कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन,कंत्राटी कामगारांनी कुणाकडे न्याय मागावा?.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी – भंडारा नगरपरिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांची विविध मागण्यासाठी १७ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार कामबंद आंदोलन सुरु झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेता रातोरात नवीन ठेकेदाराची नियुक्ती.सनदशीर मार्गाने न्याय मांगने गुन्हा आहे काय?. याबाबत पत्रकार परिषदे घेऊन कामगारांच्या समस्या व मागण्याकडे शासनाचे व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. भंडारा शहरातील घरोघरी घंटागाडीच्या माध्यमातून ओला सुका कचरा,पाडकाम कचरा गोळा करणे रास्ते पेवर ब्लॉक, डिव्हायडर तसेच सार्वजनिक ठिकाणावरील कचरा धुळ,प्लास्टिक कागद,माती,गाळ, चिखल, वैद्यकीय कचरा उचलणे सार्वजनिक कचरा कुंडीतील कचरा वाहून नेणे बागेतील कचरा उचलणे मृत जनावराचे विल्हेवाट लावणे. आधी स्वच्छतेचे महत्त्वाची कामे हे कामगार करीत असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगण्यात आले शहर स्वच्छता ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या या कामगाराचे मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला,महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या नियमानुसार किमान वेतन प्रमाणे मासिक वेतन २१ हजार ८०० रुपये देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले, मात्र कंत्राटदार राजीव भगत यांच्या कडून कंत्राटी सफाई कामगारांना केवळ ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय कामगारांना शासनाचा नियमानुसार आवश्यक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोपही करण्याचा आला.

स्वच्छतेच्या कामादरम्यान विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांचा धोका असताना कामगारांच्या आरोग्याचे सुरक्षा कडे दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या समस्याबाबत भंडारा नगर परिषद प्रशासनासह मुख्यमंत्री,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आली आहेत मात्र अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याने अखेर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकार परिषद मध्ये स्पष्ट सांगण्यात आले होते.१७ सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू झाल्यास शहरातील कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याचे शक्यता आहे. शासन व नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यावर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली पत्रकार परिषदेला ऍड.नरेंद्र आनंद गोंडाने (कार्याध्यक्ष तथा कायदेविषयक सल्लागार) गणेश उके (महासचिव स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य) राजकुमार साकोरे अध्यक्ष स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन,लोकेश उकरे सरचिटणीस, राजेश भुरे संघटक सचिव,संजय केवट यांनी केली होती. पण या गंभीर मागण्याकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी (सी ओ) साहेबांनी नवीन ठेकेदारांची कंत्राटी कामगार कामावर ठेऊन मनमानी सुरु केली. महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन नागपूर विभागाचे विभागीय सह आयुक्त यांनी व महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय उपयुक्त यांनी लेखी पत्र दिल्यावर ही मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा दखल घेत नाही.अशा वेळी पंधरा वीस वर्ष काम केलेल्या कंत्राटी कामगारांनी कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न कंत्राटी कामगार विचारत आहेत असे राजकुमार साकोरे अध्यक्ष स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन यांनी सांगितले.

गणेश उके-८२७५३९६२०३,नागपूर यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *