
देशाचं भविष्य आपुल्या तरुणाई आहे…
राज्य कर्त्यांना कळणार कधी, हेच सत्य आहे…१
तरुणाईच्या या विजयात, शिव फुले शाहू आंबेडकर विचारांच सार आहे…
*प्रधान* मंत्र्यांचा राजीनामा हिच तर सरकारची हार आहे…२
असो कुणीही राजा सत्तेचा, तो प्रजेचा तारणहार पाहिजे…
नरेंद्र,देवेंद्र नि प्रधान
हि तर हुकूमशाहीची प्रतिके आहे… ३
देशाचं अपुले भविष्य तरुणाई, तयावर लाठी-अत्याचार आहे…
त्या प्रधानाच्या घराला आजही कडेकोट बंदोबस्त आहे…४
जे म्हणती तरुणाईला झुरळ, तयांनी ऐकावी शिव-शंभुंची गाथा…
महाराष्ट्राच्या या तरुणाईने दिल्लीच्या तख्तालाही मारल्या होत्या लाथा… ५
याच हिम्मतीने अन्यायाच्या अंधारातही लढला दीपक जंतर-मंतरला…
संविधानाचा गनिमा समजुन काॅक्रोज विजयी ठरला…
कवी गौतमकुमार निकम,(पत्रकार,लेखक)
सुसंवाद-९८२२०६७०५५,चाळीसगांव

