बहुसंख्य कामगारांचे म्हणणे आहे.दलालांना आळा घालावा, हा मुद्दा मान्य आहे.परंतु महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा स्वतःचा एकही कायम स्वरूपी कर्मचारी नाही.सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत.त्यांना मंडळाकडे असलेल्या पैशाची पुरेपूर माहिती आहे.म्हणून आपसूकच हे पैसे आपल्या पदरात पडले पाहिजेत, ही भावना त्यांच्यात बळावते.दलालांचं मुळ येथे आहे.
सुरक्षा अत्यावश्यक संच,भांडी संच,मध्यान्ह भोजन,आरोग्य शिबिर,स्मार्ट कार्ड वाटपाचा कंत्राट हे सर्व भष्टाचाराचे कुरण ठरले आहेत.तालुकास्तरावर जे सुविधा केंद्र सुरू झालेली आहेत,ती देखील भ्रष्टाचाराचं उत्तम उदाहरण आहे.बऱ्याच दलालांनी कायदेशीर कवच मिळावं म्हणून संघटना नोंदणी करून घेतल्या आहेत.भरपूर असे बांधकाम कामगार आणि ठेकेदार आहेत की त्यांचा एक रूपया इतका देखील निधी मंडळाकडे जमा होत नाही किंवा त्यासाठी मदत होत नाही.मात्र लेटर हेडचा वापर करून मंडळाच्या योजनांचा फायदा त्यांना मिळतोच आहे.
माझा प्रश्न असा आहे की,दलालांना कमी करणे किंवा त्यांना समूळ नष्ट करणे हा जो आवाज उठवला जातोय,तो आवाज नेमका कोणत्या दलालांच्या विरोधात आहे? राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याचा दलाल की अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने काम करणारा दलाल. त्याच बरोबर कार्यालया मध्ये असलेले दलाल कमी झाले तरी,कामगार मंडळात असलेले,बसलेले दलाल तुम्ही कशा पद्धतीने कमी करणार आहात, यावर देखील एक स्वतंत्र बैठक,परिषद बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिति भरवणार आहे काय? पुन्हा हाच प्रश्न उभा राहतो बांधकाम कामगारांची नांव नोंदणी करणाऱ्या दलालांना आळा कोणी घालावा?.
माझा थोडाबहुत राजकीय अभ्यास आहे.त्याप्रमाणे महामंडळ किंवा लोक कल्याणकारी योजना या भ्रष्टाचार करता याव्यात म्हणून काढल्या जातात किंवा त्यांचा वापर केल्या जातो.पुर्वी शेतकरी कुणाला म्हणावं,असा प्रश्न होता.कुणी म्हणायचं ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे तो शेतकरी.कुणी म्हणायचं जो शेतात काम करतो तो शेतकरी.तेव्हा स्वामीनाथन आयोगानं स्पष्ट केलं की, ज्यांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे,त्यांना शेतकरी म्हणावं.भूमीहीन शेतमजूर,सुतार,लोहार,कृषी व्यावसायिक हे देखील शेती अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक ठरतात.त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल.त्याच पद्धतीने इमारत बांधकाम करतांना 94 प्रकारच्या कामगार,कारागिरांचे हात लागतात.वीटभट्टी वरील कामगार,मजूर,रेती काढणारे मजूर,दगड फोडणारे मजूर,बांबू तोडणारे बांधणारे मजूर,दरवाजा,खिडकी,बनवणारा कारपेंटर,सुतार,काचाचे काम करणारा कारागीर,वायरमान,पलंबर असे अनेक कामगार आहेत की त्यांना आपण कोणत्या क्षेत्रात येतो हेच माहिती नाही. अशा सर्व असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना संघटित करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
तुमच्या लढ्याचा मुख्य हेतू काय आहे? हे जर ठरवता येत नसेल किंवा कळत नसेल तर तुम्ही तो लढा कधीच जिंकू शकणार नाही.कुठली ही क्रांती टप्प्याटप्प्याने घडत जाते.ती निरंतर सुरूच असते.आता बांधकाम कामगार संघटना कृती समितिच्या पदाधिकारी यांनी कोणता मुद्दा तुमच्या अग्रस्थानी आहे ते ठरवावे.आणि बांधकाम कामगारांची नांव नोंदणी करणाऱ्या दलालांना आळा कोणी घालावा?.या विषयावर मग अशुद्ध मराठी व्याकरण असलेल्या भाषेत भांडत बसावे.
आपलाच मावळा महेंद्र भंडारे- 8999661469,चिखली बुलढाणा.