
विशेष प्रतिनिधी मुंबई – दि मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन लि.च्या संचालकपदी ॲड. प्रमोद सागर तायडे.यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ईशान्य मुंबईचे लोकप्रिय खासदार मा. संजयभाऊ दिना पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी ॲड. प्रमोद सागर तायडे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून स्वागत केले.
या प्रसंगी सहकार क्षेत्रातील प्रिय मित्र श्री. शांतीलाल बोरुडे, ज्येष्ठ संचालक, मुंबई पूर्व उपनगर बेरोजगार सेवा संस्थांचे फेडरेशन,श्री. अविनाश पाटील, संचालक, मुंबई सहकारी बोर्ड, श्री. गोविंद बोरुडे तसेच इतर सहकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकप्रिय खासदार मा. संजयभाऊ दिना पाटील भाऊ,यांनी दाखवलेले प्रेम, आपुलकी, विश्वास आणि दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी व लक्षवेदी आहेत. या प्रेमळ सन्मानाबद्दल आपण सर्वांचा मी मनःपूर्वक आभार मानतो.आपला स्नेह, आशीर्वाद आणि विश्वास असाच कायम राहू द्या!. असे ॲड. प्रमोद सागर तायडे संचालक दि मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन लि.यांनी मनोगतात व्यक्त केले.
शांतीलाल बोरूडे यांस कडून


