
विशेष प्रतिनिधी भांडुप – महाराष्ट्र स्टुडंट युनियन (MASU) मुंबई जिल्हा यांच्या वतीने दिल्ली येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने जो अमानुष लाठीचार्ज केला आहे, त्याचा महाराष्ट्र स्टुडंट युनियन तीव्र शब्दांत निषेध केला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याच्या या कारवाई विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शांततापूर्ण निषेध धरणा करण्यात आले आहे.या आंदोलनात भांडुप च्या विध्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने भर पावसात सहभाग नोंदविला.

सदर आंदोलन हे पूर्णपणे शांततामय, लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने केल्या गेले. धरणे आंदोलनात महापुरुषांच्या नावाने व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ह्या घोषणा देण्यात आल्या.
काजल अरुण वानखेडे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र स्टुडंट युनियन (MASU) या विध्यार्थीनी च्या नेतृत्वाखाली भांडुपचे विध्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.त्यात नेहा वानखेडे,साक्षी कांबळे,वैभव तायडे,भारती मोरे,प्रेम दीप जवंजाळ,साहिल पवार,प्रतीक पवार,आकाश गवई,अर्णित चव्हाण,सार्थक पवार,सुजल लवांडे,परेश खैरमोडे,अक्षय गवई,राज भोसले,राहुल गवई,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट कार्यकर्ते संतोष तायडे, भीमराव तायडे,पत्रकार सागर तायडे,महादेव बांगर,जे.टी.मोरे,माणिक मोरे,अरुण गवई,मिलिंद बोदवडे यांच्या सह सुनिता तायडे,ज्योती थाटे,कोकिळा बांगर,चंद्रकला तायडे,क्रांती इंगळे,रेखा नाईक,रेखा गवई,वंदना इंगळे,पंचफुला खांडेराव,बनाबाई अहिरे,यांच्यासह अनेकांनी भर पावसात उपस्थित दाखवून शांततेने निषेध नोंदविला.मान.डिसीपी चव्हाण साहेब यांनी भिम स्मारक मधू बन गार्डन येथे येऊन काजल अरुण वानखडे उपाध्यक्ष, मुंबई जिल्हा महाराष्ट्र स्टुडंट युनियन (MASU) यांच्या हस्ते निषेध धरण्याचे निवेदन स्वीकारले.
सागर तायडे यांस कडून भांडुप मुंबई
