

परीक्षा 21 जून रोजी पार पडल्या त्याचे पडसाद उमटले असून उद्या 27 जून रोजी CET परीक्षेसाठी पवई केंद्र निश्चित करण्यात आले असून, राज्यभरातून विध्यार्थी व पालक तसेच हितचिंतकांना यावे लागते. जालना बीड, रत्नागिरी ते जळगाव येथून विध्यार्थ्यांना येतेवेळी तारेवरची कसरत करावी लागते. अनंत अडचणीचा सामना करीत येत असताना, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रात्रभर प्रवास केल्याने आलेली मरगळ, फ्रेश होण्यासाठी आवश्यक असल्याने पवईसह उपनगरांमध्ये असलेली महागडी व खिशाला न परवडणारी हॉटेल्स, यामध्ये तळागाळातून पुढे येऊ पाहणाऱ्या विध्यार्थी व पालकाचे किती हाल होतात हे आम्ही जवळून पाहिले आहे. त्यामध्ये दोन मिनिटांचा उशीर झाला तरी परीक्षा केंद्राचे दरवाजे (गेट) बंद केले जातात. परिणामत: पालकांना तर धक्का बसतोच,पण विध्यार्थी वर्ग फक्त कोमात जायचा बाकी राहतो.
सरकार कुंभ मेळ्यासारख्या धार्मिक उपक्रमावर काही कोटी खर्च करत असते त्याऐवजी देशाच्या भावी नागरिकांवर खर्च करावा अशी आम्ही राज्यभरातील समस्त विध्यार्थी व पालकांच्या वतीने मागणी करत आहोत.अनेक गोष्टीवर या विध्यार्थी, व पालकांची सोय शासकीय खर्चातून व्हावा ही माफक अपेक्षा आहे. त्याचबरोबर सध्या संगणक सुविधा असल्यामुळे दहावी-बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणेच प्रत्येक जिल्हास्तरावर मान. जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली या परीक्षा व्हाव्यात, जेणेकरून शासकीय यंत्रणेवर ताण पडणार नाही व विध्यार्थी वर्गालाही मानसिक ताण होणार नाही. राज्याचे मान.शिक्षण मंत्री व मान. मुख्यमंत्री महोदय या महत्वाच्या प्रश्नी लक्ष दे तील ही अपेक्षा बाळगायची काय?
गुणाजी काजिर्डेकर,९३२३६३२३२० चेंबूर

