नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ वाकड पुणे चा चौथा वर्धापन दिन थाटात संपन्न झाला.

बातमी शेअर करा.

 विशेष प्रतिनिधी – स्थानिक वाकड परिसरात असलेल्या नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ वाकड चा चौथा वर्धापन दिन सनमेड हॉस्पिटलच्या सभागृहात थाटात साजरा करण्यात आला.संघाचे अध्यक्ष श्री रमेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झालेल्या या कार्यक्रमात, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ,परिसरातील ज्येष्ठ यूरॉलॉजिस्ट व अँड्रालॉजिस्ट डॉक्टर सुनील पालवे,हॉस्पिटल सनमेडचे व्यवस्थापकीय प्रमुख श्री.आश्विन ओहाळ व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा विषयी चे मार्गदर्शक श्री.शिवाजीराव गोजे प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलना नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. प्रतिभा आढाऊ, अरुणा अरूलकर,व सौ.नंदा सातपुते यांच्या स्वागत गीता नंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


        पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांनी आपल्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण केलेल्या विविध कार्याची माहिती देऊन सद्यस्थितीत महासंघाचे १५० च्या वर विविध ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य असल्याची माहिती दिली.तसेच नूतन ज्येष्ठ नागरिक संघांना महासंघाचे सदस्य होण्याचे व त्या योगे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीसाठी आपण नेहमी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक महासंघासाठी भव्य इमारतीचेही बांधकाम प्रस्ताविक असून त्याची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.


    डॉक्टर सुनील पालवे यांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधारणता: 60 वर्षानंतर उत्पन्न होणाऱ्या प्रोस्टेट च्या विकार संबधी कल्पना देऊन  त्यावरील उपचारांची माहिती दिली. गोजे यांनी जेष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच एकट्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल व अन्य आवश्यक वस्तूंची घरपोच सेवा अल्प दरात देत असल्याचीही माहिती दिली. सनमेडचे आश्विन ओहाळ यांनी जेष्ठांच्या सेवेसाठी तसेच कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी सनमेड हॉस्पिटल व त्यांचे कर्मचारी नेहमी तत्पर असल्याचे सांगितले.
       आपल्या अध्यक्षीय भाषणात नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाटचालीचा आढावा घेताना संघाचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश राऊत म्हणाले चार वर्षांपूर्वी 12 ऑक्टोबर 22 रोजी काही मोजक्या सहकाऱ्यासह सुरू केलेल्या या संघाची एप्रिल 26 मध्ये नोंदणी असली तरीही स्थापनेपासून आज चार वर्ष झाली आहेत व आज 140 चे वर नोंदणीकृत सभासद असल्याची माहिती दिली. दररोज सकाळी योगा शारीरिक व्यायाम पंचांग सुविचार व मनोरंजनात्मक कार्यक्रम. सदस्यांचे जन्म, लग्न वाढदिवस, शुभेच्छा असे कार्यक्रम संघ घेतले जातात.संघ आपल्या सदस्यांच्या शारीरिक तसेच बौद्धिक विकासाबाबतही जागरूक आहे. त्यासाठी संघातील ज्येष्ठ व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री. अरुण कांबळे सर यांनी सदस्यांसाठी मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गणितीय कोड्यातून सदस्यांमधील बुद्धीला चालना तसेच तार्किक  दृष्टिकोन  विकसित करण्यासाठी ही संधी दिल्या जाते. तसेच दर गुरुवारी चला व्यासपीठावर या माध्यमातून सदस्यांमधील वक्तृत्व गुणाला विकसित करण्यासाठी ही  कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.


    15 ऑगस्ट, 26 जानेवारी सारखे राष्ट्रीय उत्सवा सोबतच राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करून त्यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतल्या जातो. धार्मिक, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या तसेच निसर्गरम्य ठिकाणच्या सहलींचेही आयोजन केल्या जाते. आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या दिंडीला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.या प्रसंगी श्री.सखाराम धवसे सर,श्री.दिलीप शेटे,श्री.प्रकाश चौरसिया,श्रीमती अरुणा मुंगी,व सनमेडच्या सुनिता सिस्टर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांनी ज्येष्ठ नागरिक संघाला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमा दरम्यान 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या भालचंद्र ठोंबरे यांचा तसेच संस्थेला देणगी देणाऱ्या श्री.अरुण कांबळे श्री.नेमाजी ढोबळे श्री.नेमाज ढोबळे, श्री.हिंदुराव साळुंखे, श्री.निरंजन पवनीकर,श्री.नरेंद्र आढाव पाटील, श्री.दिलीप सावंत, श्री.लक्ष्मीकांत जवळेकर, श्री.रमेश गंधेवा,व श्री.दीपक देशमुख, तसेच श्रीमती अरुणा मुंगी यांचा सत्कार करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र ठोंबरे यांनी तर सत्कार कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष एकनाथ पंडित यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.लक्ष्मीकांत जवळेकर यांनी केले. पसायदान व त्यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *