रा.सु.गवई म्हणजेच रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई

कसेल त्यांची जमीन,नसेल त्याचे काय?.राहील त्यांचे घर नसेल त्यांचे काय ?. कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड यांच्या नेतृत्वखाली आणि भूमिहिनांचा सत्याग्रहाने ग्रामीण भागात अनेक नेतृत्व तयार केले.त्यात लक्षवेधी ठरले ते विदर्भातील रा.सु.गवई जन आंदोलनामुळेच गवई साहेबांनी बाबासाहेबांच्या स्वाभिमानी लोकचळवळीचे आणि दादासाहेबांच्या भूमिहिनांचे नेतृत्व तडजोडीच्या शैलीने रा.सु गवई साहेबांनी पुढे चालविले. बाबासाहेबांनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने समितीचा प्रमुख हिस्सा म्हणून यशस्वी राजकीय वाटचाल केली. आज पर्यंत रा.सु.गवई साहेबांचा नकारात्मक पैलूच चळवळीच्या अभ्यासकां कडून ऐकायला व पाहायला मिळाला. ज्या काळात गवईसाहेबांचा चळवळीत प्रवेश झाला तो काळ आंबेडकरवादी चळवळीने तरुणांना भारावलेला काळ होता. भूमिहीनांच्या राष्ट्रव्यापी सत्यागृहातून देशभरात शे.का.फे ची राजकीय शक्ती वेगवेगळ्यां राज्याच्या लोकप्रतिनिधिंच्या रुपात दिसून आली. शे.का.फे.चे राज्याच्या विधानमंडळात व केंद्राच्या संसदेत प्रतिनिधी निवडून आले. बाबासाहेबांची स्वाभिमानी राजकीय चळवळ प्रमूख विरोधी पक्ष बनविण्याच्या दिशेने वेगात वाटचाल सुरु झाली.
राष्ट्रव्यापी जनाधार निर्णायक स्वरुपात निर्माण तर झालाच त्याचबरोबर पक्षाला प्रभावी नेतृत्व देऊ शकणारा देशभरात नेत्यांचा फार मोठा वर्ग तयार झाला. हि बाब येथील जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त रणनितिवर राजकारण करणार्या प्रस्थापित राजकीय पक्षांना न पचणारी बाब होती. आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात होता. हे केंद्रच उध्वस्त केले तर देशभरात विस्तृत झालेली चळवळ सहज मोडीत काढता येऊ शकेल म्हणून काँग्रेसने आपला मोर्चा सक्रिय केला. १९६७ ला काँग्रेस रिपब्लिकन युती घडवून आणली. या वेळी दादासाहेब गायकवाड आजारी असायचे त्यामुळे चळवळीचे सुत्र आदरनीय शांताबाई दानी व रा.सु.गवई यांच्या मार्फत समाजाभिमूख होऊ लागली.युती झाली आणि देशभरातील आंबेडकरवादी चळवळी काँग्रेसने गिळंकृत केली.काँग्रेसने स्वाभिमानी चळवळ गिळली आणि देशभरातील मोजक्या कार्यकर्त्यांना रोजीरोटीचे बळ दिले. आज महाराष्ट्रातील जितके आरपीआय चे कार्यकर्ते नेते आहेत त्यांचे सर्वांचे कुटुंबातील काही लोक काँग्रेसची गुलामी करत आहेत. हे सर्व नावासह सांगता येऊ शकते.पण त्यात धोका जास्त आहे कारण सत्य पचविण्याची मानसिक शक्ती त्यांच्यात नाही. रा.सु.गवई साहेबांनी बुलढाणा,अकोला वाशीम,अमरावती जिल्ह्यात जी भूमिहिनांची चळवळ उभी केली होती ती जात दांडग्या धनदांडग्या राजकीय नेत्याच्या बुळाला आग लावणारी असायची.यांची माहिती मला गवई साहेबांचे अकोला जिल्ह्यातील निष्टावंत कार्यकर्ते दादाराव वरटे राहणार तेल्हारा यांनी दिली.ती प्रसिद्ध झालेली नाही.ती झाली पाहिजे. आयत्या पिठावर रेघा ओड्णारे नेतृत्व सध्या डोके वर काढते.भूमिहिनांचा समस्या सोडविण्यासाठी पुढे आलेले नेतृत्व आज त्यांच्या कडे ढूकून पाहत नाही.तुम्ही कसे जगता यांचे त्यांना काही घेणे देणे नाही.फक्त राजकारण हा धंदा झाला आहे.
एके काळी कुठलाही राजकीय वारसा नसताना,पैसा नसताना,कुठल्याही भक्कम राजकीय पक्षाचे नांव नसताना तब्बल ३० वर्षे आमदारकी,१३ महिने लोकसभा,नंतर राज्यसभा,पुढे बिहार व केरळचे राज्यपाल पद भूषविणारया रा.सु.गवई साहेबांसमोर जात दांडगे,धनदांडगे राजकीय नेते हात जोडून हातमिळवणी करीत होते.हा इतिहास वाचला तर आजच्या राजकारणात शॉट कट नेता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.भूमिहिनांचे जन आंदोलन उभे करून त्यातून तयार झालेला कार्यकर्ता जात दांडगे, धनदांडगे राजकीय नेत्यासमोर आव्हान निर्माण करीत होता.पाया पडणारा,शेण काढून,शेतात मजुरी करणारा मजूर भूमिहीनाच्या सत्याग्रहामुळे गुलामी करत नव्हता.त्यांची बायकामुले काम करीत नव्हते.त्याकाळी प्रत्येक तालुक्यात या मजुरांच्या मुलासाठी वस्तीगृह बांधल्या गेली होती.त्या वस्तीगृहातून सातवीच्या पुढे शिकणारया मुलाला नोकरी लागत होती.रा.सु.गवई यांनी विदर्भातील अनेक तरुणांना मुंबईत कारखाण्यात,कंपनीत कामावर लावले होते.हा १९६५ ते १९७५ पर्यंतचा इतिहास विसरता येणार नाही.नंतर भूमिहिनांचे जन आंदोलन उभे करून त्यातून तयार झालेला कार्यकर्ता जात दांडगे,धनदांडगे राजकीय नेत्यासमोर आव्हान निर्माण करीत होता. त्यामुळेच अन्याय अत्याचार हत्याकांडे होयाला लागली.त्यात रिपाई ची गटबाजी वाढली तालुक्यात जिल्ह्यात नेते निर्माण झाले त्यात स्पर्धा लागली.हे ही विसरता येणार नाही.
रा.सु.गवई म्हणजेच रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी,सामाजिक कार्यकर्ते,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते.गवई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते.ते बिहार,सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल,तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते.गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांचा २५ जुलै हा १० वा स्मृतिदिवस आहे.
स्वत:ला लोकांचे स्फूर्तीस्थान मानणारे तात्या,मामा,काका,दादा म्हणवणा-या नेत्यांची अवस्था तर दयनीय आहे. पण इथे सत्ता गवई यांच्या मागे धावत होती.राजकारणातून माणूस एकदा बाहेर झाला की,त्याला कुणी विचारत नाही. मुख्यमंत्री राहिलेला नेता नंतर चार कार्यकर्त्यांना महाग झालेला आपण पाहतो. सारे खुर्चीचे वलय असते. खुर्ची गेली की माणसे गेली.रा.सु.गवई हे वेगळे रसायन होते. १० वर्षे ते सत्तेबाहेर होते.पण गर्दी पूर्वीसारखीच. विदर्भाचा आणि त्यातल्या त्यात अमरावतीचा हा माणूस होता. सामाजिक चळवळीतील अग्रणी,संसदीय पटलावरील बाप माणूस. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक राजकीय चळवळींचे शिलेदार दिवंगत दादासाहेब उपाख्य रा.सु.गवई यांना विनम्र आदरांजली,व विनम्र अभिवादन.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
