
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : रमाई फाऊंडेशन,रमाई मासिक यांच्या वतीने दरवर्षी ८ मार्च (जागतिक महिला दिन) साजरा करण्यात येतो. यावर्षी एक आगळावेगळा जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दृष्टिने मातोश्री वृद्धाश्रमामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
रमाईच्या फाऊंडेशनच्या महिलांनी या वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत जेवण करून वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून या वृद्धांमध्ये नवसंजिवनी निर्माण केली. या वृद्धांसोबत गाण्यांच्या भेंड्या,लंगडी असे विविध खेळ खेळून वृद्धांच्या चेहर्यावर हास्य फुलवले. याप्रसंगी अॅड.जोशी यांनी भाषण केले.महेंद्र सोनवणे,सुजाता कदम यांनी आपले विचार व्यक्त केले.जय कांबळे यांनी कविता सादर केल्या. या संयोजनमध्ये दैवशाला गवंदे,शोभा खाडे,ललिता खडसे,मनिषा बागूल,पुष्पा सोनवणे,वैशाली साठे,शोभा साळवे,विद्या म्हस्के,सुजाता कदम,रेखा मुळे,उषा टाकणखार,शोभा सदावर्ते,संघमित्रा पट्टेकर,जनाबार्ई बिर्हाडे,स्मिता खडसे, सुनिता देवरे,अब्दुलाही आदम,प्रतिक्षा भालेराव,अस्मिता ढगे,प्रविण कांबळे,जय कांबळे,महेंद्र सोनवणे,अॅड.जोशी आदींनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दैवशाला गवंदे यांनी केले.आभार सोनल फुलेझेले यांनी मानले.
प्रा.भारत सिरसाट 9421308101,छत्रपती संभाजी नगर यांस कडून
