शिक्षण सम्राट की कुलगुरू ,की राज्यपाल,की आमदार,की.बरेच काही ?

बातमी शेअर करा.

डॉ. डी. वाय. पाटील – (ज्ञानेश्वर यशवंत पाटील-) यांचे कोल्हापूर येथे दिनांक- ४-८-२०२६ रोजी द:खद निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे मोठा कौटुंबिक गोतावळा आहे भला मोठा  हजारो शैक्षणिक संस्थाचा पसारा आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी सरकारी की खाजगी शिक्षण संस्था.महाराष्ट्रातील तरुण उच्च शिक्षणासाठी शेजारी राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांकडे भरमसाठ फी भरून शिक्षणासाठी जाऊ लागले तेंव्हा महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी डॉ डी वाय पाटील यांना बोलावून सांगितले की महाराष्ट्र राज्यात खाजगी उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण चळवळ सुरू करावी. याकरिता आवश्यक सरकारी परवानग्या देत आहे.आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका ( Earn & Learn  ) शाळेत शिकलेल्या पैलवान ज्ञानेश्वर यशवंत पाटील यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर शेकडो शिक्षणा संस्थांच्या द्वारे लाखो विद्यार्थी घडविले.
      कोण बोंबलत आहेत.पण समाजात काही विघ्नकर्ते लोक असतात ज्यांना आपली दोन अपत्ये शिकविण्याच्या वेळी नाकी नऊ येतात पण ही मंडळी डॉ. डी. वाय. पाटील व त्यांच्यासारख्यांना “शिक्षण सम्राट” म्हणून हिनवतात. आणि अशीच दांभिक मंडळी पाठीमागच्या दारातून या शिक्षण सम्राटांच्या कॉलेजात आपली मुलं शिकवतात व काही वेळा तिथले लेक्चरर म्हणून आपली वर्णी लावल्याची हजारो उदाहरणे आहेत.अर्थातच काही खाजगी शिक्षण संस्थांनी आरंभीच्या काळी भरमसाठ फी, डोनेशन घेतले. कारण स्वार्थ आणि केंद्र अथवा राज्य सरकार  कडे या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या नियमनासाठी नियम, पुरेशी यंत्रणा व अनुभव नव्हता.कायदे- नियम आले सावकाश.कालांतराने AICTE/MCI/UGC/NAACH/ Fees regulation system/Court regulation  इत्यादी आकाराला येत गेले. दरम्यान अनेकांनी हात धुवून घेतले.काही ठिकाणी तर पत्र्याच्या शेडमध्ये खाजगी इंजिनिअरिंग काॅलेज भरवल्या चे लक्षात आले. अर्थात भारतासारख्या विकसनशील देशांत काही वर्षे घराच्या चुलीवर व स्टो वर स्वयपाक करावा लागला/ लागतो. तर मग खाजगी उच्च शिक्षण क्षेत्रात रामराज्य येणार कुठून.
      दोन लेकर शिकवता येईना.तरीही डॉ. डी. वाय. पाटील यांनी बहुढंगी खाजगी शिक्षण संस्थांचे जाळे महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर,देशाबाहेर उभारले त्यातून लाखो नवतरुण उचशिक्षित झाले, मोठमोठ्या पदावर गेले, परदेशात मास्टर्स करायला जमले पैकी काहिंना परदेशातच  आयुष्याचे गाडे स्थिरस्थावर करणे शक्य झाले.बियरबार कंपनी की विद्यापीठ.नेरूळ, नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे भले मोठे संकूल आहे. शालेय शिक्षणापासून पीयचडी पर्यंतच्या सुमारे ५० विद्या शाखांचे शिक्षण इथे दिले जाते. क्रिकेटचे उत्तम स्टेडियम सुद्धा आहे जे नव्या मुंबई ची शान ठरते. शिवाय उत्तम दर्जाचे मेडिकल कॉलेज व हाॅस्पिटल जनतेच्या आरोग्य सेवेत आहे.
     मुंबई- पुणे हायवेवर जे एल. पी. (लंडन प्लिस्नर) नावानेही हा चौक ओळखला जातो. म्हणे ही एल. पी. बियरबार कंपनी आहे व मालक विजय मल्ल्या जो भारतातून फसवणूक करुन पळून गेला.मला सहजी प्रश्न पडला की डी. वाय. पाटलांनी असे काही केले नाही. उलट या  बंद पडलेल्या की बंद पाडलेल्या बियरबार कंपनी जवळ अगदी ५०० फुटावर हा  ज्ञानेश्वर यशवंत पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ) भले मोठे खाजगी शिक्षणसंस्थांचे जाळे उभा करतो जे भारताच्या कोणत्याही एका विद्यापीठाच्या आकाराचे, व्यापाईतके व दर्जाचे आहे.आम्ही चालवू हा पुढे वारसा.राहीलच अर्थात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका योजनेत हाॅस्टेलमधे तयार झालेल्या माजी आमदार,माजी राज्यपाल,पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटलांनी आपल्या भल्यामोठ्या कौटुंबिक गोतावळ्याला या भल्या मोठ्या शैक्षणिक कार्यात आपसूक गुंतविले आहे, त्या सर्वांना आपल्या डोळ्यादेखत तावून-  सुलाखून तरबेज केले आहे. म्हणून या ज्ञानेश्वरांने चेतवलेला ज्ञानयज्ञ अखंड तेवत राहीलच राहील.सलाम कोल्हापूरी पैलवानाला.अशा ग्रेट समाज कल्याणाचा वसा घेतलेल्या डॉ. डी. वाय. पाटलांना त्याच्या  संस्थांच्या माध्यमातून शिक्षण घेतल्या लाखो  विद्यार्थी,तमाम पालकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


 सुधीर जाधव- ९८६९४१५५३३,नळवाडीकर,नेरूळ, नवी मुंबई 
 मुक्त पत्रकार, समाजशास्त्राचे अभ्यासक व सेवानिवृत्त- व्हीजेटीआय. मुंबई 
   ssjvjti@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *