
विशेष प्रतिनिधी कल्याण- ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ट कार्यकर्त्या धम्म उपासिका यांची अत्यंत दुःखद बातमी भदंत गौतमरत्न महाथेरो यांना समजली की, बुद्धभूमी फाउंडेशनच्या सभासद,उपासिका विशाखाताई थोरात यांचे दि. १ एप्रिल २०२६ रोजी जपान येथे सहली दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात दुःखद निधन झाले आहे.
उपासिका विशाखा ताई यांनी बुद्ध,धम्म आणि संघ यांच्याप्रती अपार श्रद्धा ठेवून सामाजिक धार्मिक कार्यात सदैव सक्रिय सहभाग होता.त्यांचे साधेपणा,सेवाभाव आणि धम्मनिष्ठ जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या या अचानक जाण्याने समाजाची आणि बुद्धभूमी परिवाराची मोठी हानी झाली आहे.बुद्धभूमी फाउंडेशनचे भिक्खूसंघ,पेट्रोन मेंबर, लाईफ मेंबर व उपासक उपासिका यांच्या वतीने आम्ही कालकथित विशाखा ताई यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो.त्यांना सुगंति लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना.तसेच,त्यांच्या दुःखद निधनामुळे शोकाकुल झालेल्या थोरात कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.या कठीण प्रसंगी त्यांना धैर्य व सहनशक्ती लाभो. “अनिच्चा वत संखारा…” असे भदंत गौतमरत्न महाथेरो व भिख्खू संघ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


धम्म उपासीका विशाखा थोरात ह्या धम्मा चा प्रचार व प्रसार करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असत. पूज्य भिख्खू संघाशी त्यांचा विशेष संपर्क होता. मैत्री भावना वाढविण्यासाठी धम्म कार्य करणाऱ्या धम्म उपासक उपासिकाशी नेहमीच संवाद करत होत्या. त्या मनमिळवू स्वभावाच्या असल्यामुळे त्या अनेक ठिकाणी महिला धम्म उपासिकांना सोबत घेऊन कार्यक्रम घेत होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले. असे अनेक बौद्ध उपासक,उपासिकांनी खंत व्यक्त केली. कल्याण शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
