लोककलावंत सांस्कृतिकमंच ऐरोली नवी मुंबई संस्थेचा लोक कलावंतांचा भव्य मेळावा संपन्न.

बातमी शेअर करा.

कवी गायक रुपेश साखरे यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

विशेष प्रतिनिधी मुंबई – दि ४/११/२६ रोजी लोककलावंत सांस्कृतिकमंच ऐरोली नवी मुबंई या संस्थेच्या वतीने लोककलावंतांचा भव्य मेळावा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई या ऐतिहासिक वास्तूत अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.विविध लोककलाच्या सादरीकरणातून परिवर्तनाचा मानवी मूल्य जोपासणारा विचार सहजतेने सामान्य माणसापर्यंत पोहोचवता येतो मानवनिर्मिती पासून संगीत लोककला मानवाच्या प्रगती बरोबरच प्रगतशील होत गेल्या. संगीत हे  निसर्गात व मानव समूहात दृश्य अदृश्य स्वरूपात सुगंधाप्रमाणे नियमित दरवळत असते.संगीतावर व लोककलांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि कला संवर्धनासाठी सतत कृतीशील असलेल्या लोककलावंत सांस्कृतिक मंच या संस्थेने कलावंत मेळावा आयोजित केला होता. 
या कार्यक्रमात महाराष्ट्र भरातून अनेक गझलकार, कवी, गायक, संगीतकार,साहित्यिक अशा अनेक दिग्गज कलावंतांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. त्याप्रसंगी कवी गायक रुपेश साखरे यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्राचे लोकप्रिय गीतकार,संगीतकार,कवी,जेष्ठ साहित्यक “विसरू नको रे आई बापाला,” या अजरामर गीताचे गायक, विष्णू शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी कवी रुपेश साखरे यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरीय कलारत्नपुरस्कार मिळाल्या बद्दल आदरणीय गायक विठ्ठल राऊत,गायक अभिमान गायकवाड, गायक अजय अटकाळे, गायक विष्णू (अण्णा) शिंदे सर गायिका सारिका सावंत यांनी रुपेश साखरे यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्यावेळी रुपेश साखरे यांनी या सर्व मान्यवर कवी,गायक,साहित्यिक यांचे मन:पूर्वक आभार मानले.लोक कलावंतांना लोककलावंत सांस्कृतिक मंच या  संस्थेची प्रगती अशीच वायुवेगाने होत राहो हिच पुरस्कार प्राप्त कवी गायक,साहित्यिक यांनी मंगल मनोकामना व्यक्त केली. 

कवी गौतम मोरे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *