
सम्राट अशोकाची जयंती चैत्र शुक्ल अष्टमीला असते.या जयंतीची तारीख दरवर्षी बदलत असते जसे बुद्ध पौर्णिमेची तारीख बदलते,जसे अशोक विजयादशमीची तारीख बदलते,तसेच सम्राट अशोकाच्या जयंतीची तारीख दरवर्षी बदलत असते कारण ही जयंती चैत्र शुक्ल अष्टमीला येते त्यामुळे आपण या वर्षी सुद्धा लक्षात ठेवून सम्राट अशोकाची जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करूया.महान सम्राट अशोकाने या देशाला अशोकस्तंभ दिला.हा अशोकस्तंभ तथागत बुद्धांचे रूप आहे.आज हा अशोकस्तंभ भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.त्यांनी निर्माण केलेले अशोकचक्र तिरंग्यावर मोठ्या दिमाखात झळकत आहे.सम्राट अशोकाच्या नावाने भारताचा सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार दिला जातो.हा महान असा वारसा सम्राट अशोकांमुळे आपल्याला मिळाला.आपल्याला माहीतच आहे की दिनांक पाच एप्रिलला चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी सम्राट अशोक यांची जयंती येत आहे.या भारतभूमीचा महान भूमिपुत्र प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे या खंडप्राय भारतभुमीवर साम्राज्य होते.आजच्या भारताचे जे क्षेत्रफळ आहे याच्या दुप्पट भुभागावर सम्राट अशोकाचे राज्य होते.सम्राट अशोक यांनी मानवतेचा संदेश गावागावात पसरवला,मोठमोठे रस्ते महामार्ग बणवले,प्रवाशांना सावली मिळावी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली, विहिर, पानपोई,तलाव निर्माण केले,शासकीय विश्रामगृहाची निर्मिती सम्राट आशोकाचीच,रस्त्यावर किलोमीटरचे दगड प्रथमतः सम्राट आशोकानेच लावले.परकिय देशांसोबत चांगले व्यवहार केले.आजच्या परराष्ट्र धोरणावर सम्राट अशोकांचाच प्रभाव आहे.गाईंसहीत सर्व प्राणी व पक्षांना संरक्षण दिले,धम्माचा प्रचार प्रसार केला,स्वतःच्या मुलाला भिक्खू बनवले,स्वतःच्या मुलीला भिक्खुनी बनवले, हजारो स्तुपांची निर्मिती केली,अनेक विहारांची निर्मिती केली,अनेक स्तंभ बनवले, अनेक शिलालेख लिहिले,सांचीचा स्तूप,कल्हुआ स्तुप,बुद्धगयेचे महाबोधी विहार, सन्नतीचा स्तूप हे सगळे सम्राट अशोकानेच बनवले.अशा या महान भूमिपुत्राची जयंती येत आहे.आपण सम्राट अशोकाची जयंती मोठ्या थाटामाटा मध्ये साजरी करूया.
आपण सम्राट अशोकाची जयंती कशी साजरी केली पाहिजे.सर्वप्रथम आपण आपल्या विहारांमध्ये सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे धम्मध्वजारोहन करावे. गावामधून,मोहल्या मधून, परिसरामधून रॅली काढावी.बौद्धमय भारताच्या संस्कृतीचे प्रदर्शन या रॅलीमध्ये करावे.रॅली काढत असताना सम्राट अशोक यांचा फोटो रथामध्ये सजवलेला असावा.सर्वजण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले असावे, हातामध्ये पंचरंगी ध्वज असावेत,हातामध्ये फलक असावे या फलकावर तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असावे,महेंद्र,संघमित्रा,जेम्स प्रिन्सेप,अलेक्झांडर कनिंघम, फाहियान,युआनत्सांग,इत्सिंग,अनागारिक धम्मपाल व अनेक बौद्ध धम्माला योगदान देणाऱ्या महामानवाचे फोटो असावेत.या फलकावर अशोक स्तंभ चिन्हांकित केलेला असावा,एखाद्या फलकावर बोधी वृक्षाचा फोटो असावा, एखाद्या फलकावर अशोक चक्र असावे,एखाद्या फलकावर सिंह असावा, एखाद्या फलकावर मोर असावा,एखाद्या फलकावर धम्मपदाचे वाक्य असावे,एखाद्या फलकावर त्रिपटकातील ग्रंथाचा फोटो असावा, एखाद्या फलकावर बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा फोटो असावा, एखाद्या फलकावर दिक्षाभुमीचा फोटो असावा,एखाद्या फलकावर सांचीचा स्तूप असावा,एखाद्या फलकावर धम्मेक स्तुप,एखाद्या फलकावर महाबोधी महाविहार असावे,एखाद्या फलकावर सांचीगेट असावे,एखाद्या फलकावर कल्हुआ स्तुप असावा,एखाद्या फलकावर शिलालेखाचा फोटो असावा,एखाद्या फलकावर बुद्ध लेण्यांचा फोटो असावा.एखाद्या फलकावर धम्मसंगीतीचा फोटो असावा, सम्राट अशोक संबंधीत अनेक फोटो फलकावर असावेत आणि फलक हातात घेऊन आपण आपल्या मोहल्या मधून मिरवणूक काढावी.सम्राट अशोकांचा विजय असो, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बौद्ध धम्माचा विजय असो,भिक्खू संघाचा विजय असो,अशा घोषणा द्याव्यात .बुद्धं सरणं गच्छामि,धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि अशा शांत मंजुळ आवाजात साऊंड बॉक्सवर रिंगटोन लावावे.अशाप्रकारे बौद्ध संस्कृतीची प्रदर्शनमय रॅली काढुन सम्राट अशोकाची जयंती चांगल्या प्रकारे साजरी करावी.मिरवणुकीचा समारंभ झाल्यावर विहारात येऊन सम्राट अशोकांना हार घालून आपण प्रवचनाचे आयोजन करावे,व्याख्यानाचे आयोजन करावे, भाषणाचे आयोजन करावे.या भाषणा मध्ये सम्राट अशोकाच्या जीवनावर त्यांनी केलेल्या महान कार्यावर माहिती देण्यात यावी.अशाप्रकारे बौद्ध संस्कृतीला अनुसरून विचारमय, समृद्धीमय, संस्कृतीमय,बौद्धमय,धम्ममय,सम्राट अशोकांची जयंती साजरी करावी.
भंते धम्मानंद पुणे मो. 8007782596
