
हा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate किंवा L.C.) बौद्ध मुलाचे आहे.
ह्या मध्ये धर्म Religion : हिंदू Hindu जात Caste: बुद्धिस्ट Buddhism असं नोंद आहे ह्या मुलांना कोण आरक्षण देणार सांगा??
जर तुमचा धर्म बौद्ध आहे तर तूम्ही हिंदू hindu कसे असू शकता किंवा जर तूम्ही हिंदू hindu असाल तर बौद्ध कसे असू शकता.
असेच अकलेचे तारे बऱ्याच लोकांनी तोडले आहेंत त्यामुळे प्रत्येकाने तुमच्या मुलांच्या LC वर शाळेत असतानाच correction करून घेतले पाहिजे.कारण बाबासाहेबानंतर समाज शांत झोपला असल्यामुळे तुम्हाला कोणी योग्य मार्गदर्शन guide करायला येणार नाही.ह्याची नोंद असुद्या.
अनेक नेते लोक म्हणतात चर्चा व्हावी. पण कोणा बरोबर चर्चा करायची.लोकांना कश्यातच इंटरेस्ट नाही फक्त स्वार्थासाठी जगत आहेत. बर स्वार्थ तरी यांना साधला जातो का? की हे फक्त तुकड्याचे धनी आहेत.हे एकट्या एका जातीचा किंवा एका जात समुहाचा विषय राहीलेला नाही.अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,मुळ विमुक्त भटक्या जमाती,कमकुवत ओबीसी व अल्पसंख्याक हे सारेच नुसते भरडलेच जात नाहीत तर जात्यात घालून भरडले जात आहेत.प्रत्येक जात आणी जात समुहात फार मोठ्या प्रमाणात विचारवंताची पैदास झाली आहे की जी प्रॅक्टीकली काय चालू आहे. आपण काय केले पाहिजे याचा गांभीर्याने विचार सुद्धा करत नाहीत. सध्याच्या परिस्थिती मध्ये आपण काय केले पाहिजे. क्रिया व प्रतिक्रिया यांचा मेळ न घालणारी तर दुसरीकडे प्रत्येक जातीमध्ये थोडेबहुत श्रीमंत झाले आहेत ते आपली जात मशाल पेटवुन पाया पुरता उजेड करून वाट शोधत आहेत.

आर एस एस प्रणित भाजपा,शिंदे सेनेच्या पक्षात काम करणारे बहुसंख्य एस सी,एस टी,ओबीसी भटके,कार्यकर्ते,नेते म्हणतात.”गाय काय खाते तिकडे लक्ष देऊ नका!. गाय दुध देते का ते बघा” आता हा प्रयोग महाराष्ट्रात फक्त चालू आहे असे नाही तर देशभर चालू आहे. लोकांना प्रश्नच माहित नाहीत. कार्यकर्ते नेते ओरडून सांगतात. बहुसंख्य एस सी,एस टी,ओबीसी भटके,विमुक्त भटक्या जाती जमाती चे लोक अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती चे निकष पुर्ण करत आहेत, पण हेच लोक हिंदु म्हणुन छाती पिटुन घेत आहेत. जर तूम्ही hindu असाल तर बौद्ध कसे आसू शकता.जर तुमचा धर्म बौद्ध आहे तर तूम्ही hindu कसे असू शकता. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate किंवा L.C.) शेवट पर्यन्त तेच राहणार आहे. आज बहुसंख्य आरक्षणाचे लाभार्थी घरी बौद्ध असतात आणि कामावर हिंदू महार म्हणूनच ते मनुवादी विचारांच्या ट्रेड युनियनचे नोंदणीकृत सभासद असतात. त्यांचे आचरण सुद्धा तसेच असते. ग्रामसेवक ते सचिवालय पर्यन्त नोकरी करणाऱ्या लोकांना विचारा कोणत्या ट्रेड युनियनचे सभासद आहात?. मग ते रेल्वे असो की बँक मंत्रालय,शिक्षक,महानगरपालिका,नगरपरिषद नगर पंचायत,नगर पालिका मध्ये बहुसंख्य एस सी,एस टी,ओबीसी असोशीयशन असो किंवा फेडरेशनचे सभासद असले तरी ते कोणाला मतदान करून निवडून देतात?.ते कुठे कमी पडतात ?. खूप गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. जात महत्वाची की धर्म विचार महत्वाचे की आचरण ?.
सागर रामभाऊ तायडे -9920403859,भांडुप,मुंबई अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

