देशातील व परदेशातील लोकांना जो इतिहास माहीत नव्हता तो १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा १८१८ च्या युद्धाला दोनशे वर्ष पूर्ण झाले.तो १ जानेवारी २०१८ ला भ्याड हल्ल्यामुळे माहित झाला. १ जानेवारी २०१८ ला सकाळी दहा ते २ जानेवारी च्या सकाळ पर्यंत जगदंब थंडीचे जॅकेट घातलेल्या नामर्द तरुणांनी तोंड लपवून जे हल्ले केले गाड्या फोडल्या त्याला साक्षीदार म्हणून उभा असणारा खाकी वर्दीतील मनुवादी वृत्तीचा पोलीस, त्यांचे नेतृत्व करणारा पोलीस निरीक्षक,अधीक्षक,आयुक्त आणि तालुक्यातील जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर कोणतेच गुन्हे दाखल करण्यात आले नाही.ग्रामपंचायत,पंचायत समिती,यांनी जाहीरपणे ग्रामसभा घेऊन यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असतांना ही त्यावर योग्य वेळी कारवाई झाली नाही. सामुदाहिक बहिष्कार टाकला असता आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या समाजाकडून जश्यास तसे उतर देऊन ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद पाळण्यात आला.आणि महार जातीचा आदर्श मानणारा समाज संकटात एकत्र येऊन लढू शकतो हे पुन्हा पुन्हा दाखवून देत असतो. राजकीय स्वार्थसाठी हा इतिहास आम्ही विसरतो पण अन्याय अत्याचारा विरोधात आम्ही एकत्र असतो हे पण पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.म्हणूनच आता भिमा कोरेगांव ला जाणारे कधीच संघटीतपणे जात नाही. आणि असंघटीत बहुजन समाजाला सर्वच लाभा पासून वंचित ठेवणाऱ्या नेत्या विरोधात वंचित बहुजन समाज म्हणून एकत्र येत नाही.वंचित बहुजन समाजाचे नेतृत्व करणारा क्रांतिकारी विचारांचा व रक्ताचा वारसदार आहे हे माहित असूनही त्यावर विश्वास ठेवत नाही.त्यांच्या सामाजिक राजकीय संघर्ष करून यशस्वी होत चाललेल्या राजकीय चळवळीला सुरुंग लावण्यासाठी शॉटकट नेत्याची उत्पती नेमकी महापरीनिर्वाण दिनाला व शौर्य दिनालाच होत असते. तो नेता समाजाची नेहमी सारखी दिशाभूल करीत असतो.आता समाजाकडून अशा शॉटकट नेत्याची परीक्षा घेणे आवश्यक आहे.१ जानेवारी आणि ३ जानेवारी २०१८ ला ज्या लोकावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यासाठी कोणी काय काय मदत केली,गुन्ह्यातून सुटण्यासाठी कायदेशीररीत्या वकील पुरविणे,किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करणे अपेक्षित होते.याचा तपशील बाहेर येत नाही ज्यांना ही शिक्षा भेटली ते स्वताला गुन्हेगार समजून संघर्ष टाळत आहेत.१८१८ चा कोणत्याही आदर्श डोळ्यासमोर ठेऊन रणनीती तयार न करणारे १ जानेवारी २०१८ ला मार खाऊन ही सुधारले नाही.म्हणजेच दरवर्षी कोरेगांव भिमाला जाणारे कोणताही आदर्श किंवा प्रेरणा घेण्यासाठी जात नसून एक दिवसाची ऐतिहासिक सहल,पिकनिक एन्जॉय करण्यासाठी जातात असे लिहले तर चुकीचे होणार नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे.२८००० हजाराच्या विरोधात मरू किंवा मारू या जिद्धीने लढणारे ५०० महार आज आम्हाला प्रेरणादायी अथवा आदर्श वाटत नाही.म्हणूनच आज आम्ही २८००० गटात विभागलेले आहोत आणि ३ टक्के समाज सर्वच पक्ष्याच्या निर्णय प्रक्रियेत अधिकारी आहे.त्यांची नांवे वेगवेगळी असली तरी उदिष्ट एकच आहे मनुवादी विचारांचे हिंदुराष्ट निर्माण करणे.आमचे काय उदिष्ट आहे शॉट कट नेत्याला मोठे करून क्रांतिकारी विचारांच्या मजबूत होत असलेल्या चळवळीला सुरुंग लावणे.होऊ शकते हे पाचशे महारांनी दाखवुन दिले त्यांचा इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो.काय सांगतो इतिहास.
देशात नव्हे तर जगात महार जातीचा शौर्यवान जात म्हणुन गौरव होत होता.हा इतिहास डॉ.भिमराव आंबेडकर यांनी इंग्लंडला वाचला तेव्हा पासुन ते एक जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी जात होते.हा महार जातीचा इतिहास आहे.आज कोणी तुम्ही महार लोक नाही सुधारणार किंवा आपल्या पायरीने वागा,महार जातीचे नांव घेऊन शिवीगाळ केली तर म्हणणाऱ्याला कायद्या नुसार केस करून जेलची हवा खावी लागेल.पण तेव्हा महार लोक लढाऊ, प्रामाणिक इनामदार, विश्वासु आणि मर्दानगी दाखवून शौर्य गाजविणारे होते अश्या शूरवीर महार जातीचा इतिहास आहे.त्यामुळेच त्यांच्या गळ्यात मटके आणि कंबरला झाडू आला का आला. हा भी एक इतिहास आहे.अहमदनगर जिल्ह्यातही नितिन आगेची घटना महारांच्या पोरांची मर्दानगी आणि शौर्य या मुळेच हत्याकांड घडल्याचा इतिहास आहे.म्हणून महारांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडकं आणि कमरेला झाडू कसा आला? हा इतिहास वाचला पाहिजे. असे का घडले ? खरच महार समाज इतका घाणेरडा होता.का ? महार समाजाचा इतिहास हा शौर्यांचा इतिहास आहे.त्यांच्या इतके साफ-स्वच्छ ,प्रगत जात कोणतीच नव्हती.मग गळ्यात मडके आणि कमरेला झाडू अचानक कसे आले?. करीता ही हकीकत वाचा एकदा रघुनाथ पेशव्याची पत्नी आनंदाबाई पेशवे आपल्या दासींसोबत फिरायला निघाली.अगोदरच पेशवे घराणे स्त्री लंपट आणि पुरुष लंपट होते हे जगजाहीर होते. अचानक आनंदाबाईला मातीवर एका पुरुषाच्या पाऊल खुना दिसल्या.त्या पाऊल खुणा सर्व सामान्य माणसापेक्षा मोठ्या आणि आकर्षक होत्या.आनंदीबाई त्या पाऊल खुनावरच भाळली.तिने त्या पाऊल खुना कुणाच्या आहेत याचा शोध घ्यायला लावले.शोधातून समोर आले की त्या पाउल खुना लोहारकाम करणाऱ्याच्या चंद्रा महारांच्या होत्या. त्यावेळेस महार समाज राजांचे शस्त्र बनविन्याचे आणि युद्धात लढाई करण्यात शौर्यवान होते.जेव्हा आनंदाबाई त्याला पहायला गेली तेव्हा तो तलवार बनविण्याचे काम करत होता.त्यामुळे सहाजिकच त्याच्या कामामूळे त्याचे शरीर पिळदार झाले होते.उष्णतेमुळे अंगावर अगोदरच कमी कपडे होते. त्यातल्या त्यात तेव्हा महार समाजाचे लोक कस्तुरीयुक्त पान खात होते.ज्यातुन सर्वबाजूला सुगंध दरवळायचा.चंद्राचे पिळदार शरीर आणि कस्तुरीयुक्त पानाच्या तोंडून येणारया सुगंधाने तिची कामवासना जागृत झाली.तिने त्याला राजवाड्यावर बोलविले.तिच्या नजरेतील कामवासना चंद्राच्या वडिलांनी ओळखली. त्याच्या वडिलाने त्याला राजवाड्यावर जावू दिले नाही.राणीला हा अपमान वाटला.एक राणी जर चंद्रा सारख्या महारावर भाळत असेल तर तिच्या राज्यातील इतर साध्या स्त्रियांची काय स्थिती होत असेल.(नितीन आगे चे प्रकरण आठवा) हा तिला प्रश्न पडला?. चंद्रा वाड्यावर आला नाही म्हणून तो एक राणीचा अपमान होता.त्याचा सुड म्हणून रघुनाथ पेशवेच्या सहीने तिने राज्यात फर्मान काढला की.”यानंतर महारांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू राहील.हे यासाठी की कोणत्याही महाराच्या तोंडुन कस्तुरीयुक्त पानाचा सुगंध कुणास जावू नये आणि ती थुंकी रस्त्यावर न टाकता मडक्यातच थुंकेल आणि कमरीला मातीवर सरपटणारा झाडू यासाठी की कोणत्याही “महाराच्या पाऊल खुणा मातीवरच्या पाहून जर राणी भाळू शकते तर इतर स्त्रियाही भाळतील म्हणून महारांच्या कमरेला झाडू लटकविण्यात आला.” याचाच अर्थ असा होतो की आम्ही गबाळ,अस्वछ नव्हतोच.आमचा इतिहास हा अभिमानास्पद होता.जो ब्राम्हणांच्या कामवासनेने नासवला. पेशवे तर सोडा परंतू महार समाजाच्या अंगी असलेले पराक्रम,शूरत्व व लढवय्यपणा इंग्रजांच्या ही पारखी नजरेतून सुटले नाही त्यांच्या ह्या गुणांचा पुरेपुर उपयोग पेशव्यांच्या विरोधात करून २८००० हजार पेशवाई सैनिक फक्त ५०० महार सैनिकांनी उभी कापून काढली.एक महार ५६ जणांना पुरुण उरत होता.पेशवे भांबावल्यासारखे न लढताच सैरावैरा नुसतेच पळत सुटले. पेशवाई हारली आणि महारांनी पुर्णपणे नेस्तनाबूत करून टाकली.मग तेव्हा पासूनच एक म्हण पडली ती अशी कि तुझ्यासारखे असे छप्पन (५६) पाहिले. ह्या म्हणीचा खरा इतिहास हा आहे. बुद्धिजीवी विचारवंत साहित्यिक संपादक लेखक पत्रकार हे सत्य परिस्थिती समजून सांगण्यास लिहण्यास का घाबरतात?.
महारांच्या पराक्रमी शौर्य मुळे इंग्रज खूपच खुश झाले होते आणि ह्या खुशीच्या बदलल्यात महारांना इंग्रजांनी जमीनी बहाल केल्या.पण महारांनी जमिनी पेक्षा इतिहास कायम नांव राहावे आणि त्यांची आठवण राहावी म्हणून विजयस्तंभाची मांगणी केली.इंग्रजांनी ती मान्य करून विजयी स्तंभ बांधण्यात आला.त्या विजयी स्तंभावर ५०० महारांची नावे कोरण्यात आली.हाच तो १८१८ सालचा भीमाकोरेगावचा इतिहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात शिक्षण घेतांना वाचला म्हणून त्यांनी आपल्या लोकांना सोबत घेऊन ह्या पराक्रमी शूरवीरांना वंदन करण्यासाठी १ जानेवारीला न चुकता जायाला लागले. म्हणुन आता लोक दरवर्षी जातात.कारण ते जर लढले नसते तर आपले अस्तित्व ही असून नसल्या सारखेच असते.जसे आज लाखो च्या संख्येने जातो पण आदर्श काय आहे?.प्रेरण कोणती घेतली. एक दिवसाची प्रचंड लक्षवेधी गर्दी दुसऱ्या दिवशी कुठेच संघटितपणे शूरवीर म्हणुन ओळखल्या जात नाही.पुन्हा स्वार्थी लाचारी असंघटीत श्रम व इमान विकणारी जमात बनते. महारांचा हा शुर व पराक्रमाचा इतिहास सोशल मिडियावर देशभर १ जानेवारी २०१८ पासून फिरत आहे.परंतु यातुन आजच्या बौद्ध झालेल्या महारानी कोणती प्रेरणा घेतली?. ६ डिसेंबर,१ जानेवारी,१४ एप्रिल,विजया दशमी धम्मचक्र परिवर्तन दीना सारखे आम्ही लाखोंच्या संख्येने गर्दी करण्यासाठी एकत्र येतो आणि जातो, पण विजयी होत नाही आजही खेड्यातील बौद्ध समाजाला मराठा पाटील इतर समाजाच्या राजकीय गुंडगर्दी मुळे गांव सोडून पळून जावे लागते,ते भी आंबेडकरी चळवळीतील एकमेव राष्टीय नेत्याचा स्वतःचा असा लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्ह्यात आणि ज्यांना बहुजन समाज श्रदय स्थान,प्रेरणशोत्र मानते त्या जिल्ह्यात असा लक्षवेधी घटना घडल्या आहेत.आज महार कोणी नाही. म्हणुन कोणी पराक्रमी नाही.महारांच्या कितव्या पिढीने बुद्ध धम्माची दिक्षा घेतली सांगता येत नाही. त्यामुळे नागपुरच्या त्या महा धम्मउपासिका एका बाजूला दिक्षाभूमी च्या तोडीचे डॉग्रेन पॅलेस महाविहार बनवुन बुद्ध आंबेडकरी विचारांचे केंद्र चालवितात.तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन एकता मंच नांवाने पेशवाईच्या विचारधारेचे कमळ आपल्या कर्मभूमीत फुलवितात त्यांना कालच्या पेशवाईचे आमच्या पांचशे महारानी का कापून काढले हा इतिहास माहित नसेल काय?.दुसरे केवळ विधान परिषद,राज्यसभा मिळविण्यासाठी अख्खी चळवळ गहाण ठेवतात.ते पूर्वी पँथर होते यावर आजचे तरुण कसा विस्वास ठेवतील. त्यांना आणि त्यांना मानणाऱ्या लोकांना भीमकोरेगांव ला महारानी पेशवाईला का खलास केले.त्यांचा कोणता आदर्श आज पेशवाईला मदत करणारे घेतात?.कालची पेशवाई आणि आजची पेशवाई यात जर फरक असेल.तर कालचे इमानदार, शौर्यवान महार आणि आजचे बेईमान,स्वार्थी, लबाड महार सॉरी बौद्ध!. भिमाकोरेगांवला मानवंदना देण्याच्या लायकीचे नाहीत.असेच म्हणावे लागेल. तेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठया संख्येने आहे हे माहित असुन सुध्दा जिद्दीने लढले. आज आम्ही संख्येने सर्वांना सोबत घेऊन ८५ टक्के होतो. हे माहित असुन ही पेशवाईच्या पालखीचे भोई होतो.म्हणजे कुठे तरी काही तरी गडबड आहे.म्हणुन पेशवे सरकार आजकालचे आणि भिमा कोरेगांव यांचा अभ्यास करावाच लागेल अन्यता घरवापसी ठरलेली आहे.१ जानेवारी च्या शौर्यदिनाचा इतिहास वाचुन इतिहास घडवावा कि भिमा कोरेगांव ला जाऊन कुंटुंबिक सहल घडवीत राहणार?.तिथे ही वेगवेगळे बॅनर होडींग आणि स्टेज आणि वेगवेगळी भाषण!. मग कोणत्या तोंडाने आम्ही सांगणार आहोत की ५०० महार सैनिका कडून आम्ही प्रेरणा घेऊन लढलो आणि जिंकलो.
सर्व समाजाच्या पक्ष,संघटना प्रमुख, राष्टीय संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या चिल्यापिल्याला घेऊन या भिमाकोरेगांव जत्रेत यायचे एक दिवसाची पिकनिक,आनंद उत्सव उत्स्फूर्तपणे साजरा करून निघून जायचे त्यालाच आता दोनशे सहा वर्षे पूर्ण झाले,पुढे काय?.शूरवीर महारांच्या कंबरेला झाडू व गळ्यात मटके का आले?. येणाऱ्या काळात ते आपल्या घरात येणार नाही काय?.माफ करा…भक्तानो,शिष्यानो अनुयायानो, भिमसैनिकांनो. भिमा कोरेगांवच्या पांचशे महारांचा आदर्श जिद्द घेऊन संघटीत होणारं की असंघटीत होऊन कंबरेला झाडू व गळ्यात मटके घेणार?. त्या पाचशे शूरवीर महारांना कोणती मान वंदना देऊन सॅल्युट मारणार?.जयभिम!. जयभारत!!,जय संविधान!!!,धन्यवाद!!!.
आपला- सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई ९९२०४०३८५