फुले-शाहू-आंबेडकरी कामगार चळवळीला नवे बळ; ‘महात्मा जोतिराव फुले कामगार भवनाची’ शंकरपूर येथे मुहूर्तमेढ

बातमी शेअर करा.

माननीय जे. एस. पाटील साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त स्वतंत्र मजदूर युनियनच्या राष्ट्रीय कामगार भवनाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न.

विशेष प्रतिनिधी नागपूर | शंकरपूर: स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते आणि फुले-शाहू-आंबेडकरी कामगार चळवळीचे खंबीर नेतृत्व माननीय जे. एस. पाटील साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंकरपूर, नागपूर येथे स्वतंत्र मजदूर युनियनच्या प्रस्तावित राष्ट्रीय भवनाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.स्वतंत्र मजदूर युनियन च्या या प्रस्तावित राष्ट्रीय भवनाला ‘महात्मा जोतिराव फुले कामगार भवन’ असे नामकरण करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि शोषित-वंचित घटकांच्या हक्कांसाठीच्या विचारांना अभिवादन करणारे हे भवन फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर आधारित कामगार चळवळीचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.


महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा, शिक्षण, स्वातंत्र्य आणि न्यायासाठी दिलेल्या योगदानातून प्रेरणा घेत कामगारांच्या हक्कांसाठी संघटित संघर्ष उभारण्याचे कार्य स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून पुढे नेले जात आहे. या चळवळीला राष्ट्रीय पातळीवर अधिक बळ देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले कामगार भवन’ निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल.या भूमिपूजन सोहळ्यास स्वतंत्र मजदूर युनियनचे वरिष्ठ उपाध्यक्ष के.पी.स्वामीनाथन सर (तमिळनाडू), महासचिव ए. व्ही. किरण सर (तेलंगणा), उपाध्यक्ष विकास गौर (महाराष्ट्र), सचदेव साहेब (मध्यप्रदेश) तसेच विविध राज्यांतून आलेले संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजय घोडके सर, सरचिटणीस संजय मोरे सर, तसेच महापारेषणचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले एजीएम राजू गायकवाड सर, कार्यकारी संचालक उत्तम झालटे साहेब, निवृत्त मुख्य अभियंता बंडू वासनिक साहेब, निवृत्त अधिक्षक अभियंता सहारे साहेब, वाय. डी. मेश्राम साहेब यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर आधारित कामगार चळवळीला अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. कामगारांच्या न्याय्य हक्क यांसोबतच सामाजिक समता, बंधुता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यासाठी संघर्ष करण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला.


माननीय जे. एस. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील कामगार चळवळीला राष्ट्रीय स्तरावर एक सशक्त आणि कायमस्वरूपी विचारमंच मिळणार असून, ‘महात्मा जोतिराव फुले कामगार भवन’ हे भविष्यात कामगारांच्या प्रश्नांवर विचारमंथन, संघटन, प्रशिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.याप्रसंगी माननीय राजू गायकवाड साहेब यांचा निवृत्तीपर यथोचित सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच मागासवर्गीय संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके साहेब व शैलेश वाशिमकर साहेब यांची कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती झाल्याबाबत यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच नागपूर परिमंडळ महावितरण अंतर्गत नुकतेच पार पाडलेल्या नाट्य महा कुंभामध्ये थलाई कुथल या नाटकाने पहिला क्रमांक पटकाविला व त्यात प्रमुख भूमिका साकारणारे असित रामटेके साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.


विविध राज्यांतून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भूमिपूजन सोहळ्याला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. माननीय जे. एस. पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महात्मा जोतिराव फुले कामगार भवन’ या ऐतिहासिक वास्तूची मुहूर्तमेढ रोवण्यात आली, हा स्वतंत्र मजदूर युनियनच्या वाटचालीतील अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला.माननीय जे. एस. पाटील साहेब यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! दिल्या.

निशा चौधरी नागपूर यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *