मी एका मुलासाठी माझ्या करोड़ो मुलांना नाही मारु शकत.असे होते बाबासाहेब!

बातमी शेअर करा.

एकदा मन लावुन वाचा! खरच डोळ्यात पाणी येईल.

  २६ नोव्हेंबर,१९४९ रोजी संध्याकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवांत सोप्यावर बसले होते,क्षणात हसत होते क्षणात रडत होते,शंकर आनंद शास्री सोबत होते,त्यानां समजेना नेमक झालयं काय ? त्यांनी विचारण्याचं धाडस केलं, बाबासाहेब म्हणाले शास्त्री मी आज आनंदात आहे कारण आज मी माझं ध्येय्य गाठलयं,आज मी माझं उद्धिष्ट पुर्ण केलयं आणि हे करत असताना मी काय-काय गमावलं त्याची चाचपणी करत होतो,व माझा एक काळ आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं,माझा एक काळ असा होता शास्री,ज्या काळी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता व नेमका त्याच वेळेस माझा राजरत्न आजारी पडला होता,माझ्या राजरत्नला ताप आला होता त्याचं शरीर तापाने फनफनत होतं,परंतु त्याच्या औषध उपचारासाठी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता.
  माझं राजरत्नवर खुप प्रेम होतं,शास्री अरे नेमकाच बोलायला लागला होता,नेमकाच चालायला लागला होता,औषधोउपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होतं,परंतु त्याला छातीशी कवटाळुन रडण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता,शास्त्री माझा राजरत्न माझ्या छातीशी कधी गतप्राण झाला हे मला सुद्धा कळलं नाही रे….!
  सगळे लोक जमले सगळे शेजारी जमले एकजन माझ्याकडे आला व मला म्हणाला…..
“बाबासाहेब राजरत्नचा आता अंत्यविधी करावा लागेल व त्यासाठी त्याला नवे कपडे घ्यावे लागतील.” नवे कपडे म्हंटल्याबरोबर माझ्या काळजामध्ये चर्र झालं, कारण त्याच्या औषधोपचारासाठी माझ्याजवळ एकही रुपया नाही, तर त्याला नवे कपडे घेण्यासाठी माझ्याकडे कुठुन पैसे येतील..??
काय करावं कळत नव्हतं, कुणाला सांगावं समजत नव्हतं,
शास्री मी गुडघ्यामध्ये डोके खुपसुन ढसाढसा रडायला लागलो,पण माझ्याकडे पैसे नाहीत हे माझ्या रामुला ठाऊक होतं. माझी रामु जवळ आली तिने लुगड्याचा पदर फाडला,त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नला गुंडाळलं आणि त्याचा अंत्यविधी केला.
परंतु आज मला असं वाटत आहे की माझ्या त्या राजरत्नच्या बलीदानाचं आज सार्थक झालं कारण आज मला असं वाटतंय कीं माझा एक राजरत्न गेला तर काय झालं याच्यानंतर येणारे माझे कोट्यानं कोटी राजरत्न उद्या टायकोटात सुटाबुटात येणार आहेत, व याच्यानंतर येणारा माझा एकही राजरत्न हा बिना औषधांशिवाय मरणार नाही,व एकही राजरत्न हा बिनाकपड्याचा चितेवर जळणार नाही याचं सुख मी आज अनुभवतोय….!
त्याच राजरत्नच्या बलिदानामुळे आज आम्ही शिकलो,सवरलो मोठे झालो,नोकऱ्यांला लागलो.त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसाठी आम्ही काय केलं…?? हे प्रत्येकाने आपापल्या काळजाला विचारण्याचा प्रश्न आहे…
शेवटी बाबा…..
भंगली एकता संपली हो कथा,

कुणी नाही ईथे कुणाचा राहीला,

एक टुकडा ईथे एक टुकडा तिथे,

बा भिमा तुमच्या काळजाचा मी पाहिला….!
ज्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजरत्न याचा अचानक मृत्यु झाला त्याच दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम गोलमेज कॉन्फरन्ससाठी लंडनला जायचे होते.मोठा भाऊ येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाला ‘भीम तू कोठे चालला आहेस,राजरत्न आता राहिलेला नाही.’ बाबासाहेब सून्न झाले.काही क्षणातच स्वतःला सावरुन बंधुला म्हणाले…..
“आज जर मी लंडनला पोहचलो नाहीतर आज करोड़ो अस्पृश्य,पिछड़े लोकांच्या अधिकाराची गांधी व त्याची कंपनी हत्या करेल. मी एका मुलासाठी माझ्या करोड़ो मुलांना नाही मारु शकत.”
असे होते बाबासाहेब!
आजच्या सोशल मिडियावर हा छोटाक्षा लेख आला लेखक कोण आहे माहिती नाही. निफाड टाईम्स दैनिकाने तो प्रसिद्ध केला आहे.पण पाठवणारा म्हणतो माझ्या बाबांचे एक काम जरूर करा कोणत्याही १० लोकांना जरूर जागरूक करा. त्यांना अस्तित्वाची जाणीव करुन द्या. 

संकलन :- सागर तायडे भांडूप मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *