आजच्या काळात मुलाच्या जीवनातील संघर्ष आणि त्याच्यावर टाकल्या जाणाऱ्या अपेक्षांबद्दल बोलणे महत्त्वाचे झाले आहे.भारतीय समाजात मुलाला नेहमीच जबाबदाऱ्यांचा केंद्रबिंदू मानले जाते.तो घराचा आधारस्तंभ असेल,आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडणारा असेल,आणि कुटुंबासाठी सर्व काही करणारा असेल,अशी एक पिढ्यान् पिढ्या चालत आलेली धारणा आहे.मात्र,या जबाबदाऱ्यांमुळे मुलांना प्रचंड मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दबाव सहन करावा लागतो.
मुलाचा संघर्ष: अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मुलगा जन्माला आल्यानंतरच त्याच्यावर अनेक अपेक्षा लादल्या जातात.शिक्षणामध्ये यश मिळवून मोठ्या पदावर जाणे, घरच्यांना आर्थिक स्थैर्य देणे,आणि कुटुंबाची प्रतिष्ठा टिकवणे यांसारख्या अपेक्षा त्याच्या आयुष्याचा भाग बनतात.त्याला चांगले गुण मिळवावे लागतात, चांगली नोकरी मिळवून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे लागते.घरच्यांच्या अपेक्षांमुळे मुलांच्या आयुष्यातील साधेपणा हरवतो.समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्याच्यावर केलेला दबाव कधी कधी त्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांपर्यंत नेतो.त्याला स्वतःचे स्वप्न पाहण्याचीही संधी मिळत नाही.
-प्रशांत खंदारे