सामाजिक क्रांती अभियानामध्ये सर्व बहुजन समाजाने सामील व्हावे.

भिमा कोरेगाव ते पंढरपूर 12 जुलै ते 23 जुलै 2026 रोजी धम्मयात्रा पदयात्रा पुज्यनिय भिक्खू ज्ञानज्योती महास्थविर व भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेत्तर समाजाच्या स्वाभिमानाचा वारसा म्हणजे पंढरपूरचा पंढरीनाथ होय,३२ लक्षणे आणि ८० अनुव्यंजनांनी आणि वेढलेली काया नाथाचाही लोकनाथ भगवान बुद्ध म्हणजेच पंढरीनाथ होय संत तुकोबारायांच्या भाषेत काया हि विठ्ठल काया ही पंढरी महाराष्ट्राचे नाक म्हणजे पंढरीपूर होय,आषाढी समारंभाच्या पर्वावर चारी दिशेने आगेकूच करीत पंढरपूरला वाऱ्या येतात. ते पुण्य कर्म संग्रहीत करण्यासाठी ज्या आषाढ पौर्णिमेला सर्व बोधिसत्वांनी आपआपल्या मातेच्या कुशीमध्ये प्रवेश केलाय महाभिनिष्क्रमण (गृहत्याग) केले आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर याच पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून संपूर्ण जंम्बोदीपा मध्ये मोठ्या हर्षोलहासाने साजरा केला जातो.सर्वच सम्यक समबुद्धा च्या (भूतकाळ,वर्तमानकाळ आणि भविष्यातले) या तिन्हीही घटना एकसमान घडत असतात.म्हणूनच या पौर्णिमेला आषाढ समारंभ धम्मचक्र प्रवर्तन दिवस पाळला जातो. भिक्षूच्या वर्षावासाला प्रारंभ होतो. आपापल्या गावा शहरांमध्ये भिक्षुंना वर्षवासाकरिता आमंत्रित करण्यासाठी या वाऱ्यांचा प्रपंच असतो. कालाघा मध्ये ब्राह्मण संस्कृती आरुढ होऊन श्रमण संस्कृतीचे पतन झाले आणि सारच लुप्त झाले,संपूर्ण समाज ब्राह्मणवादाचा गुलाम झाला आणि सर्व समाज जातीपातीला वाटला गेला. भिक्षू भिक्षुणीच्या हत्या करण्यात आल्या काही भिक्षू डोक्या दाढीचे केस वाढवून जंगल पहाडाच्या आश्रय घेऊन राहू लागले. प्राचीन काळातील भोलानाथ आणि सर्व नाथ पंथी हे भिक्षुचं होते. महाराष्ट्रातील सुफी आणि वारकरी संतांची परंपरा होती. कालोघात सारेच विस्मरण झाले. हा जाती पातीत विभागला सर्वच बाम्हणेत्तर समाज पूर्वी नागवंशीय समाज होता. संपूर्ण महाराष्ट्र धर्मवाणांची आणि धर्मवंतांची खाण होती. आणि भगवान बुध्दांच्या धम्म संस्कृतीचे रक्षण करणारा धर्मवाणांचा आणि धर्मवतीचा हा महाराष्ट्र होता.
हे देहू रोडला २५ डिसेंबर १९५४ ला बुद्ध विहाराचे उद्घाटन करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलत होते. जंबुदीपातील (२०००) दोन हजार लेण्यापैकी एकट्या महाराष्ट्रात (१५००) पंधराशे पेक्षा जास्त लेण्या आहेत ही याची साक्ष होय. असे ते म्हणत डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड (१८) अठरा हू वॅज विठ्ठल या लेखांमध्ये पंढरपूरचे मंदिर हे बुद्ध विहार होय आणि पंढरीनाथ विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध होते. एवढेच नव्हे तर सर्व प्राचीन मंदिरे हे बुद्ध विहारेच होती.असे ते बोलून गेले. जाती पातीत विभागलेला हा सर्व ब्राम्हणोत्तर समाज हा भगवान बुद्धाच्या सदधम्माचा वारदार होता.याचे स्मरण करून देण्यासाठीचाच हा प्रपंच. जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही. खऱ्या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि तुटलेल्या माणसांची मने जोडण्यासाठी आणि समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी हा प्रवास आहे. आपण प्रवास यात्री बनून या धम्म यात्रेमध्ये सहभागी होऊन एक जिनशी समाज निर्माणासाठी पुढे या.असे मुख्य आयोजक पूज्यनीय भिक्कू ज्ञानज्योती महास्थवीर- ९०११७०२०११.यांनी या पत्रकाद्वारे जाहीर आवाहन केले आहे.

प्रारंभ १२ जुलै २०२६ क्रांतीस्तंभ भीमा कोरेगाव पुणे समारोप २३ जुलै २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर धम्म यात्रा पदयात्रा संयोजन समिती.अखिल भारतीय भिक्कू संघ ताडोबा अभायारण्य संघारामगिरी चंद्रपूर.भिक्कू दिव्य नाग – ८३९०८१०७२२,भिक्कू विनयपाल -८३०८१४९०३०, भिक्कू संघ ज्योती – ९७६७९५५६९०,भिक्कू नागज्योती – ७७७५०४५४३४, भिक्कू धम्म रक्षित ७५००२२२०८, भिक्कू थेव धम्मो – ९६६५०७४९४६, भिक्कू धम्म वरो – ७७३८५२७३५८, भिक्कू प्रियबोधी – ९२२६९५१९७९, आयु. राजाभाऊ सरवदे-९८२२५९२६२७, आयु. असित गांगुर्डे – ९८२२४२४४४७, आयु. सोमनाथ भोसले – ९८९०७९५१५२, आयु. डी.टी.भोसले – ९८३४३८९९२६, आयु. राजेंद्र गवदे – ९८२३८१३१४०, आयु. रामदास जगताप – ९६८९६०८७२०, बाळासाहेब धाईजे – ९९६०९५०१०५,
सामाजिक क्रांती अभियानामध्ये सर्व बहुजन समाजाने सामील व्हावे.
आयु. सोमनाथ भोसले – ९८९०७९५१५२, यांस कडून

