विधीकर्ते, धम्म दीक्षा देणारे यांच्यावर जबाबदारी कोणती?बौध्द धम्माला हिंंदू धर्म करणार्‍यांना रोखायचे कोण?

बातमी शेअर करा.

सन 1956 च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दीक्षानंतर विशेषतः हिंदू महार जातीतील व्यक्तीसह कुटुंबाची ओळख बौध्द अशीच जवळपास झाली आहे. सोशल मिडीयावर काहीजण धर्म व जातीचा बायोडाटा शेअर करतात. त्यात धर्म-बौध्द व जात-महार असा अक्षम्य चुकीचा उल्लेख केला जातो. पण अशी ओळख होणे कितपत योग्य आहे? बौध्द धम्म आणि हिंदू धर्माची विचारधारा, आचरण पध्दत, श्रध्दा, विश्‍वास, विधी, उपासना,संहिता पूर्ण अलग आहे. पण जसे हिंदू महार लोक स्वतःला बौध्द म्हणत आहेत तसे धम्माचा धर्म होवू लागला आहे. त्यामुळे असे वाटते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी धम्माचा मार्ग दाखवला नसता तरी चालले असते. महाराष्ट्रात महार समाज तर महाराष्ट्राबाहेरही बाबासाहेबांना मानणारे हिंदू धर्मातील एससी व एसटी प्रवर्गातील जातींचे लोक आहेत. तेथे सरसकट जातींचे लोक हे बाबासाहेबांना आपला महामानव, दैवत मानतात. महाराष्ट्रात मात्र तसे नाही. येथे मोजकेच वगळता मांग,चांभार, ढोर, भंगी, बुरूड, खाटीक इ एससी प्रवर्गातील जातींच्या लोकांसह, एसटी व भटके व भटके विमुक्त प्रवर्गातील जातीचे लोक हे बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जातीचे नाहीत, ते महार जातीचे आहेत असा दुराग्रह करून असल्याने त्यांच्या घरात बुध्द ना बाबासाहेबांची प्रतिमा. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख एका जातीची करताना सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की,बाबासाहेब हे बौध्द आहेत. त्यांचा हिंदू धर्मातील कोणत्याच जातीशी तीळमात्र संबंध नाही. महाराष्ट्राबाहेर महार जात नसल्याने तेथील लोक बाबासाहेब हेच आमचे ‘मसिहा’ असल्याचे मानतात. पण त्यांचाही बौध्द धम्माबाबत विचार केला तर ते देखील महाराष्ट्रात जसे महार समाज धम्माबाबत तळ्यात-मळ्यात आहे तसे ते समाजदेखील आहेत. एकमात्र मान्य करावे लागेल की महार लोक व महाराष्ट्राबाहेरील वर उल्लेख केलेल्या प्रवर्गातील जातींचे लोक शुध्द बौध्द झाले नसतीलही, पण त्यानी बाबासाहेबांच्यामुळे बुध्द आणि धम्माला नाकारलेले नाही. म्हणूनच काहीच अपवाद वगळता त्यांच्या वस्तीतील तक्याचे रूपांतर बुध्द विहारात झाल्याचे दिसते. त्या लोकांच्या घरात बाबासाहेबांच्याबरोबर बुध्दांची प्रतिमा असते, त्या समाजातील बहुतांशी कुटुंबे आपल्या घरातील विवाह, गृहप्रवेश, नामकरण, मरणोत्तर विधी बौध्द पध्दतीने करत आहेत, आपल्या घरांना, वस्तींना धम्माशी निगडित नावे देत आहेत, आपल्या वाहनांवर धम्माशी निगडित प्रतिकं (उदा.धम्मचक्र) चिकटवीत आहेत, सम्राट अशोक कालिन बौध्द स्तूपात जात आहेत, त्याच्या संवर्धन व विकासासाठी प्रयत्न करत आहेत, मोर्चे, आंदोलने करताना दिसत आहेत. पण हिंदू धर्मातील सण असतात त्यावेळी या लोकांकडून धम्माचे तत्वज्ञान बासनात गुंडाळून ठेवतात. त्यावेळी ते बाबासाहेबांना हिंदू व हिंदूतील देव (मसिहा) करायला मागे पुढे पाहत नाहीत.
  लक्ष्मीच्या ठिकाणी बाबासाहेब-
 नुकताच हिंदू म्हणजे ब्राम्हणी धर्मातील दिवाळी सण उत्साहात संपन्न झाला. बौध्द धम्माचा आणि दिवाळीचा काडीमात्र संबंध नाही. ‘नावाजलेला गुरू देवळात हागू लागला.’ या म्हणी प्रमाणे वर नावाजलेल्या जातीचे लोक दिवाळी सणादिवशी धम्माचा धर्म करताना दिसत आहेत. येथे काही फोटो देत आहे.(हे फोटो दैनिक मुक्तनायकच्या शनिवार दि.7 नोव्हेंबर 2026 रोजीच्या अंकातील या लेखात पहावयास मिळतील. पीडीएफ किंवा प्रिंट अंक पहावा.) ते पाहिले तर लक्षात येईल, की दिवाळी सणाच्या अमावश्या दिवशी लक्ष्मी पूजन असते. वरील जातीचे लोक हिंदू धर्मातील लक्ष्मी पूजन हा दिवाळी सणातील उपक्रम पार पाडत असताना लक्ष्मीच्या फोटोऐवजी बाबासाहेब व बुध्दांचा फोटो ठेवून त्याची पूजा करत आहेत. असे करणे बाबासाहेबांना हिंदू देव करण्यासारखे आहे. अशा लोकांना बौध्द  किंवा आंबेडकरी अनुयायी तरी कसे म्हणता येईल? हे लोक जितकेही धम्मासाठी कार्य व कृती करत आहेत त्याला शून्य गुण आहे.


दिपदानोत्सव एक बहाणा-काही लोकांना चांगले माहित आहे की, दिवाळी सण हा बौध्द धम्मातील नाही. तरीही लोक दिपदानोत्सवाचा बहाणा शोधून दिवाळी सण साजरा करत आहेत. बौध्द धम्मात दिपदानोत्सव होता की नाही याबद्दल मतभिन्नता आहे. बौध्द धम्मात चंद्र कालगणना मानली जाते. त्यामुळे तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अश्‍विनी महिन्यात चंद्राचे दर्शन होत असल्याने दीप लावून चंद्राचे स्वागत करण्याची प्रथा बौध्द धम्मातच नव्हे, तर भारतात जितकेही धर्म स्थापित झालेल्या धर्मात आहे. कारण ब्राम्हणी धर्मासह देशातील सर्व धर्म चांद्रकालगणना मानतात. बारकाईने लक्ष दिले तर आषाढ शुध्द पौर्णिमा (धम्म पौर्णिमा) दिवशी बौध्द धम्मातील धम्म जयंती (धम्म स्थापना दिन/धम्मचक्र प्रवर्तन दिनोत्सव) सण साजरा झाल्यानंतर ते अश्‍विनी शुध्द दसमी (10 वा दिवस) पर्यंत कोणताच महत्वाचा सण नसल्याचे दिसून येईल. या दरम्यान पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने चंद्रांचे दर्शन होत नाही. कदाचित त्यामुळेच सण किंवा कोणताही घरातील विधी (विवाह, गृहप्रवेश, नामकरण इ.) आयोजित केले जात नसावेत. भिक्खू संघ पौर्णिमापासून पृथ्वीवर दर्शन होत असलेल्या पूर्ण चंद्राकृतीला वंदन करून दिप लावून चंद्रांचे स्वागत करण्याला प्रारंभ होवून समारोप शुध्द कार्तिक पौर्णिमाला होतो. तर ब्राम्हणी धर्मात चंद्रांचे स्वागत अश्‍विनी शुक्ल पौर्णिमा (कोजागिरी) ला चंद्राच्या प्रकाशित भोजन करून केले जात असले, तरी खर्‍या अर्थाने दीपोत्सवाला प्रारंभ कार्तिक कृष्ण अमावश्यापासून होवून तो कार्तिक शुक्ल पौर्णिमापर्यंत असतो. कार्तिक पौर्णिमा दिवशी ते आपल्या धार्मिक स्थळ (मंदिरं), प्रेरणा स्थळ, वारसा स्थळासह नदी, तलाव येथे दिप लावून दिपोत्सवाचा समारोप करतात. बौध्द हे एक महिना दिप लावून चंद्राचे स्वागत करतात. यालाच दिपदानोत्सव म्हणतात. हे दिपदान आपल्या बौध्द स्तूप, बुध्द विहार, प्रेरणा स्थळ, वारसा स्थळांसह नदी, तलाव येथे करताना या धार्मिक व सांस्कृतिक कृतीशी दिवाळी-वसू बारस (गाईचे पूजन), दिवाळी-धनत्रयोदशी (ब्राम्हण-धन्वंतरी जयंती.), दिवाळी-नरक चतुर्दशी (बहुजन प्रतिपालक राजा नरकासूर यांच्या हत्येचा स्मृतिदिन) उत्सव, दिवाळी-लक्ष्मी-कुबेर पूजन, दिवाळी-पाडवा (1.वामन (ब्राम्हण) याने केलेल्या बळीराजाचा खूनाचा उत्सव 2. इ सा पुर्व 185 च्या कार्तिक कृष्ण अमावश्यालाच सम्राट अशोक राजा यांचे आठवे वंशज राजा बृहद्रथ मौर्य यांचा आर्य वंशज पुष्यमित्र शुंगाने खून करून व बौध्द सत्तेचा पाडाव करून सत्ता काबीज केली. म्हणजे  दिवाळी-पाडवा हा बौध्दांच्या पराभवाचा दिवस, तर ब्राम्हणी सत्तेचा विजय दिन) व दिवाळी-भाऊबीजचा काडीचाही संबध येत नसताना लोक दिपदानोत्सवाच्या नावाखाली दिवाळी सणच साजरा करत आहेत. म्हणजे हे लोक बौध्दांच्या दिपदानाचेही दिवाळी सणात रूपांतर करत आहेत.
दिवाळीसाठी संविधानाचा दाखला-
दिवाळी सण करणे म्हणजे संविधानाने दिलेले स्वातंत्र असल्याचे काहीजण सांगून स्वतःला बौध्द म्हणणारे दिवाळी सण साजरा करत आहेत. मुंबई, भांडूप येथील शरद आढाव (शासकीय सेवेत क्लास टू अधिकारी होते.) हे आपले बौध्द सर्टीफिकेट दाखवत असतात. ते घरी दिवाळी साजरी करतात. त्याचे समर्थन करताना काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात वाचा ‘दसरा दिवाळी सण आला की,धर्मांतरीत बौध्द समाजाला बावीस प्रतिज्ञांची प्रकर्षाने आठवण येते.आम्ही बौध्द आहोत आमच्या धर्मात हे सण नाहीत.असे सण साजरे करणारे गद्दार आहेत, बेईमान आहेत.ज्या समाजावर सवर्णांनी बहिष्कार टाकला होता तेच बहिष्कृत बांधव आपल्याच बांधवांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करतात. सणासुदीच्या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे प्रयत्न करीत असतात.दिवाळीचे बोनस सुट्टया सगळ्यांचा उपभोग घेतात. मात्र,दिवाळी साजरी करणार्‍या आपल्याच बांधवांना लक्ष्य करीत असतात.,  एखाद्या बौध्द माणसास गणपतीची पूजा करायची असेल तर तो त्याचा तो हक्क आहे.मात्र,ही पूजा ती व्यक्ती बुध्द विहारात करू शकत नाही.अशी पूजा ती व्यक्ती गणपती मंदिरात करू शकते, स्वत:च्या घरी गणपती उत्सव साजरा करू शकती. बौध्द व्यक्तीस हिंदू धर्मातील दिवाळी सण साजरा करण्याचा मूलभूत हक्क आहे. कारण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटनेची प्रस्तावनाच  त्या बौध्द धर्मिय व्यक्तीस विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य देते. सबब, धर्मांध व कट्टर धर्मांतरीत बावीस प्रतिज्ञांवाल्या बौध्दांनी दिवाळी हा छरींळेपरश्र ऋशीींर्ळींरश्र साजरा करणार्‍या बौध्दांना गद्दार वगैरे म्हणू नये.’ आढाव चक्क दिवाळी सणाला राष्ट्रीय सण असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत.हे धाडस हिंदू धर्मातील कोणताच शंकराचार्य करू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर असल्याचे ते म्हणतात. पण कोणत्या सरकारने तसा अध्यादेश काढला आहे? संसद कायदे बनविते. कोर्ट नव्हे. मग महाराष्ट्रातील महायुती सरकारने गणपती उत्सव, दसरा हे  हिंदू देवांशी कनेक्टेड असलेले सण राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे. मग आढाव यानी घरात गणपतीही बसवावा आणि दसराही करावा. इतकेच नव्हे तर दही हंडीही खेळायला आपल्या परिवारासह जावावे. कारण त्या खेळालाही सरकारने खेळाचा दर्जा दिला आहे.  हिंदू असलेले प्रबोधनकार ठाकरे आपल्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात लिहितात, ‘सण (हिंदू धर्मातील) हे बहुजनांच्या पराभवाचे, दुःखाचे दिवस आहेत आणि ब्राम्हणांसाठी आनंदाचे आहेत.’ आढाव सारखे ढिगाने लोक दिवाळी सण साजरा करता यावा यासाठी मुर्खासारखे संविधानाचा दाखला देवून दिवाळी सणाचे समर्थन करत आहेत. पण ते बाबासाहेबांनी हिंदू सणांना विरोध करणारे दाखले सोयीने विसरतात. धम्मातील त्रिपिठीका ग्रंथ हिंदू धर्मासह कोणत्याच धर्मातील सण घरात साजरे करण्याची मान्यता देत नाही. याचा कधी संदर्भ देणार नाहीत. अन्यथा त्यानी केवळ धम्मातील सण साजरे केले असते. गेल्या वर्षी दिवाळी लक्ष्मीपुजनला मुंबईतील एका भगिनीने लक्ष्मी प्रतिमाबरोबर बुध्द व बाबासाहेबांची प्रतिमा पुजन करताना तेथे फळे, मिठाई वगैरे ठेवले होते. त्यांचा पूजेचा फोटो पाहून एकाने त्याना सल्लावजा सूचना केली की, आपणास दिवाळी, लक्ष्मी पूजन करायचे असेल तर जरूर करा पण बुध्द आणि बाबासाहेबांना तेथे पुजू नका. ते देव नाहीत. तेव्हा ती भगिनी म्हणते, तुम्ही आम्हाला हे सांगू शकत नाही. बुध्द व बाबासाहेब हे देवच आहेत. हे ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाणारच.  तिचे बौध्द पध्दतीने ज्याने लग्न केले आहे त्या  विधीकर्त्यांचे थोबाड फोडले पाहिजे व भिक्खूंना सांगितले पाहिजे की ‘तुम्ही घरोघरी भिक्षाटणासाठी जात नसल्यानेच अशा लोकांनी बुध्द व बाबासाहेबांना ब्राम्हणी देव करण्यास सुरू केले आहे.
बाबासाहेब काय म्हणतात-
वरील सर्व ‘जे आहे ते’ जाणून घेतल्यानंतर गेल्या 70 वर्षात जेवढा धम्म बाटला आहे तितका धम्म स्थापना ते 1956 पुर्वीपर्यंत म्हणजे 2500 वर्षे बाटला नसावा. धम्म दीक्षाचे नियम न पाळता धम्म दीक्षा दिली जाते. धम्म दीक्षा घेण्यापुर्वी 10 दिवस ते 90 दिवसापर्यंत धम्म श्रामणेर (धम्म संस्कार, आचरण प्रशिक्षण ) करणे बंधनकारक असते. बरं श्रामणेर न करता जरी ज्या व्यक्तीस धम्म दीक्षा दिली असेल, तर त्या व्यक्तींने जुन्या धर्माचे सणवार, देवदेवता सोडून दिले का? धम्म आचरण करते का? धम्माचे नियम पाळते का?  इत्यादी पाहण्याची जबाबदारी धम्म दीक्षा देणार्‍यांची असते. धम्म दीक्षा घेणार्‍यांपैकी 98 टक्के लोकांनी जुन्या धर्माच्या चालीरिती, सण वार सोडून दिलेले नाहीत. तेव्हा धम्म दीक्षा घेणार्‍यांपेक्षा धम्म दीक्षा देणारे धम्माचे अधिक गुन्हेगार आहेत. डॉ.बाबासाहेब ीक भविष्यात धम्माचा धर्म होवू शकतो हे ध्यानात घेवूनच सन 1936 च्या महार परिषदपासून ते 1956 च्या धम्म दीक्षा समारंभापर्यंत महार लोकांना धम्माच्या पावित्र व संहिताबाबत उपदेश करत होते. 1936 ला महार परिषदेत महार लोकांनी हिंदू धर्मातील कोणताही सण साजरा करू नये, देवदेवता मानू नये यासंबधीचा ठराव केला. 1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दि. 28 ऑगस्ट 1937 रोजी मुंबईतील वांद्रे येथे सभा आयोजित केली होती. त्या सभेत ते म्हणाले, ‘जातीने ठराव (1936 चा मुंबई इलाखा महार परिषदमधला) केला तो मान्य का नसावा? हिंदू धर्माप्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण-वार सोडून दिले पाहिजेत.’ त्याच सभेत चार ठराव मंजूर केलेत त्यातील पहिला ठराव असा होता, ‘मुंबई इलाखा महार परिषदेच्या ठरावाप्रमाणे आपल्या बंधूभगिनींनी हिंदू धर्माचे सणवार, व्रतवैकल्ये वगैरे धार्मिक विधी आणि उपोषण वगैरे धार्मिक आचार पाळू नयेत.’ 2.वरळी, मुंबई येथे 14 जानेवारी 1951 रोजीच्या आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘बुध्द धर्माची दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुध्द हे चालणार नाही. शिवाय ज्या हिंदू लोकांना बौध्द धम्माची दीक्षा घ्यावयाची असेल त्यानी हिंदू धर्माच्या दृष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौध्द होतात व बौध्द धर्माचा ब्राम्हण धर्म बनवतात व बौध्द धम्माचे मूळच नाहिसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेवून तुम्हाला बौध्द धर्मात येता येणार नाही.’ 3.डॉ.बाबासाहेब आंबेडकर 14 जानेवारी 1955 रोजीच्या मुंबईतील आपल्या भाषणात म्हणतात, ‘बुध्द धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमानुसार वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे पाचच अनुयायी जरी मिळाले तरी पुष्पळ झाले!’ 4. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी 15 ऑक्टोबर 1956 रोजीच्या नागपूर धम्म दीक्षा समारंभातील भाषणात म्हणतात, ‘मात्र तुमची (महारं) जबाबदारी मोठी आहे. तुमच्या (महार) बद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तमरितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होवू नये.’ बाबासाहेबांचे वरील भाषणातील मते लक्षात घेता लोक लक्ष्मीच्या जागी बाबासाहेबांना पूजत आहेत, दिपदानोत्सवाच्या नावाखाली, संविधानाचा अक्षम्य तर आहेत शिवाय बाबासाहेबांचा मते व विचार टाचेखाली घेण्यासारखे आहे. तसेच हिंदू धर्मातील सण व देव मानणारे लोक बौध्द म्हणतात खरे पण ते बौध्द धर्माचा ब्राम्हणी धर्म बनवून बौध्द धम्माचे मूळच नाहिसे करत आहेत. याची कुणालाच फिकीर नसावी?
भिक्खू, विधीकर्तेंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे-
तथागतांना धान्याचे कोठारं उपलब्ध करून देण्याची इच्छा राजा शुध्दोधन व अन्य राजांनी व्यक्त केली, पण त्यास बुध्दांनी इतक्यासाठी नकार दिला की, किमान अन्नाच्या निमित्ताने लोकांच्या दारी जावून धम्म सांगता येईल. म्हणूनच त्यानी भिक्खू संघासाठी भिक्षाटन करण्याची, एका गावात तीन दिवसापेक्षा अधिक दिवस राहता येणार नाही इ. संहिता केली. या संहितांचे पालन गेले 70 वर्षे भिक्खूंनी केले असते, तर आज हिंदूंच्या दिवाळीला लक्ष्मीच्या ऐवजी बुध्द, बाबासाहेबांना देव केल्याचे दिसले नसते,
  दिपदानोत्सवाच्या नावाखाली दिवाळी साजरी केली नसती. ज्याना दिपदानोत्सवच करायचा असेल तर ते बौध्द स्तूपात दिवे जाळायला गेले असते. कोणी संविधानाचा दाखला देवून दिवाळी हा राष्ट्रीय सण आहे आणि तो आम्ही साजरा करणार असे म्हटले नसते. कोणी गणपती उत्सव, नवरात्रौ उत्सवात महिला 9 रंगाच्या साड्या नेसून उपवास करत बसल्या नसत्या. तसेच अन्य ब्राम्हणी सण साजरे करताना दिसले नसते. विधीकर्त्यांनी ज्यांच्या घरात विधी केला आहे त्या घरात विधी करतेवेळी 22 प्रतिज्ञा मान्य करून घेतल्या जातात. त्या प्रतिज्ञाचे अनुकरण होते की नाही याची पाहणी केली असती तर विधी केलेल्यंापैकी 98 टक्के घरात धम्माचा धर्म झाला नसता, यास विधीकर्ते गुन्हेगार आहेत. पैसे मिळतात म्हणून विधी करतात. पण अशा पैशाला हरामचे पैसे म्हणतात. काहीच अपवाद. अजूनही वेळ गेलेली नाही. भिक्खूंनी आपली जबाबदारी ओळखावी. गेल्या वर्षी एक भिक्खूंनी काहींच्या घरातील बुध्द व बाबासाहेबांच्या प्रतिमा काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इतक्यासाठी त्या भिक्खूंनी प्रतिमा काढत होत्या की त्या घरात गणपती उत्सव साजरा केला जात होता. कुणाला काय करायचे आहेत ते करू देत. पण बुध्द व बाबासाहेबांच्या प्रतिमा घरात लावायच्या, स्वतःला आंबेडकरी अनुयायी, बौध्द म्हणायचे, घरात भीम जयंती साजरी करायची व त्याच घरात 22 प्रतिज्ञाविरोधात कृत्य करायचे हे कोणत्या शास्त्रात लिहिलेय? म्हणून त्या भिक्खूंनी अभिनंदास पात्र आहेत. अशा भिक्खूंणीसारखे सर्व भिक्खू घरोघरी जावून भिक्षाटण करू लागले तर त्या घरातील अंदाज येईल आणि किमान बुध्द, धम्म, संघ, बाबासाहेबांचे पावित्र अबाधित राहिल. दै.मुक्तनायकने धम्मातील जितकेही प्राचीन सण (उदा. धम्म जयंती, संघ जयंती, वर सुजाता पौर्णिमा, धम्म विजया दसमी, बुध्द रथ उत्सव इ.) समोर आणले आहेत. इ सण साजरे केले तर…आज हे सण जे बौध्द आपल्या घरी साजरा करत आहेत त्यांच्या घरी भिक्खूंनी भेटी द्याव्यात. जर भिक्खू विहारातून बाहेर पडणार नसतील, विधीकर्ते व्यवसाय म्हणून धम्माचा विधी करत असतील तर  दसरा, दिवाळी, शिमगा, पाडवा साजरा करणारे लोक बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे बौध्द धम्माचा ब्राम्हणी धर्म करण्याची दाट शक्यता आहे. या लोकांना रोखणारे कोणी आहेत का सच्चे आंबेडकरी अनुयायी?
देवदास बानकर ९२२५८०६९९०,संपादक दैनिक मुक्तनायक कोल्हापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *