२०२५ चे ३१ तारखेला सेवानिवृत्ती त्यांचे उत्तराधिकारी – श्री २०२६ यांची उपस्थिती.

बातमी शेअर करा.

अठरावे शतक,एकोणवीसावे शतक आणि एकविसावे शतक कसे गेले हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.पण २०१४ पासून २०१९ आणि २०१९ ते २०२६ या गेल्या सात वर्षात किती क्रांतिकारी बदल झाले हे मात्र सांगू,अथवा लिहू शकतो. अमेरिका,चीन मध्ये जे घडते ते पंधरा मिनिटात जगभरात पोचते पण भारतात पोचत नाही.कारण आम्ही आजही आधुनिकीकरणाचे तंत्रज्ञानाचे माहिती ज्ञान स्वीकारायला तयार नाही.आज ही पायी पदयात्रा काढली तर गजानन महाराज,आणि साईबाबा प्रसन्न होऊ शकतो.आपल्या शिक्षण,रोजगार,आरोग्य आणि आर्थिक समस्या शंभर टक्के दूर करण्याची क्षमता या भक्तीत आहे.यावर आमची शंभर टक्के श्रद्धा आहे.म्हणून आमच्या हातात ३ जी,५ जी स्मार्ट मोबाईल असला तरी त्यातील गुगल नेटवर्कवर आमचा विश्वास नाही. त्याची माणसाने किती दखल घेतली?.कोण?. कुठे?. पोचला माहिती नाही.पण त्या शिक्षणाने मोठ्या पदावर गेलेला शेतकऱ्यांचा मुलगा शेतकऱ्याचा बदल त्यांची मानसिकता,सामाजिक बांधिलकी काय आहे त्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचे छायाचित्र सोबत दिले आहे. माणसाला सावली देणाऱ्या झाडा बदल माणूस कसा वागतो.कष्टकरी शेतकऱ्याचा भाजीपाला घेतांना शेतकऱ्याचा चेहऱ्याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही.देशाला अन्न धान्य देणारा अन्नदाता निसर्गापुढे हतबल होतो.तेव्हा प्रशासनातील माणूस जागा होत नाही.हे २०२५ च्या वर्षातील लक्षवेधी कोणच्या दुष्टीकोनात कसे दिसले.त्यातून कोणी काय घेतले हे २०२५ ची सेवा निवृत्ती झाली आहे.

२०२५ वर्षात आमच्या जीवनात कोणता बदल झाला.कोणत्या समस्या होत्या कोणता आनंदोत्सव होता याची आम्ही कागदावर नोंद केली नसली तरी मनात कायम नोंद केली आहे.त्यामुळेच २०२६ आमच्यासाठी कसे असेल?. कोणते वेगळे असेल?. असा कोणताही संकल्प आमच्या डोळ्यासमोर नाही.२०२६ नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी रात्री बारा नंतर फटके फोडून दारू पियुन खूप आनंदात एक तर नाचले पाहिजे.त्यात एका डोळ्यात गेल्यावर्षाचे दुख आणि दुसऱ्या डोळ्यात नवीन येणाऱ्या दिवसाचा आनंद दिसला पाहिजे.ते एकत्र साजरा करण्यासाठी सर्व काही केलेच पाहिजे.या दिवसासाठी आहे आपण काहीतरी खास केले पाहिजे आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवण्यासाठी किंवा आपल्या मित्र परिवारांना नातलगांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे हे बंधनकारक असते. म्हणूनच मी आपल्यासाठी घेऊन आलोय काही खास अशा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

     नववर्षाच्या नव्या कल्पना घेऊन आले वर्ष. नवे करुया साकार स्वप्न. आपल्याला जे हवे ते तरुणाईचे दिवस म्हणजेच दारूची नशा त्यात बेधुंध नाच गाणे. संगणकाचे शिक्षण घेऊन जगाच्या स्पर्थेत उतरून स्वप्न आपुले फुलवायचे,हातात स्मार्ट मोबाईल घेऊन पायी पदयात्रा वारी न चुकता करायची.अदुरे स्वप्न आपले श्रद्धा सबुरी ठेऊन सोडवायचे.म्हणूनच मला तुम्हा सर्वांना कळवायचे आहे की,आपले सर्वांचे प्रिय आणि सुप्रसिद्ध मित्र श्री २०२५ हे या महिन्याच्या ३१ तारखेला  रात्री बारा वाजता सेवा निवृत्त होत आहेत.त्याच्या १२ बायका,५२ मुले आणि ३६५ नातवंडे.बुधवार,३१ डिसेंबर रोजी २३.५९ वाजता शेवटच्या क्षणाला उपस्थित राहतील.त्यांच्या उपस्थितीची आपण कशी नोंद घ्यावी यांचे स्वातंत्र्य आपणास त्यांनी दिले आहे.तुमच्या सर्व समस्या,संकटे, आजारपण,निराशा,अपमान,अपयश,नकार,सर्व प्रकारचे आघात,अपघात,नैराश्य,चिंता,संताप,मत्सर,दु:ख,अहंकार,भिती,राग,अप्रामाणिकपणा,निराशावाद,बेफिकीरी,निंदकपणा,बेजबाबदारपणा,अविश्वासपणा,चिडखोरपणा,ओंगळपणा स्वतः कडे घेऊन ते सेवा निवृत्तीचा शेवटचा निरोप घेत आहेत.

त्यांचे उत्तराधिकारी – श्री २०२६ यांची उपस्थिती ००.०१ वाजता सुरु होणार आहे.त्यांनी कसलेल्या राजकीय नेत्यासारखे तुम्हाला पोकळ आश्वासन न देता दमदार दीर्घ आयुष्य,चांगले निरोगी आरोग्य,संपत्ती, प्रेम,भरपूर आशीर्वाद,सुख शांती,आनंद,नीतिमत्ता,पदोन्नती,समृद्धी आणि मनाची शांती,उत्साह,विपुलता,यश,यशस्वीपणे घौडदौड करण्याची इच्छा,बुध्दी व धन देण्यासाठी शिक्षण,संस्कार,रोजगार मुबलक उपलब्ध करण्याचे ठोस वचन दिले आहे.त्याचा आपण योग्य त्या पद्धतीने स्वीकार करावा.गेल्या २०२५ ला सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक आणि राजकीय काय काय घडले, कोण गरीब?.कोण श्रीमंत?. झाला त्याची आठवण ठेऊया.चला,मग आपण सर्वजण त्यांचे सहर्ष स्वागत करुया नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना,आप्तेष्टांना,मित्र  परिवाराला आनंदाचे,सुख समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा. जागरूक वाचकांना आपल्या लोकप्रिय दैनिकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *