कर्मचारी एकजुटीचा निर्धार; हक्काच्या लढ्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचाही खंबीर पाठिंबा!

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी पुणे – महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठातील तांत्रिक, अतांत्रिक व प्रशासनिक कर्मचारी/ अधिकारी. तसेच महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील शिक्षकेतर कर्मचारी,अधिकारी,महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धडक मोर्चा व एकदिवसीय धरणे आंदोलने जनआंदोलनात कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून दिली आणि एकजुटीचा निर्धार हक्काच्या लढ्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचाही खंबीर पाठिंबा द्यावा असेश्री.राम भातांब्रे, सेवानिवृत्त कर्मचारी, एस.जी. जी. एस.नांदेड. यांनी जाहीर केले.

 राज्यातील असंख्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या आणि न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपलाही खारीचा वाटा असावा. आपण सेवानिवृत्त झालो असलो, तरी कर्मचारी बांधवांच्या सुख-दुःखाशी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांशी असलेले आपले नाते कायम आहे. त्यामुळे अधिक वेळ न घालवता अनेक सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी पुणे गाठले.


  महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष श्री. अजय बळवंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध घोषणांनी परिसर दुमदुमून टाकत मोर्चा संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाला.या आंदोलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील सार्वजनिक विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
   मोर्चाच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीने आवाज उठविण्यात आला. आंदोलनादरम्यान संचालक, उच्च शिक्षण यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळाची भेट झाली. दिवाळीनंतर वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले.या आंदोलनात सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळेच सर्व  कर्मचारी बांधव हार्दिक अभिनंदनास पात्र ठरले. सर्वांचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.


या मोर्चाचे नेतृत्व करणारे अध्यक्ष श्री. अजय बळवंत देशमुख, मुख्य संघटक श्री. रावसाहेब त्रिभुवन तसेच पुढील सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन!
श्री. प्रकाश म्हसे, श्री. मिलिंद भोसले, श्री. दिनेश दखणे, श्री. आनंद खामकर, डॉ. कैलास पाथ्रीकर, श्री. नरेश वरेकर, श्री. संदीप हिवरकर, श्री. दिलीप उपासे, श्री. माधव राऊळ, श्री. जी. वाय. पाटील, श्री. मनोहर राजपूत, श्री. अशोक रानवडे, श्री. बाळासाहेब आंत्रे, श्री. सुमित ढोरे, श्री. संतोष मदने, श्री. सतीश वाघमारे, डॉ. सुनील धिवार, श्री. मारोती धोत्रे, श्री. भीमा मस्के, श्री. राजाराम माने, श्री. केतन कान्हेरे, श्री. शाम पंचवटे, श्री. विजय घरत, श्री. सुनील थोरात, श्री. चंद्रशेखर कदम, श्री. प्रवीण पाटील, श्री. उमेश देशमुख, श्री. ज्ञानेश्वर बारस्कर आणि श्री. प्रशांत देशमुख यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.
   राज्याच्या विविध भागांतून आलेल्या अनेक सहकाऱ्यांची, विविध महाविद्यालयांतील कर्मचारी बांधवांची आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची संधी प्रत्येकाला मिळाली. सर्वांशी संवाद साधला.विशेष आनंदाची बाब म्हणजे कर्मचारी केवळ उपस्थिती लावण्यासाठी आले नव्हते, तर मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण आंदोलनात सहभागी राहिले होते.


आज दिनांक ५ नोव्हेंबर, वसुबारस अर्थात दीपावलीचा पहिला दिवस! एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र दिवाळीच्या सणाच्या आनंदात रममाण झालेला असताना, दुसरीकडे आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुण्यातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी बांधव एकत्र आले होते.विशेष उल्लेख करावासा वाटतो तो आपल्या महिला कर्मचारी भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचा! वसुबारससारखा सणाचा दिवस, घरातील सणासुदीची कामे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असूनही महिला कर्मचारी भगिनींनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग होत्या. एवढेच नव्हे, तर सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रचंड उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता त्या संपूर्ण आंदोलनात ठामपणे उपस्थित राहिल्या.त्यांचा हा उत्साह,जिद्द,संघर्षशील वृत्ती आणि कर्मचारी चळवळीप्रती असलेली निष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानाला सर्वांनी मनापासून सलाम केला. 


त्याचबरोबर पुरुष कर्मचारी बांधवांनीही सणाचा दिवस, प्रवासाचा त्रास आणि उन्हाची तीव्रता यांची पर्वा न करता मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिलेले योगदान तितकेच कौतुकास्पद आहे.महिला असोत वा पुरुष, सर्व कर्मचारी बांधवांनी एकाच ध्येयाने, एकाच विचाराने आणि एकाच निर्धाराने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी दिलेला हा लढा म्हणजे कर्मचारी एकजुटीचे जिवंत उदाहरण आहे.
 कोणता ही सरकारी सेवा देणारा कर्मचारी सेवानिवृत्त होतो; पण कर्मचारी चळवळीशी असलेले त्याचे नाते कधीच संपत नाही. सहकाऱ्यांच्या न्याय्य हक्का च्या  मागण्यांसाठी उभे राहणे, त्यांच्या संघर्षात सहभागी होणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही प्रत्येकाची सेवा निवृत कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे.
आज पुण्यातील आंदोलनातून कर्मचाऱ्यांची एकजूट, संघटनात्मक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि हक्कांसाठी एकत्र येण्याची ताकद प्रत्यक्ष अनुभवता आली. विशेषतः सणाचा दिवस असूनही एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी दिलेली उपस्थिती ही या लढ्याप्रती असलेल्या त्यांच्या प्रामाणिक भूमिकेची साक्ष आहे.
हीच एकजूट भविष्यातील यशाचा पाया ठरेल, असा अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाम विश्वास वाटतो.सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम, केलेले नियोजन आणि राज्यभरातून आलेल्या प्रत्येक कर्मचारी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग निश्चितच अभिनंदनीय होता.असे श्री.राम भातांब्रे- ९९६००७४२८४,सेवानिवृत्त कर्मचारी,एस. जी. जी. एस.नांदेड.यांनी विशेष प्रतिनिधी समोर मनोगत व्यक्त केले.


सर्वांच्या एकजुटीला मनापासून सलाम!
एकजूट कर्मचाऱ्यांची, लढा हक्काचा!
बळकट संघटना, सुरक्षित कर्मचारी!
सेवानिवृत्त झालो, पण कर्मचारी चळवळीशी असलेली नाळ आजही कायम आहे!
श्री. सुधीर जाधव ९८६९४१५५३३,सेवानिवृत कर्मचारी.वीरमाता जिजाबाई टेकनॉलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय माटुंगा मुंबई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *