“१०६ वर्षांची परंपरा – सहकाराच्या उज्ज्वल भविष्याची दिशा” 

बातमी शेअर करा.

१०६ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली, सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी मा.आमदार श्री. प्रवीण भाऊ दरेकर,गटनेते विधानपरिषद महाराष्ट्र राज्य यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ऍड.प्रमोद सागर तायडे सरचिटणीस – मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (सहकार सेल) सचिव-मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित,अध्यक्ष – समता फाउंडेशन यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्यावेळी मान.नंदकूमार काटकर साहेब जेष्ठ संचालक मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक,उदय सर्वगोड आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सक्षम व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सहकार चळवळ नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल,तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ,जिल्हा संघ व सर्व सहकारी संस्थांचा विकास साधला जाईल याची खात्री आहे.त्याचबरोबर, मानद सचिवपदी निवड झालेले मा.श्री.रामदास मोरे व उपाध्यक्षपदी निवड झालेले मा.श्री.अर्जुनराव बोरुडे यांचेही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!करण्यात आले.

  सहकार पॅनलचे श्री.संजीव कुसाळकर,श्री.शिवाजीराव नलावडे व सर्व मान्यवर सहकारी कार्यकर्ते तसेच पीठासीन अधिकारी मा.श्री.जगताप,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रावळ,मुख्य अधिकारी श्री.बोडके,श्री मुळूक यांची या प्रक्रियेत उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली.सर्व नवीन पदाधिकारी व संचालक मंडळाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 

 १०६ वर्षांची परंपरा – सहकाराच्या उज्ज्वल भविष्याची दिशा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची १०६ वर्षांची गौरवशाली परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आपण सारे सहकार कार्यकर्ते एकदिलाने कटिबद्ध राहू या अशा ऍड.प्रमोद सागर तायडे सरचिटणीस मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (सहकार सेल)सचिव मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन मर्यादित,अध्यक्ष समता फाउंडेशन यांनी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *