अनुसूचित जाती( SC)आरक्षणाची अ ब क ड विभागणी ? ओबीसींची भूमिका काय असावी?- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

आरक्षण या विषयावर ओबीसी व्यक्त होताना दिसत नव्हता.जेव्हा उच्चवर्णीय जमीनदार,सत्ताधीश मराठ्यांनी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणात घुसखोरी सुरू केली.त्यावेळी काही प्रमाणात ओबीसी जागे झाले.याच प्रमाणे EWS आरक्षण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींनी कोणतेही आंदोलन,मागणी न करताच घेतले. त्यावेळी झोपलेले ओबीसी आरक्षणा बद्दल किंचित जागे झाले.उच्च जातींचे आरक्षणा  बद्दल आकर्षण जागे झाले.नव्हे त्यांनी सामाजिक दृष्ट्या मागास नसताना,ओबीसींचे आरक्षण खाऊन टाकले.तेव्हा आरक्षणास “अस्पृश्य” समजणारे लोक थोड्या चिकित्सक पद्धतीने अभ्यास करू लागले.ओबीसींच्या या आरक्षणा बाबतीत दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीस कारण होते.उच्च जातींनी धर्माच्या प्रभावाखाली ओबीसींना बेसावध ठेवण्यात मिळविलेले भयानक यश होय.
   देशातील ५२ टक्के ओबीसी हा देशातील एकूण लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा गुलाम होता.आजही तो गुलामच आहे.महात्मा जोतिबा फुले यांनी शूद्र जातींची मानसिक धार्मिक गुलामी सोप्या पद्धतीनी समजावून सांगितली आहे.वैदिक ब्राह्मणी हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या ओबीसींना महात्मा फुले या आधुनिक विचारवंत महापुरुषांची धर्मचिकित्सा पचविणे पूर्वी अवघड होते.आजची महाकठीण वाटते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपले गुरु मानून धर्म चिकित्सक तथागत गौतम बुद्ध आणि संत कबीर यांच्या बरोबरीचे गुरुतुल्य स्थान दिले आहे.तेहतीस कोटी देव आणि ब्राह्मण, वेद,उपनिषदे, पुराणे या धर्मभावनेत गुंतलेल्या शूद्र (ओबीसींना) जागे करण्याची प्रक्रिया देशात अत्यंत ताकदीने होणे आजही गरजेचे आहे.
     मनुस्मृती नुसार चातुर्वर्ण्य पद्धतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या शोषक, लुटारू १५टक्के लोकांची सेवा करणे. हे वैदिक हिंदू धर्माने दिलेले काम विनातक्रार ओबीसी करत आले आहेत.देव धर्माचे आदेश पाळणे.हेच जीवन कर्तव्य मानणाऱ्या शूद्र लोकांना जागे करण्याचा प्रयत्न २५०० वर्षापासून बुद्ध,चार्वाक,महावीर यांनी चालविला आहे.अलिकडे फुले शाहू आंबेडकर यांनी हा विचार देशात रुजविण्यासाठी अपार कष्ट घेतले. अर्थात आमच्या महापुरुषांच्या विचारास थांबविण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी धर्मसत्ता,राजसत्ता,अर्थसत्ता अशी वापरली आहे की,आमच्या महापुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य लोकांपासून लपविण्यात मनुवादी व्यवस्थेस कायम यश आलेले दिसते.
   ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या गुलामिस कारण वैदिक धर्म वेद उपनिषदे कथा पुराणे रामायण महाभारत ही महाकाव्ये आहेत.त्याच प्रमाणे मनुस्मृती नुसार मिळालेल्या धार्मिक,राजकीय,आर्थिक अधिकारांचा फायदा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे घेत आले आहेत.हे एक प्रकारचेउच्च जातींचे “आरक्षण” आहे.जे देशातील ८५ टक्के ओबीसींना एससी एसटी यांना त्यांचे सर्वाधिकार,प्रतिनिधित्व नाकारते.देशात आम्हा स्त्री शूद्र अतिशूद्र यांना मनुस्मृतीन गुलामी लादून आमचे शोषण केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी मनुस्मृती जाळली.आमच्या गुलामीचे अशा ग्रंथातील संदर्भ शोधून ओबीसींनी वेद उपनिषदे रामायण महाभारत या ग्रंथांची चिकित्सा करून, त्यातील गुलामिस कारण असलेले ग्रंथ प्रातिनिधिक स्वरूपात अभ्यासले पाहिजेत. कारण ओबीसी जातींची गुलामी ही याच विषमतेच्या रूढी परंपरेतून मानसिक रित्या लादली गेलीय.


   हिंदू वैदिक धर्माच्या गुलामीमुळे खचलेले,पिचलेले,शोषित शूद्र अतिशूद्र यांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या पुढारलेल्या जातींच्या बरोबर आणण्यासाठी त्यांना प्रतिनिधित्व देणे. म्हणजेच आरक्षण देणे. ही देशात समता निर्माण करण्याची प्रक्रिया डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सुरू केली आहे.भारताच्या संविधान सभेत ओबीसीं साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड विरोधास सामोरे जावे लागले.हा विरोध मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांचा नव्हता. तर ओबीसींना प्रिय असलेल्या हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीयांचा होता.हा लेख जेव्हा तुम्ही तुमच्या फेसबुक व्हॉट्सअँप किंवा कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध कराल तेव्हा हेच उच्चवर्णीय हिंदू त्याला विरोध करतील.या सर्व लेखात मला हेच सांगायचे आहे.या देशातील ८५ टक्के ओबीसी एससी एसटी यांची आजची वाईट स्थिती ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना धार्मिक राजकीय आर्थिक सर्वाधिकार धर्माने दिले.आम्हा शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांना नाकारल्यामुळे झाली आहे.अर्थात हा विषय अभ्यासाचा भाग आहे.त्यासाठी बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे ग्रंथ वाचावे लागतील. जेवढ्या प्रमाणात आम्ही ओबीसी दासबोध रामायण महाभारत वाचतो.
   देशात संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य चिडले आहेत.त्यामुळे ते मागासवर्गीय आरक्षणाची नेहमी कुचेष्टा करतात.त्यास सर्वात बळी पडतात धर्माचे बिनपगारी गुलाम आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी माळी धनगर ओबीसी हे ५२ टक्के लोक.देशातील प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना ही मंडळी म्हणजेच ब्राह्मण सीकेपी मराठा क्षत्रिय वैश्य हेच मनुवादी लोक आहेत.संविधानाने आम्हा ओबीसींना दिलेले आरक्षण संपविणे हेच त्यांच्या सत्तेचे खरे काम असते.आम्ही या छोट्याशा लेखातून हे शिकले पाहिजे.की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आमच्या समतेच्या तत्वातून मिळालेल्या आरक्षणाचे “संघटित” राजकीय,धार्मिक,आर्थिक शत्रू असतील तर आम्हास “संघटित” रहावे लागेल.जे आरक्षणाचे शत्रू आहेत.त्यांची अनुसूचित जाती म्हणजे SC जातींच्या आरक्षण विभाजनातून न्यायाची नीती असेल ? की अन्यायाची असेल?.हजारो वर्षांचा भारताचा विषमतेचा इतिहास हाच शोषक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींचा क्रूर इतिहास आहे.त्यामुळे केंद्रात असलेले आणि राज्यात असलेले सरकार हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचेच आहे हे सत्तेतील प्रमुख नेत्यांच्या संख्येतून तुम्हास कळले असेल.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप हे मनुस्मृती समर्थक आणि आरक्षण विरोधक आहेत.
    ओबीसींच्या आरक्षणाची विभागणी अगोदर झाली आहे.आम्हास तेव्हाही एक रहाणे गरजेचे होते.अर्थात ही गोष्ट समजून घेणारे नेतृत्व नव्हते.आज “SC” समूह तोडला गेला .तर तो महाराष्ट्रातील आरक्षण विरोधी, ब्राह्मण मराठा वैश्य या सरंजामी जातींसमोर लढणार कसा? आरक्षण म्हणजे केवळ नोकरी शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था यातील राजकीय आरक्षण नाही.तर देशातील एकूण १०० टक्के साधन संपत्ती यातील जमीन, पाणी,जंगल,उद्योग,खनिजे,समुद्र, आकाश,धर्म,मिडिया,उद्योग,प्रशासन कला, चितपट, यातील ८५ टक्के आमचा म्हणजे शोषितओबीसी एससी एसटी यांचा वाटा मिळविणे होय.अन्याय करणारे, अत्याचार करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे संघटित गुन्हेगार म्हणून हजारो वर्षे एक होऊन विषमतेसाठी लढतात.तर भारतीय सविधानिक समता लोकशाही यासाठी महात्मा जोतिबा फुले,क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांचा स्त्री शूद्र अतिशूद्र भारत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी एक होऊनच लढला पाहिजे.मला असे वाटते.हे विचार तथागत बुद्ध,सम्राट अशोक,छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू महाराज,लोकनेते दि.बा. पाटील या सर्वांचे आहेत.एससी आरक्षणाची विभागणी ही आमच्या आरक्षणात फूट पडण्याची प्रक्रिया आहे.त्याच प्रमाणे क्रिमिलेयर लावणे.ही आरक्षण संपवण्याची विकृती आहे.उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विषमतेच्या विकृतीला भारतीय संविधानाच्या समतेनुसार पर्याय देणारी राष्ट्रीय एकता आम्ही शोषित स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांनी एक होऊन निर्माण करायची आहे.याला आपला अमूल्य वेळ,पैसा,साधने आणि नेतृत्व आपण द्यावे.ही नम्र विनंती करतो.
आपला भाऊ.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण, जिल्हा – रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *