
विशेष प्रतिनिधी बाळापूर- तालुक्यातील स्वरूपखेड,हाता,काजीखेळ,अंदुरा,गायगाव,गावामध्ये कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या माध्यमातून बी सी आय प्रकल्प राबवला जात असून शेतकरी शेतमजूर वंचित घटक, महिला यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून पण विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशातच आज संस्थेचा 35 वा वर्धापन दिन हा प्रकल्पाच्या गावामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या कार्याविषयी सांगितल्यास 1991 मध्ये संस्थेची स्थापना ही छोट्याशा तळणी गावात झाली आता साधारणता दहा राज्यांमध्ये संस्था कार्यरत आहे.शाश्वत्व हवामान अनुकूलन शेती, महिला सक्षमीकरण, जलसुरक्षा आणि पाणलोट व्यवस्थापन, उत्पादन कंपन्या, शेतकरी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था ही स्थानिक पातळीवर बीसीआय प्रकल्प सुद्धा राबवत आहे, संस्थेच्या वर्धापनदिनाची अवचित साधून आज रोजी विविध उपक्रम राबवून प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, महिला यांना संस्थेची कार्यशीलते विषयी माहिती दिली, वाटर बजेटिंग चा खेळ खेळण्यात आला, सापसिडी चा खेळाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली यावेळी गटव्यवस्थापक अक्षय आसोलकार साहेब, तसेच क्षेत्र प्रवर्तक गौतम तायडे, सतीश गायकवाड,अमोल पिसे, नासरी चव्हाण, सविता हागे, मनीषा वानखडे हे उपस्थित होते.
भिमकिरण दामोदर हाता- ७७२०९५२३९६


