
विशेष प्रतिनिधी मुंबई :- भारतीय भिक्खू संघाचे (रजि.) प्रमुख पुज्य गुरूजी (विपश्यनाचार्य पुज्य भदन्त संघकिर्तीजी महाथेरो) यांचा ‘मंगल मुत्यू’ शनिवार दिनांक ५ सप्टें. २०२६ दुपारी १२:३० वाजता झाला असुन पुज्य गुरूजींचा पार्थिव देह भिक्खू निवास,सर्विस रोड रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई ४०००७५ येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

भारतीय भिक्खू संघ भिक्खू निवास येथे पुज्य गुरूजींच्या पार्थिव देहा जवळ सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीन सत्रात दरदिवशी सामुही सामूहिक साधना,परित्राण पाठ करण्यात येत आहे. सकाळी ०५:०० ते ६:३० पर्यत,दुपारी ०२:१५ ते ०३:३० पर्यंत,सायंकाळी ०६:१५ ते ०८:३० पर्यंत वरील सर्व कार्यक्रम प्रत्येक दिवशी सुरू आहे.
शनिवार दिनांक १२ सप्टें.२०२६ सायंकाळी ०७:०० ते संपूर्ण रात्र महापरित्राण पाठ रविवार दिं. १३ सप्टें. २०२६,सकाळी ०८:०० ते ०९:१५ भिक्खू संघाव्दारे “अनिच्चा वत संक्खारा” सुत्र पठण सकाळी ०९:३० ते ११:०० भिक्खू संघास संघदान व भोजनदाध.११:०० ते १२:१५ उपस्थित श्रद्धावान धर्मप्रेमीं उपासक,उपासिकांसाठी भोजनदान प्रसाद दुपारी १२:३० वा. पुज्य गुरूजी (विपश्यनाचार्य पुज्य भदन्त संघकिर्तीजी महाथेरो) यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात.राजावाडी स्मशानभूमी (सौमय्या कॅम्पस) येथे दुपारी ०१:५५ वा. अग्निदाह संस्कार होणार आहे. त्यात धम्म उपासक उपासिकानी सहभागी व्हावे.असे भिक्खू विरत्न महाथेरो ९२२२९२२२१४ भारतीय भिक्खू संघ यांनी आवाहन केले आहे.
मुंबई ठाणे जिल्ह्यातील धम्म उपासक उपासिका,महिला मंडळ,मित्र मंडळ मोठ्या संख्येने विपश्यनाचार्य पुज्य भदन्त संघकिर्तीजी महाथेरो यांच्या अंतिम दर्शनासाठी येत आहेत.
