
महाराष्ट्र राज्यात आजच्या घडीला उपवर्गीयकरण मुद्यामुळे विशिष्ट जाती मध्ये तीव्र नाराजी तर काही जातीत आनंदाच्या उकल्या फुटत आहेत. या अगोदर मराठा विरोधी ओबीसी आरक्षणच्या मुद्दामुळे स्पोटक संवेदनशील झाले होते. याबाबत एक ही राजकीय पक्ष कोणतीही ठोस भूमिका घेण्यास समर्थ नाही,सर्व असमर्थ आहेत. प्रत्येक नेत्याला वाटते “धरले तर चावते आणि सोडले तर पाळते.” मग विचारकरा २६ जुलै १९०२ ला देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,तेव्हाची परिस्थिती कशी असेल.आजचा मराठा सर्व ठिकाणी गरीब असल्या तरी स्वताला सवर्ण समजतो.आणि इतरांना लाचार समजतो.कारण इतिहास सांगतो मराठा समाज हा देणारा होता.म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय १९०२ मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात.कारण शाहू महाराजांना स्वीकारले,तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते.आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठयांचे संघटन बांधता येत नाही.म्हणून मनोज जरांगे फक्त आरक्षण मागतात बाकी काही नाही. पण राजर्षी शाहू महाराज वाचत नाही.
मराठे ओबीसी विसरतात की फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत.परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जात वास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते.महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते.आजही नाही.आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. कारण सामाजिक बंधुभाव, समता,दलित बांधवांचा उद्धार,शिक्षण,शेती, उद्योगधंदे,कला व क्रिडा,आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले,ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य,दुष्ट रूढी परंपरा,निरक्षरता,अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला.शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले.भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी,संता,महंता, राजे,महाराजे,समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा,निरक्षरता सामाजिक दुजाभाव,दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघड ठेवला.समाजातील गोरगरीब,दीनदुबळे,मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला.समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन,बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली.स्त्री शिक्षण,देवदासी प्रथेचे उच्चाटन,महिला संरक्षण कायदा,विधवा पूनविर्वाह कायदा,आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली.अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले,त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत.मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही,ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.
सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले.फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे.हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे. बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्या शिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले,आज जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात येत आहे. कारण मूलमुली मिळत नाही. ते खाजगी शाळेत प्रवेश घेतांना दिसतात सर्व खाजगी शाळा कॉलेज हे राजकीय जात दांडग्या,धन दांडग्या नेत्याच्या आहेत. चांगल्या शिक्षणाच्या नांवाखाली त्यांनी जिल्हा परिषद शाळा बंद करण्यास भाग पडल्या.या उलट राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.
८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ फेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळीतील लोकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.
आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले.हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळीतील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला शाहु महाराज सयाजी महाराज, कबीर, महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले. म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.पण त्याचा अर्थ खेड्या पाड्यातील मराठा समाजातील लोक महार माजले त्यांना जास्त माझ आला असा काढतात.राजर्षी शाहु महाराज यांच्या आरक्षण देणाऱ्या २६ जुलै १९०२ या दिवसाला २६ जुलै २०२६ ला १२४ वर्ष पूर्ण होतील.निमित्य सर्व मराठा समाजाला नम्र आवहान आहे की प्रथम शाहु महाराज समजून घ्या त्यानंतर आपले खरे शत्रु कोण व खरे मित्र कोण हे समजून येईल.आरक्षणची गरज आज कोणा कोणाला आहे हे सर्व सरकारी खात्यातील आडनावे तपासून पहा,शाळा महाविद्यालये कोणाच्या नियंत्रणा खाली चालतात ते पहा. मंदिरावर कोण्या जातीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तिथे शंभर टक्के आरक्षण त्यांना का लागू आहे. मंदिराच्या दररोजच्या उत्पन्नावर कोणाचा अधिकार आहे. हे प्रश्नच मराठा ओबीसी समाजाला पडत नाही. ते फक्त मागासवर्गीय एस सी, एस टी ची शैक्षणिक सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहतात. हे सर्व त्यांना आरक्षणामुळेच मिळाले असा त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी अंधश्रद्धा सोडून विज्ञान स्वीकारले मंदिरात जाणे सोडून शाळा कॉलेज मध्ये जाणे जास्त पसंत केले. त्यांनी सर्वच कर्मकांड करणे सोडले म्हणूनच त्यांची प्रगती झाली. केवळ आरक्षणामुळेच त्यांची प्रगती झाली आणि ते ब्राह्मण समाजाला प्रत्येक क्षेत्रात समोर समोर आव्हान देतात.स्पर्धा करतात हेच ब्राम्हणाना जड जाते म्हणूनच ते मराठा ओबीसी समाजात आरक्षणा वरुण तेड निर्माण करण्याचे जीवतोड प्रयत्न करीत आहेत.उपवर्गीकरण हा उघड उघड ५९ जातीत संघर्ष लावण्याचा कट आहे हे आता लपून राहिले नाही. याबाबत किती राजकीय पक्षाची ठोस भूमिका आहे. तपासून पहा.राजर्षी शाहु महाराज यांच्या १५५ व्या जयंती निमित्य सर्व बहुजन समाजाला विशेष मराठा ओबीसी समाजाला विनंती आहे की त्यांनी आरक्षणाची वस्तुस्थिति सत्य परिस्थिती समजून घ्यावी आणि आपन कोणा बरोबर संघर्ष करावा हे ठरवावे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

