
ठाणे दि. 20 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणा मानून समाजासाठी आंबेडकरी चळवळीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेले सुनील खांबे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यात आंबेडकरी चळवळी ची मोठी हानी झाली आहे.सुनील खांबे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा लढाऊबाण्याचा;झुंजार कार्यकर्ता हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत सुनील खांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आज ठाणे येथे दिवंगत सुनील खांबे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली ठाणे येथील स्मशानभूमीत दिवंगत सुनील खांबे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.दिवंगत सुनील खांबे यांच्या अंत्ययात्रेत ना.रामदास आठवले यांच्या सह ठाणे मुंबईतील अनेक प्रमुख कार्यकर्ते नेते आणि सुनील खांबे यांचे हजारो चाहते कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील खांबे सुरुवाती च्या काळात माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्ह्यात काम करीत होते. महाराष्ट्रात मी कॅबिनेट मंत्री असताना ते माझ्यासोबत होते. त्यांच्याशी माझे जवळचे संबंध होते.सुनील खांबे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ठाणे जिल्ह्याचे एक धाडसी नेतृत्व हरपले आहे अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख यांस कडून


