एस. के. कॉलेजमध्ये ५ थरांच्या कडक सलामीसह गोपाळकाला उत्साहात संपन्न;

बातमी शेअर करा.

विद्यार्थिनींनीही रचले ३ थर

विशेष प्रतिनिधी | एस. के. कॉलेज: स्थानिक ‘एस. के. COLLEGE’ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव अत्यंत दिमाखात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनमोहक भक्तीनृत्य आणि बाळकृष्णाच्या पाळण्याने वातावरण प्रसन्न केले. या उत्सवात मुलींनी ही आपला विशेष पुढाकार दाखवला. विद्यार्थिनींनी ‘चोर हंडी’ फोडण्यासोबतच स्वतः पुढाकार घेऊन शिस्तबद्ध रीतीने तब्बल ३ थरांचा मानवी मनोरा रचून दहीहंडी यशस्वीरित्या फोडली. यानंतर विद्यार्थ्यांनी ५ थरांची कडक सलामी देत मुख्य दहीहंडी फोडताच संपूर्ण परिसर ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.  
या सोहळ्यातून मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा आणि शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला. “भगवा रक्ताचा, भगवा संस्कृतीचा, सदा गरजत राहील जयघोष शिवछत्रपतींचा! काळ बदलला तरी संस्कृती बदलू देऊ नका आणि इतिहास फक्त वाचायचा नाही, तर तो जपायचा आहे,” या विचारांचा गजर करत विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक मूल्यांची बांधिलकी जपण्याचा निर्धार केला. सर्व उपस्थितांच्या प्रचंड उत्साहात या कार्यक्रमाची सांगता झाली.

सुधीर जाधव- ९८६९४१५५३३,नळवाडीकर,नेरूळ, नवी मुंबई यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *