
आम्ही जन्मापासून ऐकत आलो आहोत की,रमाईं ह्या दुःखी सहन करणारी शोषित, कष्टी,दुबळी व करुणामय असणारी रमाई! म्हणजेच सौ. रमाबाई भिमराव आंबेडकर ह्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यावर कुणीही दुःख कष्ट किंवा हाल अपेष्टा लादलेल्या नाहीत रमाईने स्वतःहून सुखाचा त्याग मानव मुक्ती करिता केला आहे जेव्हा स्वतःहून त्याग केला जातो तेव्हाच त्यागमुर्ती होता येत रमाईला त्यागमूर्ती म्हटल्या गेले आहे. आपण रमाईं म्हणजे दुःखी सहन करणारी शोषित, कष्टी,दुबळी व करुणामय असणारी रमाई! इतकेच आपणं बघतोय परंतू तसे नसून रमाई ह्या म्हणजेच सौ.रमाबाई भिमराव आंबेडकर ह्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यावर कुणीही दुःख कष्ट किंवा हाल अपेष्टा लादलेल्या नाहीत रमाईने स्वतःहून सुखाचा त्याग मानव मुक्ती करिता केला आहे जेव्हा स्वतःहून त्याग केला जातो तेव्हाच त्यागमुर्ती होता येत रमाईला त्यागमूर्ती म्हटल्या जाते.
रमाई ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्वाधार होता.बाबासाहेब या जगाला माहिती आहे त्यात रमाईचे फार मोठे योगदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन उच्च विद्या विभूषित होऊ शकले. एम ए पी एच डी बॅरिस्टर पत्रकार व मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज प्राचार्य या सर्वामध्ये रमाई चे योगदान आहे ते नाकारता येत नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचे चवदार तळ १९२७ सत्याग्रह,सन १९३० चा नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह व सन १९३१व १९३२ला लंडनमध्ये गोलमेज परिषद या सर्वामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ प्रचंड वेगवान झाल्यामुळे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आणि एकंदरीत तथाकथित व्यवस्थेला ते पचनी पडले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मनुवादी व्यवस्थेला अजीर्ण झाले त्यामुळे त्यांच्या मारण्याची धमकीचे पत्र यायचे ते ऐकून रमाईला भीती वाटली परंतु त्या भीतीपोटी कधी बाबासाहेबांना त्यांच्या कार्यापासून वेगळे होण्याचा विचार देखील त्यांनी मांडला नाही हे सर्व प्रकार पत्नी म्हणून जरी वाटत असला तरी देखील रमाई घाबरल्या नाहीत खंबीरपणे साहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या हे सर्व प्रकार रमाईच्या एक स्वतंत्र व्यक्ती महत्त्वाची जाणीव करून देणारा प्रसंग आहे.
बाबासाहेब विदेशात असताना त्यांना अनेक लोक मदत करण्यासाठी येत होते किंवा रमाईने प्रचंड हालाखीची परिस्थिती असताना देखील कोणत्याही प्रकारची मदत स्वीकारली नाही आणि प्रखर स्वाभिमान कायम जपला आहे. तसेच मातोश्री रमाईनी एकत्रित संसाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली यांतच रमाई व बाबासाहेब यांची चार मुले मृत्युमुखी पडले गंगाधर इंदू रमेश आणि बाबासाहेबांचा अत्यंत लाडका राजरत्न तेव्हा देखील रमाई खचल्या नाहीत परिस्थितीशी तडजोड केली नाही खंबीरपणे उभ्या राहिल्या.गंगाधर मरण पावला तेव्हा बाबासाहेबांना रमाई पत्रातून लिहिते साहेब! आपल्या गंगाधरला मी वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु उपचारा अभावी त्याला वाचवू शकली नाही.काय वेदना असतील माऊलीच्या पोटचा गोळा मरण पावला आहे आणि पती विदेशात आहे मोठ्या जड अंतःकरणाने या पत्राद्वारे लिहीत आहे. या प्रसंगातून रमाईची मानसिक अवस्था प्रगल्भ असल्याचे जाणवते.माता रमाईनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या झालेला पत्रातून दिसून येते.
रमाई आणि बाबासाहेब दोघांनीही समाजाला आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतले ते करण्यामागे तथागत बुद्धांचा आदर्श या दांपत्यांनी आपल्या जीवनात घेतला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाली त्यावेळी केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले हस्तलिखित बुद्ध चरित्रातील विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाई यांच्या जीवनात वेळोवेळी बुद्धांचे विचाराने प्रभावित झाले आणि आपल्या जीवनात उतरविला आहे.तथागत बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये पती-पत्नीसाठी जे विनय सांगितलेले आहे त्या विनयाचे पालन करून एक आदर्श दांपत्य समाजापुढे ठेवले आहे.बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली त्यावेळी माता रमाई या हयात नव्हत्या माता रमाई चे निधन 27 मे 1935 ला दीर्घ आजारामुळे झाले आहे.रमाईने समाजासाठी अविरत चालविलेल्या लढ्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोकून दिले त्यातूनच त्यांना आजाराने घेरले व त्यातच त्यांचे निधन झाले. म्हणजे रमाईचे समाजाप्रती दिलेले बलिदान आहे असे म्हटले गेले तर वाव ठरणार नाही माता यशोधरेचा त्याग हा माता रमाई संपूर्ण आयुष्यात आदर्श होता.बुद्धांचा विचाराने आपलं जीवन प्रभावित करून प्रत्यक्षात अनेक वेळा रमाई जगल्याचे पाहायला मिळते.रमाई चे विचार कुठेही लिखित स्वरूपात नसले तरी देखील त्यांच्या आयुष्यात जगताना त्यांच्या कृतीतून प्रत्येक प्रसंगातून ते अधोरेखित होताना आजही दिसते आहे.अशा महामानवाला मातोश्री रमाईला त्यांच्या जयंतीदिनी मी कोटी कोटी वंदन करिते!
ऍड.अस्मिता टिपले ७०३८७३०५०३,वर्धा.

