ग्रंथ वाचनामुळे  मानवी जीवनात मोठे परिवर्तन होते.

बातमी शेअर करा.

 करंजे येथील बबन गणपत वन्ने यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विशेष प्रतिनिधी सातारा – ग्रंथ वाचनामुळे शील,समाधी,प्रज्ञा,करुणा आणि मैत्रीची शिकवण जनमानसात रुजण्यास खूप मोठी मदत होते.धम्मचरण केल्याने जीवन समृद्ध होते त्याचबरोबर फलप्राप्तीसाठी ध्यान साधना करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शहाजी वाघमारे यांनी केले.तेव्हा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुखदेव घोडके यांनी केले. त्यावर शहाजी वाघमारे अतिशय सोपी भाषेत स्पष्टीकरण देत होते.वर्षावास काळात बौद्ध विहारात किंवा घरात “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन आणि अध्ययन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.वर्षावास पावसाळ्यातील तीन महिन्यांचा काळ असतो, ज्यामध्ये भिक्षू आणि उपासक एकाच ठिकाणी राहून धम्मसाधना,ध्यान आणि अध्ययन करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बौद्ध दर्शनाचा आणि मानवतावादाचा मुख्य आधार आहे.त्याचे वाचन व विश्लेषण: वर्षावासात रोज संध्याकाळी विहारात व घरात बुद्धवंदना घेऊन या ग्रंथाचे वाचन आणि त्यावर प्रवचन किंवा चर्चा केली जाते.त्यामुळेच मानवी जीवनात मोठे परिवर्तन होते.करंजे येथील बबन गणपत वन्ने यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 यावेळी प्रशांत झाल्टे म्हणाले तात्कालीन व्यवस्थेला सुरंग लावण्याचे काम बुद्धाने केले होते.त्याचे विचार बाबासाहेबांनी आपणास एक धम्माच्या माध्यमातून दिल्या आहे.तेव्हा आपण चांगले कर्म करीत राहिले पाहिजे.सुदर्शन इंगळे म्हणाले जीवनामध्ये धम्म अमृत मिळाले आहे. धम्म विचारधारेवर श्रद्धा असली पाहिजे.धम्म माणूस घडवितो तेव्हा मानवाने गर्व,आळस व अहंकार बाळगू नये. सदरच्या कार्यक्रमास सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे आयु.शामराव बनसोडे, शाहीर जितेंद्र गमरे, आयु.आत्माराम घोडके,प्राजक्ता घोडके सुखदेव घोडके,रिपब्लिकन पक्ष (गवई गटाचे) महासचिव चंद्रकांत कांबळे दाम्पत्य, धम्म उपासिका पवित्र बबन वन्ने,प्रितम बबन वन्ने,प्रिया प्रितम वन्ने,अद्विक अद्विका वन्ने,चंद्रकांत जानू कांबळे,मायादेवी चंद्रकांत कांबळे,तानुबाई सोनवणे,सत्यवान कांबळे, अनुसया सत्यवान कांबळे, सुजाता सोनवणे,विशाल परिहार,रविना परीहार,वैभव परिवार,ज्योती परिहार, सागर मोरे,स्नेहल मोरे,विलास कांबळे,एड.विलास वहागावकर,अशोक भोसले, वसंत गंगावणे, अंकुश धाइंजे, अशोक कांबळे, मारुती भोसले, विश्वास सावंत, चंद्रकांत कांबळे,अशोक भोसले, अनिल वीर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे  जिल्हामहासचिव यशपाल बनसोडे यांनी आपल्या मधुर आवाजात भीमगीत सादर केली, सरते शेवटी स्नेह भोजनाने सांगता करण्यात आली. दरम्यान युवा शाहीर सत्यवान गायकवाड यांचे निवासस्थानी वर्षावास संपन्न झाला तेव्हा उपासक व उपाशीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अनिल वीर ९४२२६०८८९९,सातारा यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *