भीमा कोरेगावचे लढाऊ नेते सुदामराव पवार (बाबा) यांना दुःखमुक्ती “निर्वाण.”

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी सनसवाडी पुणे:- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक नालंदा बुद्ध विहार सणसवाडीचे संस्थापक  सुदामराव पवार (बाबा) यांचे रविवारी पहाटे सणसवाडी येथे राहत्या घरी वयाच्या ९४ वर्षी त्यांना दुःखमुक्ती मिळाली. त्यांचे निर्वाण झाले. ते 94 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले दोन विवाहित मुली सुना जावई नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी दुपारी सणसवाडी येथील स्मशानभूमी त्यांच्या पार्थिव वर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. सुदामराव पवार हे कार्यकर्त्याची कदर करणारे मैत्री भावना जपणारे बाबा होते.कार्यकर्त्यांची व्यक्तिगत विचार पूस करून कुटुंब स्तरावर जिव्हाळा,आपुलकी दाखवणारे नेते होते.त्यांनी तळेगाव दाभाडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती.भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभा च्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात लढणारे प्रथम नेते होते.सनदशिर मार्गाने पत्रव्यवहार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सणसवाडी येथे त्यांनी आपल्या शेतामध्ये नालंदा बुद्ध विहाराची स्थापना करून स्वतः विहार बांधले आहे.दरवर्षी 1 जानेवारी भीमा कोरेगाव येथे आलेल्या भीमसैनिकाची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था सुदामराव (बाबा) पवार करत होते. त्यांच्या अंतिम संस्कार विधीला माजी आमदार जयदेव गायकवाड, सणसवाडीचे माजी सरपंच दत्ता हरगुडे, उपसरपंच राजू दरेकर,ऍड.विजय दरेकर,प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, प्रा.दि.वा.बागुल,भदंत धम्मशील,पत्रकार रामदास लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर अंतिम संस्कार विधीला उपस्थित होते..

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *