
विशेष प्रतिनिधी – (भिम किरण दामोदर हाता)
तालुक्यातील अंदुरा गावामध्ये कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या माध्यमातून बी सी आय प्रकल्प राबवला जात असून शेतकरी शेतमजूर वंचित घटक, महिला यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून आणि संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशातच आज संस्थेचा 35 वा वर्धापन दिन हा अंदुरा या बिसिआय प्रकल्पाच्या गावामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या कार्याविषयी सांगितल्यास 1991 मध्ये संस्थेची स्थापना ही छोट्याशा तळणी ता. मोताळा या गावात झाली. आता साधारणता दहा राज्यांमध्ये संस्था कार्यरत आहे.

शाश्वत्व,हवामान अनुकूलन शेती, महिला सक्षमीकरण, जलसुरक्षा आणि पाणलोट व्यवस्थापन, उत्पादन कंपन्या, शेतकरी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था ही स्थानिक पातळीवर बीसीआय प्रकल्प सुद्धा राबवत आहे, संस्थेच्या वर्धापनदिनाची अवचित्य साधून आज रोजी अंदुरा या गावात विविध उपक्रम राबवून प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी,शेतमजूर, महिला यांना संस्थेची कार्यशीलते विषयी माहिती दिली, तसेच सरकारी योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये जलतारा व चारा लागवड याबद्दल माहिती दिली पाण्याच्या नियोजन कसे करावे यासाठी वाटर बजेटिंग चा खेळ खेळण्यात आला, शेतात कोणती कामे करायची व कोणती कामे करायची नाहीत या संदर्भात सापशिडी या खेळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली यावेळी गटव्यवस्थापक मा.अक्षय आसोलकार साहेब यांनी शेतकऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त व प्रकल्पाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच क्षेत्र प्रवर्तक सविता हागे यांनी प्रास्ताविक केले तसेच गावातील Bci शेतकरी व महिला शेतकरी यांनी राबवलेल्या कार्यक्रम विषयी मनोगत व्यक्त केले क्षेत्र प्रवर्तक गौतम तायडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. क्षेत्र प्रवर्तक सतिष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला बाळापूर ब्लॉक मधिल सर्व क्षेत्र प्रवर्तक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शेवटी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
भिम किरण दामोदर हाता ९०९६००१७८७,ता. बाळापूर,जिल्हा अकोला


