शेतकऱ्यांच्या दोन लाख पर्यंतच्या कर्जमाफीच गोडबंगाल!

बातमी शेअर करा.

शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत कर्जमाफी जाहीर केली आणि नेमकी मेक  “३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले कर्जदार असावे” ३० सप्टेंबर पर्यंत किती शेतकरी थकीत आहे तर नेमके चार दोन टक्के जे की मयत असेल किंवा अन्य कारणाने. बरं मयत असणाऱ्या कर्जदाराचा फक्त मृत्यूचा दाखला घेऊन हे कर्ज माफ करणार नाही त्यातही त्याच्या कर्जाची हमी स्वतःवर घेणारा आप्त किंवा वारसाने स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारा शपथपत्र करून,अशा वारसाच्या नावे शेती असावी व त्या शेतीवर कर्ज नसावं,बिना कर्जाची फार्मर ID हवी. शेतीवर कर्ज नसलेला वारस त्या मयत शेतकऱ्याचा कर्जबोजा स्वतः घेणारा कुठे भेटेल बरं,शेती असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यावर पीक कर्ज असणारच यात कुणाचंही दुमत नसातांना अशा अटी लादल्या त्यामुळे हे मयत शेतकऱ्याच्या टाळुवरचच लोणी खाण नव्हे का?.असा शेती असून कर्ज नसलेला कोण वारस मयत शेतकऱ्याला मिळेल बरं या वरून मयत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळेल याची शाश्वती नाही.
   हयात शेतकऱ्याला ३१ मार्च च्या आत काहीही करून गाय बैल शेळ्या मेंढ्या बायकोच्या गळ्यातलं विकून पीक कर्ज भराव लागते तरच पुढील हंगामासाठी कर्ज मिळून त्याची शेती होऊ शकते त्यामुळे ९८/९९ टक्के शेतकरी हे नियमित कर्ज भरणारेच आहे त्यात त्यांना या दोन लाखाच्या कर्जमाफीचा किती लाभ होणार बरं ? खुप तर नियमित कर्जदाराला पन्नास हजाराच अनुदान सरकार देईल,पण दोन लाखाचा मात्र गाजावाज्या ह्या सरकारकडून होणार,कर्जमाफी जाहिरातीवर शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या रकमपेक्षाही जास्त खर्च हे करणार! उदधोगपतीच्या अरोबो खरोबो कर्जमाफीची मात्र कुणाला भनक सुद्धा लागू देणार नाही अशाप्रकारे रात्रंदिवस कष्ट उपसून अत्यल्प दरात जनतेची भूक भागवणाऱ्या अशा या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची हे सरकार थट्टाच करणार हे मात्र नक्की ! सरकारच्या अशा कुटनितिमुळे शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नियमित कर्जदाराचा थकीत कर्जदार होणंच योग्य राहील अशी शेतकऱ्यात चर्चा दिसून येत आहे.
रामचंद्र सालेकर-९५२७१३९८७६,चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *