचे उत्तम दर्शन पहायला मिळाले.
१२ एप्रिल रोजी सायंकाळी महापुरुषांच्या प्रतिमांची विशाल मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये बौध्द अनुयायी यांच्या बरोबर स्थानिक पक्ष अर्थात बहुजन विकास आघाडीचे सर्व मान्यवर सामील झाले होते जवळपास हजारोंच्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनुयायांनी सादर केलेल्या नृत्य,लेझीम पथक यांच्या अविस्मरणीय आनंद घेतला.१३ तारखेला अनेक शैक्षणिक व क्रीडास्पर्धा संपन्न झाल्या, सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१४ तारखेला सकाळच्या सत्रात पुजनीय भदंत डॉ.मैत्र्येयघोष आयुपाल महास्थविर यांची संशोधनात्मक व अभ्यासपूर्ण धम्मदेसना झाली इतर महामानव यांबरोबरच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्थात संघर्षनायक यांच्या १९२७ साली घटलेल्या घटना आपल्या मौलिक वाणीतून सादर करून उपस्थितांना त्या काळात घेऊन गेले तब्बल अडीच तास अनुयायी शांत व गंभीरपणे श्रवण करीत होते.संध्याकाळच्या सत्रात महिलांचा गंधफुल कार्यक्रम व त्यानंतर झालेल्या सभेमध्ये प्रा.संध्याताई वैद्य यांनी महापुरुषांच्या जीवनातील अनेक मौल्यवान पैलूंवर प्रकाश टाकला तद्नंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रथमच स्थानिक महिला कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य,एकपात्री प्रयोग व गीत गायनाने रसिक प्रेक्षकांना मोहित करून टाकले खास गोष्ट म्हणजे बहुतांशी या गृहिणी पन्नास पंचावन्न या वयोगटातील होत्या आणि कधीही रंगमंचावर उभ्या राहिल्या नव्हत्या तरीही कमालीचा कलागुण सादर केला. कार्यक्रमात आकर्षक ठरला तो ‘माता रमाई’ यांच्या जीवनातील संघर्ष यावर आयुनी दर्शना काशिनाथ पवार यांनी सादर केलेला एकपात्री प्रयोग हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहून लागला, अक्षरशः पंधरा मिनिटे काही अनुयायी रडत होते.सर्व स्तरातून भगिनी दर्शनाचे कौतुकच नाही तर या प्रयोगाची मागणी होत आहे. तिचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.या सर्व महिलांचा कार्यक्रम तयार करून घेण्यात व त्यांच्या कलागुणांना योग्य पध्दतीने सादर करण्यात आयु.अमोल गायकवाड यांना कला दिग्दर्शक म्हणून फार मोठं श्रेय जाते,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी,सभासद,संस्थेशी संलग्न असलेल्या बौ.पं.स.शाखा व महिला मंडळ तसेच सर्व  तरुणवर्ग आणि सर्व मित्र संघटना यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *