सिडको एसआरए यांच्या घरे तोडण्याच्या नोटीस येऊनही,

बातमी शेअर करा.

 जो शांतपणे गणपतीचे मखर बनवितो..तो खरा ओबीसी. 

“भक्ती हीच शक्ती आहे.”स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले.या नव्या युगातही ईश्वर भक्तीची ताकद खूप मोठी आहे.माणसाच्या जीवनात दुःख आहे.दुःखाचे कारण शोधून ते नष्ट केले की दुःख मुक्ती मिळू शकते.असे भगवान बुध्दांनी २५००वर्षापूर्वी सागितले.महा दयाळू बुद्धांनी मानवी दुःखावर मोठे संशोधन केले होते.साऱ्या जगाने हा शोध स्वीकारला.परंतु भारताने ही तत्वप्रणाली नाकारली.

त्याऐवजी “भक्ती” हा श्रद्धेचा मार्ग स्वीकारला.

  पोट दुखत असेल?.तर त्याचे कारण शोधणे.म्हणजे आजाराचे निदान करून त्यावर उपाय म्हणून योग्य औषध घेणे.हे उपाय आधुनिक वैद्यक शास्त्र सांगते.यावर शॉर्टकट देखील आहे.वेदना क्षमक औषधे घ्या.शांत रहा.कशाला हवे निदान ?.असेही उपाय गरीब लोकांसाठी डॉक्टर सध्या सांगत असतात.पुढे जाऊन निदान न करता चुकीची औषधे घेतली? म्हणून अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याचे आपण पाहतो.तेही आम्ही शांतपणे स्वीकारतो.आपला माणूस वाचविण्यासाठी जेवढे पैसे लागले असते? तेवढे पिंडदान विधीला खर्च करतो.पैसे नसतील तर नातेवाईक उसने देतात.उपचारांसाठी कुणी मदत करीत नाही.अर्थात तो आमचा धर्म आहे.जो पृथ्वीवरच्या जगण्यापेक्षा मेल्यावरच्या स्वर्गारोहणाला जास्त महत्व देतो.जो स्वर्ग अस्तित्वातच नाही.सत्याला भिडण्याचा,सत्य शोधण्याचा,स्वभाव आम्हा शूद्र ओबीसींचा नाही.या अगोदरचे माझे आर्टिकल सांताक्रूझ मुंबई येथील कुणबी ओबीसी समाजाच्या एसआरए प्रकल्पात घरे वाचविण्याचे प्रयत्न यावर होते.

  गणपतीला एक आठवडा असताना,उच्च न्यायालयाने आदेश दिले की पोलिसांना घेऊन शेकडो घरांची ही वस्ती निष्कासित करावी.मी स्वतः जाऊन तेथे लोकांना  समजावले.लेख लिहून साऱ्या कुणबी समाजाला आणि ओबीसी महाराष्ट्राला विनंती केली.परंतु ज्यांची घरे तुटणार आहेत.त्यांना काळजी गणपतीच्या घराची मखराची असेल ? तर कुणी कुणाला वाचवायचे ?हा ही मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र शासन,एस आर ये पोलिस यांना माहिती आहे.कुणब्यांची घरे तोडून उच्चजातीय बिल्डर,राजकीय नेते यांचा २४०० कोटी रुपयांचा फायदा करून द्यायचा असेल? तर गणेश उत्सव हाच योग्य काळ आहे.जो ओबीसींना वेदना कमी करून दुःखातही सुख आहे.वेदनेतही समाधी आहे.अशी भक्तिमय भावना निर्माण करून समाजात शांती निर्माण करतो.त्यामुळे लोकशाहीत नागरिकांचे प्रश्न मांडणे.हे विरोधी पक्षाचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सागितले असेल? किंवा विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपाय शोधून त्यावर लोकांना न्याय देणे.हे भारताच्या साविधानिक लोकशाहीत सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य असले.तरीही खरा उपाय हा गणेशोत्सव आहे.तो लोकशाहीवर ईश्वर भक्ती हा रामबाण उपाय आहे.हे सांगतो.त्यामुळे आता चर्चा बंद.

   मी लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी धन्यवाद देईन.ज्यांनी इग्रज गेल्यानंतर इथले शासन सांभाळताना,त्यांचे उच्चवर्णीय जात भाई मनुपुत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या घरे,जमिनी,जंगल,पाणी शिक्षण,आरक्षण अशा न संपणाऱ्या मागण्यांवर “गणेशोत्सव” हाच दूरदर्शी उपाय सागून टाकला.देशाला मोठ्या ओबीसी प्रश्नापासून वाचविले.मंगळवार १९ ऑगस्ट २०२५ रोजी लोकसत्ता या शासनप्रिय वृत्तपत्रात अर्धा पान सिडकोची नोटीस प्रसिद्ध केली गेली.तीही गणेशोत्सवाचा मुहूर्त शोधूनच.मी काल कुणबी ओबीसींचा प्रश्न मांडला.लगेच आज नवी मुंबईतील आगरी कोळी कराडी ओबीसीं ९५ गावातील ठाणे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घर,गावठाणे,महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ नुसार कशी अतिक्रमणे आहेत.कशी अनधिकृत आहेत. हे सांगून तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यावर नेरूळ नवी मुंबई येथे काल रात्री मी जाहीर सभा घेऊन सागितले.

    आमची घरे तोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नगर विकास मंत्रालयाने सन्माननीय मंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी आमची अनधिकृत घरे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला होता.जो निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला नाही.म्हणजे लोकांची फसवणूक करणारे सत्ताधारी लोक,लोकशाहीत लोकांना सोडा,देवालाही घाबरत नाहीत.या परिस्थीत नवी मुंबईच्या लोकांनी आमची संविधानिक अधिकार असलेली आमच्या मालकीच्या गावातील घरे वाचविण्यासाठी तत्काळ लढण्यास पुढे आले पाहिजे.सभा संपल्यानंतर लोक खाजगीत बोलत होते. “गणपती गेल्यानंतर पाहू.” माझ्या गाडीचे डिझेल,माझे प्रयत्न वाया गेले.असे मला वाटू लागले आहे.

   आपल्या देशात शूद्र ओबीसींचे प्रबोधन करणे गरजेचे आहे का? की येणाऱ्या गणेशोत्सवास जसे सारे राजकीय पक्ष प्रोत्साहन देतात.देणग्या देतात त्यांचे अनुकरण करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकता येतील का? दहीहंडी उत्सवात आमचे हात पाय मोडून,आमची मुले स्वर्गात पाठवून आम्ही धर्म पाळला.काय करावे हा मोठा प्रश्न आहे.इतिहास सांगतो.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पितामह प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सांगितले होते.एका पारड्यात छत्रपती शिवरायांना बसवा.दुसऱ्या पारड्यात तेहतीस कोटी देवांना बसवा.छत्रपती शिवरायांचे पारडे हे तेहतीस कोटी देवापेक्षा जड असेल.सामाजिक,धार्मिक,राजकीय आर्थिक दृष्टीने छत्रपती शिवराय हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत.म्हणूनच महाराष्ट्राच्या केवळ मराठीच नाही तर सर्व धर्म पंथ लिंग जातीच्या लोकांना न्याय देणारा उत्सव हा “शिवजयंती उत्सव” आहे.हे महात्मा जोतिबा फुले यांनी देशाला सांगितले.आम्ही लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव स्वीकारला.जो ओबीसींच्या साऱ्या समस्यावर धार्मिक उपाय ठरलाय.

   ओबीसींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे.आपण विचार करावा.ओबीसी मध्ये आमच्याकडे फार मोठे नेते झाले.लोकनेते दि बा पाटील साहेब त्यांनी देव नाकारला.लोकांना साडे बारा टक्के विकसित भुखंड देऊन घरा घरात करोडपती ओबीसी बनविले.हजारो वर्षाच्या ईश्वर भक्तीने,नवसाने जे मिळाले नाही ते लोकनेते दि बा पाटील यांच्या पाच हुतात्मे आणि हजारोंचे रक्त त्यागातून मिळाले.

लोकमत सारखे वृत्तपत्र दिबा च्या मृत्यूनंतर म्हणते “देव न मानणारा देव माणूस गेला.” आगरी कोळी कराडी ओबीसी लोकांनी आज या सिडको विरुद्ध आंदोलनातून आलेला कोट्यवधीचा पैसा स्वीकारला. तो देवाचा आशीर्वाद म्हणून? तो देवालाच अर्पण केला.आमच्या ओबीसी नेतृत्वाचा चार्वाक,बुद्ध,फुले,आंबेडकर यांना मानणारा वास्तववादी, आधुनिक मानवतावादी विचार नाकारला.याच हजारो वर्षे गुलामीत आनंद,सुख, मानणाऱ्या लोकांना ओबीसी म्हणतात.ओबीसींच्या चळवळी आहेत कुठे.?

   याच काळात सिडकोने आगरी कोळी कराडी प्रकल्प ग्रस्त लोकांना,कायद्याने, पुनर्वसन म्हणून देय असलेली सिडको विकसित जमीन बिवलकर या खोत ब्राम्हणाला दिली.छत्रपती शिवरायांचे म्हणजे सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी यांचे बलशाली आरमार बुडविणाऱ्या पेशव्याचे सरदार बिवलकर ब्राह्मण यांना दिली आहे.ज्यांनी छत्रपती शिवरायांचे आरमार बुडविण्यासाठी परकीय इंग्रजाबरोबर हातमिळवणी केली होती.देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कायद्याला मान्य नसलेली पाच हजार कोटी रुपयांची जमीन मराठा नगर विकास मंत्री एकनाथ.शिंदे देतात.आज न्याय ब्राह्मण फडणवीस, क्षत्रिय एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे.  लोकनेते दि बा पाटील यांच्या कर्म भूमी रायगडात नवी मुंबई विमानतलास नाव मिळत नाही.आज सर्वांपेक्षा  पेक्षा अदानी मोठा झालाय.लोकांनी करावे काय? माझ्या भोळ्या भक्ताना ओबीसींना मार्गदर्शन करायला आहे का कुणी? फुले शाहू आंबेडकर?यांच्या विचारांचा मार्गदाता.

जागे व्हा !

ओबिसिनो जागे व्हा.

वेळ झाली आरतीची.?

वेळ झाली आमची घरे गावे तोडण्याची.?

काय करायचे ते ठरवा लवकर.!

राजाराम पाटील.८२८६०३१४६३,उरण,जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *