मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविणभाऊ दरेकर यांचे आवाहन.

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईसारख्या आर्थिक शहरात बेरोजगार आणि सेवा सहकारी संस्थेनी आता स्पर्धेत उतरायला हवे,खाजगी क्षेत्रात पदार्पण करावे असे आवहान मुंबई बँकेचे व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणचे अध्यक्ष मान. आमदार प्रविणभाऊ दरेकर यांनी केले.
मंगळवारी दिनांक २१ ऑक्टोबर रोजी समता हॉल,सूर्योदय हाऊसिंग सोसायटी विक्रोळी पूर्व येथे बेरोजगार आणि सेवा सहकारी संस्थेच्या प्रतिनिधींच्या दिपावली स्नेह संमेलनात ते बोलत होते.या प्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष मान. सिद्धार्थ कांबळे, बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे मार्गदर्शन मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष.व जेष्ठ विद्यमान संचालक मान. नंदकुमार काटकर आणि मुंबई बँकेचे संचालक जिजाबा पवार यांचीही प्रामुख्याने उपस्थितीत या स्नेह संमेलनाच्या मुंबई पूर्व उपनगर बेरोजगार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष विजय केदारे,अँड.प्रमोद तायडे,अँड.चंद्रकांत खर्डे, अविनाश पाटील,शांतीलाल बोरुडे, उदय सर्वगोड, कामगार नेते,पत्रकार सागर तायडे,रवींद्र सूर्यवंशी यांच्यासह बेरोजगार संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपले मनोगत मांडतांना प्रवीण दरेकर म्हणाले की विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असल्याने शोषित,पिढीत वंचितसाठी मी भांडत आलो आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारांच्या संस्थेचे हे विषय विधिमंडळात मांडत आलो.आपण उद्दिष्ट आणि ध्येय मोठे ठेवायला हवे.तुमच्यातील पाच दहा संस्थांनी पुढे यावे. तुम्हाला आर्थिक मदत मुंबई जिल्हा बँक करेल.मुंबई सारख्या आर्थिक शहरात उत्तुंग झेप घेण्याची मानसिकता हवी.

बेरोजगार सेवा संस्था सर्वात ऍक्टिव्ह फेडरेशन.
बेरोजगार सेवा संस्थेच्या आयुष्यात आज जे बदल होता हेत त्यात नंदकुमार काटकर यांचे मोठे योगदान आहे. ज्या सेक्टरचा नेता ऍक्टिव्ह असतो.तो सेक्टर ऍक्टिव्ह असते. मुंबईतील अनेक फेडरेशन पैकी सर्वाधिक ऍक्टिव्ह असणारे फेडरेशन बेरोजगार सेवा संस्थेचे आहे. उपेक्षित,वंचित सर्वसामन्यांच्या विकासांचा मार्ग तुमच्या संस्थेपासून सुरू होऊ शकतो. व या घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करू शकतो. मुंबई बँकेच्या माध्यमातून जो आर्थिक ताकद मागेल ती निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभी करू,असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी दिला.
मुंबई बँकेच्या माध्यमातून गिरणी कामगार, मथाडी कामगार यांना घरासाठी आर्थिक मदत केली. लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली आहे. आज साडेतीनशे महिलांना एका लाखाची बिनव्याजी कर्जाचे धनादेश असे वाटप करण्यात आले आहे.लाडक्या बहिणीचा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये यावा,त्याचा फायद्या महिलांना व्हावा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. याकडे प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधले.या प्रसंगीमुंबई बँकेचे व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणचे अध्यक्ष मान.आमदार प्रविणभाऊ दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष मान.सिद्धार्थ कांबळे, बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे मार्गदर्शन मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष.व जेष्ठ विद्यमान संचालक मान.नंदकुमार काटकर आणि मुंबई बँकेचे संचालक जिजाबा पवार यांच्या सह सर्व मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन उचित सत्कार करण्यात आला.सर्वांना दीपावलीचे फराळ वाटप करण्यात आले.दिपावली स्नेह संमेलन मिलनाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब भोसले,महेंद्र शिंदे,गणेश शिंदे,बाबू शिंदे,स्वप्निल सातपुते, अरुण कांबळे,नेहा कदम यांनी विशेष मेहनत घेतली.प्रास्ताविक अँड.प्रमोद तायडे,यांनी केले तर सूत्रसंचालन उदय सर्वगोड यांनी करून अविनाश पाटील यांनी आभार मानले.
सागर तायडे यांस कडून

