नैराश्य हाच खूप मोठा प्रश्न आहे.काही दिवसापासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील विद्यार्थी हे सततच्या तणावाच्या वातावरणात स्वत:ला असुरक्षित समजू लागल्याचे चित्र उभे राहिले आहे.स्पर्धा परीक्षा फक्त UPSC किंवा MPSC या दोनच आहेत असे नाही JEE, NEET, SSC, RAILWAY, असे सर्व स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच अभ्यास आपण वर्षाणू वर्ष करत आहोत आपल्याला आणि आपल्या पाल्याला सुद्धा अशा असते की सरकारी नौकरी वर लागू किंवा माझा मुलगा,मुलगी लागेल पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्या मुळे पदापासून वंचित राहतो.योग्य मार्गदर्शनाचा अभाव : स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शनाचे महत्त्व नाकारता येत नाही.जरी आपली एकलव्य व अर्जुन अशी दोघांना सामावून घेणारी संस्कृती असली,तरी आजच्या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे.शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन क्वचितच एखाद्या शाळेत वा महाविद्यालयात विकसित केला जातो.असे असताना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना महाविद्यालयीन अभ्यासाची विद्यापीठीय पद्धती बाजूला सारून त्या अभ्यासक्रमाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक असते.कष्ट करूनही अपेक्षित यश मिळणे : जर योग्य मार्गदर्शन नसेल,तर बऱ्याचदा कष्टाचे रूपांतर यशात होत नाही.खूप कष्ट करून अभ्यासात पूर्ण वेळ लक्ष घालूनही यश मिळत नसेल,तर नैराश्य येणे साहजिकच आहे.
सध्याची परीक्षा प्रणालीच्या दबावामुळे अप्रिय मानसिक परिस्थिती विद्यार्थ्यांत निर्माण होत आहे.परीक्षेच्या दबावामुळे परीक्षेचा ताण व चिंतेत वाढ होऊन ज्याचा विद्यार्थ्यांवर परीक्षेपूर्वी आणि नंतर परिणाम होतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात तणावाची विविध कारणे असून,खूप असाईनमेंट,इतर विद्यार्थ्यांशी मार्क्स बद्दलची स्पर्धा,अपयश,वाईट सवयी,सतत अभ्यासाचा अत्याधिक दबावाचा परिणाम परीक्षेच्या काळात विद्यार्थी वर होतो.परीक्षेच्या ताण-तणावाखाली अल्पवयीन मुला-मुलींच्या वाढत्या आत्महत्या ही एक मुख्य समस्या झाली आहे. त्यामुळे मुले-मुली कोणतीही कारणामुळे नैराश्यात जातात आणि जीवन संपविण्याचा विचार करतात.यासाठी आता पालकांनी मुलांशी सतत संवाद साधणे गरजेचे बनले आहे.मुलांकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा,इतर मुलांशी तुलना करणे आदी कारणामुळे मुले नैराश्यात जात असल्याचे दिसून येते.नैराश्यात जाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे मोबाईल, टीव्हीमध्ये व्यस्त असून, समाजाचे भान विसरणे,अति जागरण करणे.आत्मविश्वास कमी होऊन भीती अनुभव करणे.अति राग, चिडचिड स्वभाव,भोजनास महत्त्व न देणे,आत्महत्येसारखे टोकाचे विचार सतत येणे. यासह इतर कारणांमुळे विद्यार्थी नैराश्य ग्रस्त असल्याचे दिसून येते.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे,तर व्यक्तिमत्वाची देखील मोठी भूमिका असते.चांगले व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य स्वरूप नव्हे,तर मानसिकता,आत्मविश्वास,आणि ताण-तणाव व्यवस्थापनाची क्षमता देखील.आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा महत्वपूर्ण भाग आहे.अभ्यास करताना लहानसहान यशांचा आनंद घ्या आणि स्वत:वर विश्वास ठेवा.आत्मविश्वासामुळे परीक्षेच्या ताणातून बाहेर पडता येते आणि तयारीत सातत्य ठेवता येते.धैर्य आणि संयम स्पर्धा परीक्षा म्हणजे दीर्घकालीन प्रयत्नांची गरज असते.धैर्याने आणि संयमाने पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. सततच्या अपयशामुळे निराश होऊ नका,तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा.स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तणाव येणे सामान्य आहे.तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.ध्यानधारणा,योगा,आणि शारीरिक व्यायाम यांचा समावेश करा.नियमित ताणतणाव व्यवस्थापन तंत्रांचा वापर केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.नेहमी सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मकता तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्वत:शी संवाद साधा आणि आपल्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करा.आपल्या गुणांवर विश्वास ठेवा आणि सतत आत्मपरीक्षण करा.
आपले यश आणि अपयश यांचे नियमित आत्मपरीक्षण करा. आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे हे ओळखा आणि त्यावर काम करा. काही वेळा आपण चुकीच्या गोष्टी कडे वडतो आणि आपल्याला भान नसतो आणि स्वप्न बघत बसतो जसे की कुठल्या तरी वेगळ्याच विषयात मन लावून घेतो,आणि आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत या वास्तविकतेकडे पाठ फिरवणे.आजून परीक्षेस खूप वेळ आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे.परीक्षा पद्धतीत दोष आहे, शिक्षण पद्धतीत दोष आहे असे मानून, स्वतःला योग्य सिद्ध करून तणावमुक्त होणे.
अधिकारी झाल्याची स्वप्ने रंगवत बसणे. असे केल्याने तात्पुरता ताण जातो.जर यश हवा असेल तर प्रॅटिकल विचार करणे.सर्वप्रथम पहिली पायरी आहे,तणाव ओळखणे. तणाव जर ओळखताच आला नाही तर त्याचाशी सामना कसा करणार? त्यामुळे आपल्या आलेला ताण ओळखता आला पाहिजे. तणावाची लक्षणे आपल्यावर आपण सावध झालो पाहिजे.स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिमत्वाचा विकास केल्याने तुमच्या अभ्यासात सुधारणा होईल.
सकारात्मक राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे ठेवा अवघड पेक्षा अवघड गोष्ट सोपं वाटेल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरनात आणावे कारण आत्मविश्वास आणि अटीट्युड निर्माण होईल. काहीही नसताना समाजसुधाराने साठी मोठे लढले आणि आपल्याकडे सर्व अभ्यासातील पुस्तके उपलब्ध आहेत,मार्गदर्शक आहेत मग आपण का माघे राहायचं आता पासून तयारी करूयात आणि वर्षभरात अधिकारी होऊयात आणि आपल्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण करू मार्गदर्शन हवा असेल तर मी आहे मित्रांनो तुमच्या सोबत मला संपर्क साधा.फक्त स्वतः वर विश्वास ठेवा आणि आव्हानांना सामोरी जा आयुष्यात आव्हान नसतील तर आयुष्यात जगण्याची मझाच काय.योग्य नियोजन करा आणि नैराश्य जाऊद्या चुलीत आणि अधिकारी व्हा रुबाब जगा.अखिल सर 9595943996/ 9623272804 (भंडारा, तुमसर )
संचालक MPSC HUB, मोटिवेटर, बिजनेस कोच,लेखक,संपादक
