अहमदपूर शहरात भटक्या-विमुक्त यांनी ‘भटके मुक्त दिन’ उत्साहात साजरा केला.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी लातूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भटक्या-विमुक्त जमाती कुठे आहेत?.३१ ऑगस्ट हा भटक्या-विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन.भटक्या-विमुक्तांच्या या स्वातंत्र्याला पंच्चाहत्तरी उलटून गेली तरी त्यांना अजूनही खरी ओळख मिळालेली नसल्याने या देशातील भटके-विमुक्त आजही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्वातंत्र्यापासून कोसो दूर आहेत. उलट त्यांच्या आयुष्यातला संघर्ष अधिकच गडद होत असताना दिसून येत आहे.या निमित्ताने दिनांक 31/08/2026 रोजी जिजामाता सेवाभावी संस्था वरवंटी च्या वतीने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,कामगार नेते अण्णाराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर शहरात राहणाऱ्या भटक्या-विमुक्त यांना एकत्र करून ‘भटके मुक्त दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभा घेण्यात आली सभेमध्ये मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते सुनील खंडाळीकर प्रभाकर तिडके दिनकर जी मध्यवार यांनी आज स्वातंत्र्याची पंच्च्याहत्तरी उलटून गेल्यानंतरही या जमातींची काय अवस्था आहे? आजही भटके-विमुक्त या देशामध्ये असुरक्षित जीवन जगत आहेत. काय ?. आजही त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव हल्ले होत आहेत.आज महाराष्ट्रात सर्वांत जास्त फटका भटक्या-विमुक्त जमातीला बसलेला दिसून येतो. एकीकडे भटकंतीशिवाय पर्याय नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी भटकंती हा एकमेव पर्याय असे सांगत असताना दुसरीकडे या अफवांचा बळी मात्र भटके-विमुक्त ठरत आहेत.आजही प्रत्येक जिल्ह्यात रस्त्याच्याकडेला, गावातील हागणदारी सारख्या ठिकाणी भटक्यांची पाले पाहायला मिळतात. याचे उत्तर आहे काय राजकारण्यांकडे? यातील कैक जमातींना तर स्वातंत्र्य मिळाले हे अजूनही माहितच नाही. अशीच अवस्था भटक्या-विमुक्तांची झालेली आहे.असे मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.या ठिकाणी समाजाच्या अनेक समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. 

 बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली तहसीलदार यांना निवेदन देऊन एचडी ऑफिस यांच्या कार्यालयामध्ये रॅली काढण्यात आली आणि उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आणि तिथून नगरपरिषद इकडे रवाना नगरपरिषद येथे सांगता करण्यात आली व नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले आणि भटक्या समाजाच्या अतिक्रमण नेमकुलचे अर्ज दाखल करून लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी चांगला उत्सुपूर्त प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित जिजामाता सेवाभावी संस्थेचे सर्व सहकारी व संस्थाप्रमुख अध्यक्ष अण्णाराव सूर्यवंशी सोबती गटातील सर्व महिला उपस्थित होत्या त्यात शिला शिंदे,रूपाली राठोड, खालिदास शेख,छाया मकापले,आशा कांबळे, विद्या वाघमारे,मनीषा गायकवाड,गजानन बेंबडे,राम पवार,विलास पवार,अशोक पवार सह सर्व भटक्या समाजाच्या महिला पुरुष सहभागी झाले होते.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *