डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे- ‘मारेकरी’ ?.

बातमी शेअर करा.

आपल्या देशात मनुवादी व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र,अतिशुद्र अशा अनेक जातीयतेच्या भिंती निर्माण करून माणसा माणसांमध्ये जातीय द्वेषाच्या बियाणांची पेरणी करून शुद्रांना (दलितांना) गावाच्या बाहेर सर्व सुखसोयी  पासून वंचित ठेवले.आणि त्यांच्या शोषणाचा मार्ग अवलंबला होता.गावाच्या बाहेर उकिरड्यावर जिवन जगत असलेल्या समाजामध्ये महामानव बौद्धीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जन्म झाला. त्यांनी बालपणापासून मनुवादी व्यवस्थेच्या महाभयानक यातना सहन करत जिवनात उद्भवणाऱ्या प्रत्येक संकटांना खचून न जाता झुंज देत परिस्थितीवर मात करत जगातील सर्वोच्छ शिक्षण क्षेत्रातील पदव्या संपादन करून एक अर्थतज्ज्ञ, कायदे पंडित, जगामध्ये सर्वाधिक बुद्धिमान म्हणून नावारूपाला आले.ते भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.त्यांनी संविधानाच्या चौकटीतून अठरापगड सर्व जातीतल्या हजारो जाती धर्माच्या लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी समानता, बंधूता, स्वातंत्र्य, न्याय हक्क,अधिकार मिळवून देण्यासाठी स्वतः च्या कुटुंबातील मुलांबाळांचा विचार न करता देशातील सर्व सामान्य माणसांचे जीवन उंचावण्यासाठी ते अहोरात्र चंदना सारखं आपलं आयुष्य अर्पण केले.वैयक्तिक जीवनातील स्वार्थाला मुठमाती दिली.स्वतःच्या संसार उद्धवस्त करून संपूर्ण आयुष देशातील शोषित पिडीत समाजाला अज्ञानाच्या डबक्यात अडकलेल्यांना बाबासाहेबांनी ज्ञानामृत पाजून मानवरुपी प्रवाहात आणले. म्हणून आज सर्व बहुजन समाजातील जनता प्रगतीच्या शिखरावर मार्गस्थ झालेली  दिसून येताहेत.हे कोणालाही नाकारता येणार नाही.त्यांच्या संविधानाच्या आरक्षणाचा फायदा बहुजन समाजातील लोक शिक्षणासाठी,नोकरी साठी, प्रमोशनसाठी,राजकीय सत्ता मिळवण्यासाठी.शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवर्जून घेतात.

     उच्च शिक्षण पदवी घेऊन शासकीय अधिकारी म्हणून उच्च पदावर बसले की लगेच काही लोकांना डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला विसर पडतो.आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःला अती विद्वान समजतात.सर्व जणच तसं नाही त्यातील कांहीं पदाधिकारी अत्यंत प्रामाणिक असून ते  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नतमस्तक होऊन धम्माच्या मार्गाने प्रभावित होऊन सर्व सामान्य दिन दुबळ्या माणसासाठी अहोरात्र कार्यरत असलेले दिसून येतात. त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच!
कांहीं लोक डॉ. बाबासाहेबांनी संविधानात  दिलेल्या अधिकार हक्काचे गरजे प्रमाणे फायदे घेऊन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गद्दार आज महामानव बौद्धीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना विचारांना मुठमाती देवून बेइमानी झालेले काही ठिकाणी ‌दिसून येताहेत.हे पाहून मन थक्क होते.ज्या मनुवादी व्यवस्थेने बहुजन समाजाला अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यात कोंडून आर्थिक, मानसिक, शैक्षणिक,लैंगिक,शोषण करून अनेकांचे संसार उद्धवस्त केले.अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या निच्च ढोंगी बुवाबाजी च्या नादी लागून लोटांगण घालणारे गद्दार अंध भक्तांचे भक्त होवून त्या ढोंगी महाराजाचे मोबाईल वरच्या डी.पी.वर त्यांचे फोटो ठेऊन स्वतःला विद्वान म्हणून मिरवत असल्याचे दिसून येतात.हे पाहून मनाला तिव्र वेदना होतात.
    डॉ.बाबासाहेबांनी संविधानाच्या चौकटीतून बहुजनांना नोकरीत राजकारणात आरक्षण आणि पदोन्नती दिली नसती! तर या गद्दारांना स्वतःची लायकी समजली असती.
अरे गद्दारानो तुम्ही तुमच्या पात्रतेच्या गुणवत्तेवर या पदावर पोहोचलेला नसून डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीतून मिळालेल्या सवलतीच्या जोरावर ही पदं मिळाली आहेत. याची जाणीव ठेवून स्वतः चे आत्मपरीक्षण करा.आपण आलोय कोठून आणि आपल्याला जायचे कोठे.याची थोडी तरी शिल्लक असेल तर विचार करा. जनाची किंवा मनाची या गद्दाराना लाज वाटायल.पाहिजे होती.आपण स्वतःला फार बुद्धिमान किंवा विद्वान समजत असाल तर संविधानाच्या आरक्षणाचा लाभ न घेता स्वतःच्या हिमतीवर अधिकारी होवून दाखवा.खाता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गुणगान गाऊन त्या निच्च ढोंगी बुवा च्या पायाशी लोळण घालता.थु तुमच्या जिंदगाणीवर तुम्हाला सुशिक्षित म्हणायला लाज वाटते.तुमच्याकडून अशिक्षित लोकांनी तुमचा काय आदर्श  घ्यायचा?
ज्यांनी समाजात अंधश्रद्धा पसरवून सर्व सामान्य माणसांचे विविध मार्गांनी शोषण केले.अनेकांचे संसार उद्धवस्त केले त्याच्या आहारी जाऊन त्यांचा आदर्श समोर ठेवता का?.
  चिकित्सा विवेकवाद वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकून लोक शिकले म्हणजे सुशिक्षित झाले असे म्हणता येणार नाही.त्यांनी पोपटपंची करून प्रश्नांची उत्तरे पाठांतर करून फक्त पदव्या मिळविल्या.कारण त्यांनी विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकून चिकित्सा न करता कर्मकांडाच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्यातच ते धन्यता मानत आहेत.त्यांना फक्त साक्षर झाले असे म्हणता येईल! सुशिक्षित नाही.जे लोक जीवनात तर्क वितर्क करून चिकित्सा करतात.कार्यकारण भाव शोधून त्यातील सत्यता पडताळून पाहतात.त्यातील  सत्य स्वीकारून असत्याला  गाडून टाकतात. त्यांनाच खरे सुशिक्षित म्हणता येईल!.
कांहीं ढोंगी लोक घरामध्ये बाहेरच्या हाॅल मध्ये गौतम बुद्धांची मुर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावून आंबेडकर विचार प्रेमी  असल्याचे नक्कली दिखाऊ पणा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात.आणि आतील खोलीत मनुवादी व्यवस्थेने सर्व सामान्य अज्ञान माणसाची फसवणूक करण्यासाठी निर्माण केलेल्या ३३ कोटी देवी देवतांच्या मुर्त्या  गाभाऱ्यात दिसून येतात.आणि बाह्य जगात मिरवतात मी बौद्धिष्ट म्हणून.यामुळेच आपल्या देशात धम्मा प्रसार आणि प्रचार जोमाने व्हायला तयार नाही.सजीवांच्या वर दिवसाढवळ्या निर्भीडपणे स्वैराचार,अत्याचार करतो.आणि निर्जीव दगड धोंडयाच्या, लाकडाच्या, मातीच्या, प्लास्टर च्या मुर्त्या समोर डोकं टेकवून नतमस्तक होतो.आणि अंधश्रद्धेच्या कर्मकांडात बुडून जातो. ही कोणती मानसिकता.
  कांहीं लोक पांढरे कपडे परिधान करून स्वतःला बौद्ध समजून मिरवत असल्याचे दिसून येतात.प्रत्यक्षात मात्र कालबाह्य झालेल्या रुढी परंपरांना घट चिकटलेले दिसतात.
कांहीं लोक बौद्ध पद्धतीने विवाहाची पत्रिका छापतात.आणि विवाह मात्र हिंदू धर्मातील रुढी परंपरेनुसार पार पाडतात.तर काही लोक मुलगी कडे बौद्ध पध्दतीने विवाह सोहळा पुर्ण करून पुन्हा मुलाच्या किंवा बापाच्या अज्ञानापोटी  हिंदू पध्दतीने विवाह पत्रिका छापून हिंदू धर्मातील रुढी परंपरेनुसार पुन्हा विवाह सोहळा पार पाडत
असल्याचे दिसून येतात.तर काही लोक बौद्ध पद्धतीने संपूर्ण विधी सोहळा करतात.पण विवाहानंतर सत्यनारायण पूजा आणि हिंदू धर्मातील रुढी परंपरांना खतपाणी घालण्याचे कार्यक्रम करत असतात.कांहीं बौद्ध थाटामाटाने डेकोरेशन करुन गणपती पुजा अर्चा करतात.कारण सांगतात.भावाचं,आईचं,पत्नीचे नाव पुढे करून मोकळे होतात. यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि यांचा विवेकवाद जागृत झालेला दिसून येत नाही.त्यामुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आसा  दिखाऊपणा यांचा दिसून येतोय.यांची अद्याप मानसिकता बदलली नाही.
    ६ डिसेंबर आणि १४ एप्रिलला पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करून कपाळावर नीळ लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन एक दिवस अंगात संचारल्या सारखे डी.जे च्या तालावर नाचत असल्याचे दिसून येतात.डाॅ.बाबासाहेबांना  मुर्ती मध्ये बंदिस्त करून डोक्यावर घेऊन नाचू नका.तर त्यांच्या ज्ञानाचा दिवा अखंड तेवत ठेवा.जयंतीतील हुल्लडबाजी थांबून बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करण्यात यावी.जंयती संपली की नंतर वर्षे भर जत्रा यात्रा उत्सवात मलिन होवून लोळत पडू नका.आणि तथागत गौतम बुध्दाच्या तत्वांचा ,विचारांचा स्वीकार करून धम्माच्या प्रवाहात सामील व्हा.डॉ.बाबासाहेबांचे अभिमानाने अनुयायी म्हणून मिरवता.मग महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालायला का नको?.मोजकेच लोक बुध्दाच्या धम्माचा स्वीकार करून आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन धम्माच्या मार्गाने चालत आहेत.या देशात मनुवादी व्यवस्थेन नेहमी धार्मिक संस्कृतीची मक्तेदारी आपल्या हातात ठेवून जाती धर्माच्या नावाखाली नेहमी सामाजिक सलोखा बिघडवून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे दिसून येते.


   भारत देशाचे संविधान हे भारतीय लोकशाहीचा प्राण आहे.संविधान सुरक्षित आहे. तोपर्यंत सर्व जाती धर्माचे लोक या देशात सुरक्षित आहेत.कमळा बाईच्या हातात सत्तेची सूत्रे गेल्यापासून सातत्याने लोकशाही चे वस्त्रहरण करून आतून सर्व तीचं पोस्टमास्टर केले जात आहे.विरोध्दक संविधान बचावासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.तसेच सत्तेच्या खुर्चीत बसलेले सत्ताधारी ही संविधान बचावासाठी रस्त्यावर आंदोलन करतात.म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा सुरु आहेत.सध्या लोकप्रतिनिधींची अवस्था एखाद्या रखेली सारखी अवस्था झालेली आहे.संध्याकाळी एकट्या कडे तर दुसऱ्या दिवशी सकाळी एकट्या कडे.दुपारी दुसऱ्या कडे पैसा आणि सत्ता मिळेल तिकडे.म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते! लोकप्रतिनिधींच्या जवळची नितीमत्ता संपली.सत्ता ही घराणेशाची मक्तेदारी होवून बसली.मग मतदारांनी बोंब मारायची काय?
   पर्यावरण संतुलित उद्योगधंदे गुजरातमध्ये आपल्या राज्यात  उद्धवस्त करणारे उद्योग धंदे आपल्या महाराष्ट्रात.हे काय चाललंय?.क्षणोक्षणी संविधानाची पायमल्ली करून सत्तेची सूत्रे गैर मार्गाने हाती घ्यायची नंतर देशाच्या तिजोऱ्या लुटून देशाची आर्थिक परिस्थिती देशोधडीला लावायची.यांच्या दहा पिढीला पुरेल इतकी संपत्ती साठवायची.ही कसली जनसेवा म्हणायची.मतदार लाचार होऊन विकले गेलेत आणि लोक प्रतिनिधींची सत्तेसाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे.लोकशाहीची सरळ सरळ हत्या केली जात आहे.देशाच्या तिजोऱ्या विकासाच्या नावावर देशाला भकास करून लुटणारे लुटारू कालांतराने एक दिवस परदेशात स्थलांतर करतील आणि सामान्य माणसाला जगणं अवघड होवून.बिन अन्न पाण्याचं टाचा घासून मरणाची वेळ येईल!भ्रष्टाचारामुळे विकासाचे रस्ते, धरणे, बंधारे,फुल, इमारती उद्घाटनाच्या पुर्वीच उद्ध्वस्त होत  आहेत.भ्रष्टाचाराच्या महाभयानक रोगाने देशाला पछाडलेले आहे.गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.अंगावर पांढऱ्या शुभ्र रंगाच्या खादी कापडा खाली सर्व भ्रष्टाचाराचं साम्राज्य लपलेले दिसून येते.


   डॉ.बाबासाहेबांना संपूर्ण जगाने ओळखले पण आम्ही भारतीय लोक ओळखायला कमी पडतोय असं वाटतं. बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्या लिखाणाचा विचारांचा,अथांग ज्ञान सागराचा अभ्यास करून समजावून घ्यायला पाहिजे होते.तितका समजून घेतलेला नाही. हेच खरे दुर्दैव आहे.भारत भुमी ही तथागत गौतम बुद्धांच्या धम्माने पावन झालेली जन्म भूमी आणि कर्मभूमी आहे. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात उत्खनन करा तेथे गौतम बुद्धांचे अवशेष सापडल्या शिवाय राहत नाही.ज्या देशांनी डॉ.बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान स्विकारले.आणि गौतम बुद्धांच्या धम्माचे आचरण केले. त्या देशाची झपाट्याने प्रगती झालेली दिसून येते.
   ब्राह्मण वाल्यांनी डॉ.बाबासाहेबांना  ओळखले.म्हणून शिक्षणाची कास त्यांनी धरली व शिकले .आणि ते संघटीत होऊन दुसऱ्यांच्या खांद्यावर हत्यार ठेवून संघर्ष करु लागले. एकमेकांच्या मध्येच संघर्ष निर्माण करुन तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येतात.आम्ही शिकलो पण संघटीत नाही झालो.एक मेकांच्यातच संघर्ष करु लागलो.आणि दुसऱ्यांच्याच भाकऱ्या भाजण्यात धन्यता मानायला लागलो.आम्ही सर्वजण प्रथम भारतीय आहोत याचं भान राखून वागायला शिकले पाहिजे.बाहेरून दिखाऊपणा दाखवायचा आत मात्र कालबाह्य झालेल्या घाणीच्या साम्राज्यात विलीन होऊन बाहेरून स्वच्छता दाखवण्यापेक्षा आतील रुढी परंपरांची‌, आणि कर्मकांडाची  घाण विवेकवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साबणाने स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करा.तरच विज्ञानाच्या प्रकाशाकडे आपण वाटचाल करुन विकासाच्या मार्गाने वाटचाल कराल ! नाहीतर मनुवादी व्यवस्थेच्या कर्मकांडात कायमचे बुडून मराल !.

आयु.देशमुख.पी.आर.9921111955,कोल्हापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *