ओबीसी सुतार समाज नेत्यांनी ओबीसी बद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यभर दौरे करावे!

बातमी शेअर करा.

संविधान निर्मात्यांनी संविधानात विशिष्ट कलमे निर्माण करून ओबीसींसाठी तरतूद केलेली आहे त्याचा योग्य उपयोग समाजात नेतेगिरी करणाऱ्या ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाज जागृतीसाठी करावा. ओबीसी सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा साज चढविलेल्या अनेक सामाजिक संघटना,संस्था,विविध विकास मंच,अनेक विविध प्रतिष्ठान सुध्दा असतील आणि संपूर्ण राज्यभरात विविध पातळीवर हजारो पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असेल यापैकी अनेक जण स्वतःलाच समाजाचे दिग्गज नेतृत्व आणि धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणवून घेत असतील परंतु, कोणाच्याही नेतृत्वाखाली स्वतःच्या हक्काच्या गृह जिल्ह्यात ओबीसी,आरक्षण,जनगणना,संवैधानिक हक्क अधिकार सत्ता,संपत्ती,ज्ञान आणि राजकीय हिस्सेदारी संदर्भात समाज जागृती मेळाव्यात लाखोंच्या संख्येने समाजाला एकत्रित केलेले नाही.
    विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात अनेक वर्षांपासून मोठ्या रुबाबात नेतेगिरी करणाऱ्या कोणत्याही स्वयंघोषित दिग्गज नेत्यांनी आणि कोणत्याही स्वयंघोषित धडाकेबाज युवक नेत्यांनी आपापल्या नेतृत्वाखाली कधीही लाखोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करून ओबीसी,आरक्षण,जनगणना,संविधान,सत्ता,संपत्ती,ज्ञान आणि राजकीय हिस्सेदारी संदर्भात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत आणि आपापल्या ज्ञानाचा ज्ञान भांडार,आपापल्या ज्ञानाचा ज्ञान महासागर खुला केलेला नाही.आणि याव्यतिरिक्त कोणत्याही स्वयंघोषित समाज नेत्यांनी ओबीसी सुतार समाजाला संवैधानिक आधाराचे कवच आणि संवैधानिक अधिकार असलेले राजकीय प्रतिनिधित्व सुध्दा मिळवून दिले नाही.
    ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील सर्वच सन्माननीय जबाबदार पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली मग ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पद तालुका पातळीवर असो अथवा जिल्हा पातळीवर असो किंवा,राज्य पातळीवर असो असावे फक्त नावासोबत पदभार,पदावली,एखाद्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली असेल अशा सर्वच विद्वान,बुद्धिवान,कर्तृत्ववान प्रत्येक जबाबदार सन्माननीय पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली त्या त्या क्षेत्रातील त्या त्या भौगोलिक क्षेत्रातील ओबीसी संदर्भात समाज जागृती मेळाव्यात,आरक्षण,संविधान जागरूकता अभियान कार्यक्रमात,ओबीसी समाज आंदोलनात,ओबीसी मोर्चात किंवा,इतर अन्य ओबीसी संदर्भात सुतार समाज प्रबोधनात्मक,समाज आंदोलनात्मक कार्यक्रमात संबंधित नेतृत्वाखाली दरडोई किमान दहा ते पंधरा हजार ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करावं यासाठीच मोठं धाडस करावं.
    विश्वकर्मीय सुतार समाजात एवढा मोठा प्रचंड समाज ताफा,संपूर्ण राज्यातील जबाबदार आणि कृतिशील लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांची प्रचंड शक्ती,पाठबळ सामाजिक संघटनांकडे कार्यरत असतांना ओबीसी संदर्भात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात पिछाडीवर कशासाठी हा प्रश्न मात्र समाजात अनुत्तरित आहे.ओबीसी सुतार समाज सुशिक्षित,उच्चशिक्षित,बुद्धिवान आहे याची कल्पना सर्वानाच आहे.शिवाय अनेक समाज मान्यवर समाजात समाज प्रतिष्ठित,प्रतिभावंत,प्रभावशाली असतील.समाजात अनेक मान्यवरांनी स्वतःच्या नावासोबत समाज नेता,समाज नेतृत्व आणि युवक नेतृत्व अशी सन्मानित पदाची बिरुदावली सुद्धा जोडण्यात आलेली असेलच. याव्यतिरिक्त समाजात सुतार समाजाची शान,बाण,आण आणि दिग्गज,धुरंधर,बुलुंद तोफ,बुलुंद आवाज तसेच कार्यसम्राट,कर्तबगार,कर्तृत्ववान, तडफदार,धडाकेबाज,विचारवंत,मार्गदर्शक,आधारस्तंभ असणारे सुद्धा ओबीसी सुतार समाजात नक्कीच असतील.
     विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात समाज प्रभाव,प्रभूत्व,प्राबल्य,समाजात समाजप्रिय सुद्धा असतील समाजात वैयक्तिक पातळीवर कोण किती आर्थिक परिस्थितीने गर्भश्रीमंत,धनवान,धनाढ्य,प्रतिष्ठित, प्रतिभावंत आहेत याचा संबंध अजिबात येत नाही.समाजात सामाजिक श्रीमंती आणि वैयक्तिक श्रीमंती हे दोन्हीही विषय वेगवेगळे आहेत हे लक्षात घेणे गरजेचे असते.सामाजिक क्षेत्रात मोठ्या दिमाखात नेतेगिरी करणाऱ्या समाज नेत्यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना ओबीसी संदर्भात आरक्षण जनगणना संवैधानिक अधिकार राजकीय हिस्सेदारी इत्यादी संदर्भात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात,समाज जागृती मेळाव्यात,आंदोलन ठिकाणी आणि ओबीसी मोर्चात सहभागी करून आपापल्या ज्ञानाचा ज्ञान भांडार,आपापल्या ज्ञानाचा ज्ञान महासागर खुला करून राज्यभरात ओबीसी संदर्भात नवचैतन्य निर्माण करावे.
   विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात पदांची निर्मिती करणे म्हणजे संबंधित पदाची कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणिव करून देणारे एक महत्वाचे माध्यम असते.पदांची निर्मिती म्हणजे मान्यताप्राप्त आणि कर्तबगार नेतृत्व होत नाही.सुतार समाजात नेतेगिरी करणारे आणि संघटना अध्यक्ष मान्यवरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात ओबीसी संदर्भात विविध,अनेक विषयांवर समाज जागृती महामेळाव्याचे आयोजन करून लाखोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करण्याची गरज आहे.सामाजिक,वैचारिक,नैतिक जबाबदारीचा विचार करता हे शिवधनुष्य पेलणे जमतच नसेल तर मग आवर्जून म्हणावेसे वाटते कि,समाजात विविध पदांची निर्मिती शोभेची वस्तू नसून विकासासाठी आणि समाज प्रबोधनासाठी असतात.म्हणूनच एक विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज बांधव म्हणून जबाबदारी पूर्वकच म्हणावेसे वाटते कि,ओबीसी सुतार समाज नेत्यांनी ओबीसी संदर्भात जनजागृती करण्यासाठीच राज्यभर दौरे करावे.या सामाजिक न्यायिक तत्वांचे आणि नैतिक मूल्यांचेच काटेकोपणे पालन केले तरच आपण खऱ्या अर्थाने ओबीसी सुतार समाजासह ओबीसी बहुजन समाजात सुध्दा अभिनंदनास आणि परिपक्व,खंबीर नेतृत्व करण्यास लायक ठराल.
  लिखाण समाज जागृती अभियान अंतर्गत.
प्रमोद सूर्यवंशी चिखली,मातृतीर्थ बुलडाणा
   मोबाईल:-८६०५५६९५२१.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *