
स्त्री: समतावादी मातृसत्ताक समाजपध्दतीत घर, कुटु़ंब, कबिला, समाज, राज्य व राष्ट्राची एकेकाळची सम्राज्ञी असलेली ; विषमतावादी पुरुषसत्ताक समाज पध्दतीत दासी बनवली गेली. तिच्याकडून पौरिहित्यासह घरचा सर्व कारभार काढला गेला. तिला अबला व नादान ठरवले गेले.
तिच माहेर सोडणं स्वाभाविक मानलं गेलं,
तिचं नाव बदलणं परंपरा मानली गेली,
तिची सेवा कर्तव्य मानली गेली,
तिच्या इच्छांचा बळी दिला गेला,
तिला चार भिंतींच्या आत बंदिस्त केलं गेलं,
प्रजोत्पादन व पतीची सेवा हिच तिची नियती मानली गेली.
परंतु, आपला इतिहास, सण- उत्सव तपासा! ते काय म्हणतात ते पहा!
आपल्या सर्व सण- उत्सवांचे पौरिहित्य अजूनही स्त्री करते
आपल्या सर्व मातृदेवता, कुलमाता स्त्रियाच आहेत.
आपल्या सर्व जीवनदायणी नद्यांची नावे स्त्रीवाचक आहेत. मग, ती अबला, अपवित्र व दुय्यम कशी?
मानसिकता बदला! स्त्रीयांचे जीवन बदलेलं!
स. वा. राजाराम तुळसाबाई सुकदेव सूर्यवंशी.


