वर्षावास प्रारंभ आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा)

बातमी शेअर करा.

बौध्द धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेला विशेष महत्व आहे.कारण या दिवशी भगवंताच्या जिवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे.त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली.दूसरी घटना म्हणजे भगवंतानी सारनाथ या ठिकाणी पहिले धम्मचक्र प्रवर्तन करून आपल्या पाच शिष्याना प्रथम धम्मोपदेश दिला.त्यामुळे या शिष्यानी भगवंताला आपले गुरु मानले.म्हणून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.तिसरी घटना म्हणजेच याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली.अश्या अनेक महत्वपूर्ण घटना संयोगाने याच दिवशी घडल्या आहे.

    तसेच वर्षावास परंपरेला देखील धम्मामध्ये अतिशय महत्व असून ही बुध्दकाळापासून चालत आलेली परंपरा आहे.याचे महत्व स्वतः तथागत भगवान बुध्द यांनी अनेक ठिकाणी वर्षावास करून पुजनीय भिक्खू संघ व श्रद्धावान उपासकांच्या समोर आदर्श ठेवले आहे.या दिवशी आषाढ पौर्णिमेला जगभरातील पुजनीय भिक्खू संघाकडून वर्षावासाचा प्रारंभ करण्यात येतो.ह्या वर्षावासाचा कालावधी हा आषाढ ते आश्विन असा तिन महिन्याचा असतो.त्यामुळे तिन महिने सर्वत्र प्रत्येक बुध्दविहारात विपश्यना (ध्यानसाधना) त्रिरत्न वंदना,परित्राणपाठ,धम्मदेसना,बुध्द आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन,उपोसथ आदी.कृतिकार्यक्रम सुरु करण्यात येतात.त्यामुळे आपण देखील या तिन महिन्यामध्ये शक्य होईल तेव्हा सहपरिवार बुद्धविहारात अथवा बुद्ध लेणी वर जावून या कृति कार्यक्रमा मध्ये प्रत्यक्ष आवर्जून सहभागी व्हावे.व इतरांना देखील सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच स्वतःच्या घरी देखील आपल्याला तिन महिन्यात धम्म आचरण करून हे सुख मिळविता येईल त्यासाठी खालील सम्यक संकल्प यांना प्रत्यक्ष कृतिची जोड देणे आवश्यक आहे.

     दररोज शक्य असेल तितके बुध्द आणि त्यांचा धम्म धम्म ग्रंथाचे श्रद्धापूर्वक वाचन करावे. चर्चा कराव्या.चिंतन करावे.किंवा ऑडियो स्वरूपात श्रवण करावे.वर्षा वासा दरम्यान पुजनीय भिक्खू संघाला भोजनदान करावे. त्यासाठी घरी किंवा आपल्या गावातील बुध्द विहारात भोजनदानासाठी आमंत्रित करून पुण्य अर्जित करावे.त्यादिवशी घरी सामूहिक ध्यानसाधना,परित्राणपाठ व धम्मदेसना आयोजित करून आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवार व शेजारी सर्वांना धम्म श्रवण करण्यासाठी निमंत्रित करावे.

     वर्षावासा दरम्यान भोजनदाना व्यतिरिक्त भिक्खूना चिवरदान,औषधी,प्रवासख़र्च तसेच धम्मकार्य करण्यासाठी आवश्यक असलेली साधने दान स्वरूपात द्यावी.किंवा जिथे भिक्खू नसतील आपन वर्षावास कालावधीत भिक्खूला आमंत्रित करुन,चिवर,भोजन प्रवास खर्च दान देऊन घरी धम्मदेशना वंदना कारेक्रम आयोजित करु शकता.उपासक उपासिकांनो. वर्षावास हा जरी पुजनीय भिक्खू संघाचा असला तरीदेखील उपासकांच्या बाबतीत सुद्धा तो तितकाच महत्वाचा आहे.कारण प्रत्येकाचे धम्मआचरण सुधारण्यासाठी व पुण्यअर्जित करण्यासाठी ही संधी आहे.त्यामुळे वर्षातील हे तिन महीने धम्माच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे.वर्षावासाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी या तिन महिन्यामध्ये धम्म चर्चा,धम्म श्रवण,धम्म आचरण करून वर्षावास निमित्त ठिकाणी ठिकाणी कार्यक्रम आयोजन करून ते यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने तन मन धनाने सहकार्य करावे.

सर्वांना वर्षावासासाठी मनःपूर्वक मंगल कामना..

सर्वांचे मंगल हो..

आयु.सागर रामभाऊ तायडे -9920403859,

धम्म उपासक,धम्म अभ्यासक,प्रचारक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *