
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५,ठिकाण: सोलापूर / नवी दिल्ली नं;महिलांच्या सन्मानासाठी आणि विधवा प्रथा निर्मूलनासाठी सतत संघर्ष करणारे प्रमोद झिंजाडे (संस्थापक – Widow Free World Movement) यांनी आज भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालय, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) आणि राष्ट्रीय महिला आयोग (NCW) यांना ई-मेलद्वारे एक महत्त्वाचे पत्र पाठवले आहे.
या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की “पतीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी महिलांवर जबरदस्तीने अलंकार काढून विधवा प्रथेच्या नावाखाली अमानवी प्रथा लादली जाते. त्यामुळे देशातील सर्व स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अशा घटनांवर नियंत्रण ठेवावे व दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी पुरावे उपलब्ध व्हावेत.”
झिंजाडे यांनी स्पष्ट केले की हा प्रस्ताव महिलांच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी अत्यावश्यक आहे.हा उपक्रम केवळ सामाजिक चळवळीचा भाग नसून ‘मानवाधिकार संरक्षणाचे नवे पर्व’ ठरू शकतो.या माध्यमातून त्यांनी भारत सरकारला आणि मानव अधिकार संस्थांना आवाहन केले आहे की,
“स्मशानभूमी ही मानवी संवेदनांची जागा आहे,अत्याचाराची नाही.”
आज भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालय, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांना एक महत्त्वाची मागणी पाठवली आहे.
मागणी: देशातील सर्व स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
कारण पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक ठिकाणी महिलांवर जबरदस्तीने अलंकार काढून विधवा प्रथेची अमानवी परंपरा आजही सुरू आहे.
या सीसीटीव्ही नोंदीमुळे अशा घटनांवर नियंत्रण,पुरावे आणि महिलांच्या सन्मानाचे रक्षण शक्य होईल.
चला, विधवा प्रथा मुक्त भारताकडे – Widow Free World Movement
आज भारत सरकार व मानव अधिकार आयोगाला पत्र पाठवले.
देशातील सर्व स्मशानभूमीत #CCTV बसवावेत!
विधवा प्रथेच्या नावाखाली महिलांवर होणारे अमानवी अत्याचार थांबवण्यासाठी हा प्रस्ताव.
प्रमोद झिंजाडे – ७७७५९०३०५२
Founder, Widow Free World Movement
#WidowFreeWorld #WomenDignity #HumanRights #SocialReform #PramodZinjade
