हिंदू म्हणजे कोण?. आणि ब्राह्मण म्हणजे कोण?.आता तरी समजून घ्या.

बातमी शेअर करा.

सत्य कधीच लपत नाही, किंवा गाडल्या जात नाही आणि नष्ट ही केल्या जात नाही.काही झाले तरी त्याचा इतिहास लिहला जातो.आणि वेग वेगळ्या विचारधारेचे सत्य शोधक, संशोधन करून निर्भयपणे,निर्भीडपणे,निःपक्षपणे हा इतिहास पुरावे, संदर्भ गोळा करून इतिहास लिहत असतात.त्यावर विविध मध्यमा द्वारे चर्चासत्र, परीसंवाद,व्याख्यान आयोजित केली जातात. त्यातुन सत्य परिस्थिती समजून सांगितली जाते.काही वेळा सांस्कृतिक दहशत निर्माण करून सत्य परिस्थिती दाबल्या जाते.पण ती कालांतराने समोर येऊन उभी राहते.तेव्हा तिच्या विरोधात बंड करून जो उभा राहतो.क्रांतिकारी विचारांच्या चळवळीचा नायक ठरतो.समाजसेवक,महात्मा, महामानव ठरतो.

   हिंदू हा धर्म नाही,तर ती एक बहुमजली इमारत आहे, तिच्या प्रत्येक मजल्यावर रूम आहेत, त्याला दरवाजे खिडक्या आहेत,पण शिडी,पायऱ्या नाहीत.खालच्या मजल्यावरिल वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही. आणि वरच्या मजल्यावरिल खालच्या मजल्यावर येऊ शकत नाही. जो जिथे जन्मला तो तिथेच मृत्यू होईल. त्याचा रूम किंवा मजला बदली होऊ शकत नाही. त्याची अलिखित आचार संहिता म्हणजेच मनुवादी विषमतावादी विचाराचा हिंदू धर्म असे सोप्या भाषेत स्पष्ट सांगता येईल.

    हिंदू धर्मात किती जाती,पोट जाती आहेत,सहा हजार सहाशे जाती आहेत.त्यांना सांभाळण्यासाठी तेहतीस कोटी देवाची हातात शस्त्र घेऊन फौज उभी केली आहे.ते सर्व ब्राम्हणांच्या हातात व मंत्रात बंदिस्त आहेत. देव देवी पर्यंत पोचायचे असेल तर प्रथम ब्राम्हणांना दान दक्षिणा द्यावी लागते. तेव्हाच देव देवी प्रसन्न होतील त्यांनी तुमची समस्या सांगितली तरच देव,देवी येकुन घेतो.अशी ही हजारो वर्षांची परंपरा आहे, ती तोडण्याचे काम अनेकांनी केले. म्हणूनच ते महामानव,महात्मा,संत झाले.

    भारतात हिंदू कोण आहेत तर मराठा पासून ते आदिवासी पर्यंत जेवढ्या जाती आहेत त्यांना ब्राह्मण सोडून शिक्षणाचा नोकरीचा अधिकार नव्हता सर्व जातींना आपापल्या जातीची कामे करावी लागत होती.मराठा कुणब्यांना शेतीचं काम, कुंभाराला मडकी बनवणे, सुताराला लाकडी वस्तू ,न्हावी असेल तर केस कापणे, आगरी कोळ्याने मासे पकडणे, तेलीने तेल काढणे,धनगराने गवळीने शेळ्या मेंढ्या गुर ढोर सांभाळणे, दुधाचा व्यवसाय करणे म्हणजेच प्रत्येक जातीच्या माणसाने आपल्या जातीचं काम करणे हा मनू स्मूर्ती चं लिखित नियम होता. त्याचे संपूर्ण अधिकार फक्त ब्राम्हणांना होते.२६ जानेवारी १९५० नंतर भारतात भारतीय संविधान लागू झाले. संविधानानंतर ह्या सर्व मराठा,ओबीसी,एससी,एसटी महिलांना सर्व बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळाला.त्यामुळे ते सर्व नोकरी करू शकले आणि त्यामुळे डॉक्टर,वकील,इंजिनियर, आमदार,खासदार,मंत्री बनू शकले.महिलांना घराच्या बाहेर पडून शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.त्याच सर्व समाजाच्या महिला शिक्षण घेऊन देशाच्या सर्वोच्च पदी म्हणजे प्रधानमंत्री,राष्ट्रपती सह सर्वच पदावर त्यांना मान समान अधिकार आणि नोकरी मिळाली.संविधानाच्या अगोदर असं झालं नाही,संविधाना नंतर सर्वच क्षेत्रात समान अधिकार मिळू लागले ब्राह्मण हजारो वर्षापासून शिक्षण, नोकरी,हक्क,अधिकार भोगत होते.आणि आज ही वर्चस्व गाजवत आहेत.म्हणून आज तो तीन टक्केवाला समाज सर्व क्षेत्रात वरती कब्जा करून आहे,त्याला प्रथम सुरुंग महात्मा जोतिबा फुले,सावित्री बाई फुले यांनी लावला होता,तो महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य हे समाज सुधारणेसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया घातला.तसेच,त्यांनी सर्व जाती-धर्माच्या मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी संघर्ष करून प्रयत्न केले. त्यांच्या कार्यावर आधारित फुले हा सिनेमा देशात प्रदर्शित होत होता.त्याला देशात मनुवादी विचारांच्या संघटना बहुसंख्य मराठा मागासवर्गीय समाजाच्या वैचारिक मानसिक गुलामीमुळे डोकेवर काढत आहेत.पहिल्या त्या बॅनर लावण्यास घाबरत होत्या आता त्या उघड उघड धमक्या देऊ लागले. त्याचे उदाहरण सध्या “फुले” या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनावर मूठभर ब्राह्मण महासंघ बॅनर खाली महिलांनी व हिंदू महासंघाने घेतलेल्या आक्षेपांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. ही हजारो वर्षाची सांस्कृतिक दहशत आज ही कायम आहे त्यांना दाखवून द्याचे होते ते त्यांनी दाखवून दिले.हा निर्णय फक्त एका चित्रपटाबाबत नसून,तो सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहावर घाला घालणारा आहे.तरी बहुसंख्य राजकीय दुष्टया जागरूक असलेला बहुसंख्य मागासवर्गीय समाज पेटून उठला नाही. 

फुले दांपत्यांनी शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले,जे पती-पत्नी म्हणून सामाजिक क्रांतीचे अग्रदूत ठरले,त्या सावित्रीबाई व जोतिराव फुल्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कलाकृतीला विरोध का?.फुले दाम्पत्याने ब्राह्मणशाही, वर्णव्यवस्थेचा,अंधश्रद्धेचा आणि धर्मसत्तेचा ज्या ठामपणे पर्दाफाश केला.ते सत्य आजही काही उच्चवर्णीय ब्राह्मण व हिंदू संघटनांना झेपत नाही. त्यांच्या डोळ्यात खुपणारे सत्य समोर येऊ नये,म्हणून हे संघटनात्मक दबाव टाकले जात आहेत.ही केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही,तर संपूर्ण बहुजन समाजाच्या विचारमूल्यांवर घाला आहे.चित्रपटात काय चुकीचं दाखवलं गेलं आहे?.एखाद्या तपशीलावर आक्षेप असल्यास,तो सेन्सॉर बोर्डासमोर मांडावा ना.मग संघटनांचा हस्तक्षेप कशासाठी?

    ब्राह्मण समाजाच्या व हिंदू धर्माच्या नावाने अशा प्रकारे विरोध करणाऱ्या संघटना सर्व ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करतात का?.या प्रश्नांची उत्तरं शोधली तर एक गोष्ट स्पष्ट होते. ही लढाई कलाविषयक नसून,सामाजिक सांस्कृतिक वर्चस्वाच्या पुरस्कर्त्यांची आहे.फुले हे नाव उच्चारणंही ज्यांना जड जातं,त्यांना त्यांच्या विचारांचा प्रसार होणं खटकणारच!

    बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय ओबीसी प्रथम हिंदू असतो तो आता झोपला आहे. तो जागा झाला,तर काय होईल हे ब्राह्मण महासंघ व हिंदू महासंघाने लक्षात ठेवावे.आता काळ बदलतोय. आजचा बहुजन तरुण विचार करतोय,अभ्यासतोय.सोशल मीडियावरून,पुस्तके व चित्रपटांमधून त्याला सत्य शोधायचं आहे.त्यामुळे अशा प्रकारचा विरोध जितका वाढेल, तितका ‘फुले’ अधिक लोकांपर्यंत पोहोचतील.म्हणून हे लक्षात ठेवा चित्रपट प्रदर्शित पुढे-मागे होईल,पण फुले दांपत्याच्या विचारांची क्रांती थांबणार नाही.कारण ही लढाई एका चित्रपटाची नाही ती समतावादी विचारांची समतेच्या स्वप्नांची आहे.यातून बहुसंख्य बहुजन म्हणजेच मागासवर्गीय समाजाने स्वताला हिंदू म्हणून घेतांना त्यामागील इतिहास समजून घेतला पाहिजे.म्हणजेच तुम्ही हिंदू कधी असता आणि जातीचे कधी होता.म्हणूनच विचारतो हिंदू म्हणजे कोण?. आणि ब्राह्मण म्हणजे कोण?.आता तरी समजून घ्या.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *