विचार बदला, जीवन घडवा: निस्वार्थ प्रेमातून नवभारताचे निर्माण करा.

बातमी शेअर करा.

जीवन म्हणजे माणसाचा स्वतःचा विचार, माणसाचा स्वतःचा विचारच त्यांचे जीवन घडवते. माणूस आपल्यातील शक्तीनुसार जगतो. माणसाचा जिद्द, कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती त्याचे जीवन घडवते. माणूस कोणावर जास्त प्रेम करतो? तर मुलावर. पण त्याच्या मुलाबद्दल असे कुठे लिहिले आहे? आपण असे का म्हणतो, असे आपण ऐकले आहे, त्याचा विचार असाच बनतो, पण जर त्याने सर्वांवर प्रेम केले तर काय होईल? हा विचार कधी येईल? जर स्वार्थ दूर झाला आणि त्याने सर्वांवर प्रेम केले, तर!  एक नवीन भारत घडवला जाईल. जो स्वार्थी असतो त्याला निःस्वार्थी म्हटले जात नाही. प्रत्येकजण प्रेम करतो पण……कोणावर???. पैशावर जास्त प्रेम करतो. 

देशातील सरकारी नोकरी करणारे सर्व लोक निस्वार्थी सेवा देणारे असले तर भारत महान झाला असता.पण ९५ टक्के लोक स्वार्थी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करून सेवा देतात.म्हणूनच कोणी कोणावर निस्वार्थी प्रेम करत नाही. सर्वावर प्रेम हा विचार खूप सकारात्मक, प्रेरक आणि समाजोपयोगी आहे. तुमच्या या विचारांना अधिक सुसूत्र आणि प्रभावी रूप देऊन हा विचार बदला, जीवन घडवा: निस्वार्थ प्रेमा तून नवभारताचे निर्माण करा. असा संदेश आर सी एम निर्माते तिलोकचंद छाबडा (टी.सी.सर) यांनी आर सी एम वार्षिक संमेलनात (गुरुकुल) भिलवाडा राजस्थान दिला.


    जीवन म्हणजे माणसाचा स्वतःचा विचार; माणसाचा स्वतःचा विचारच त्यांचे जीवन घडवतो. प्रत्येक व्यक्ती आपल्यातील आंतरिक शक्तीनुसार जगत असते. माणसाची जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती त्याचे भविष्य आणि जीवन घडवते.सहसा माणूस कोणावर जास्त प्रेम करतो? तो आपल्या कुटुंबावर, विशेषतः आपल्या मुलांवर सर्वाधिक प्रेम करतो. आपण नेहमी असेच पाहतो आणि ऐकतो, आणि त्यातूनच आपली मानसिकता तशीच बनत जाते. पण, जर माणसाने आपल्या मर्यादित कोशातून बाहेर पडून सर्वांवर प्रेम केले तर काय होईल? हा विचार आपल्या मनात कधी येईल?. ज्या दिवशी आपल्या मनातील स्वार्थ दूर होईल आणि आपण सर्वांवर निस्वार्थ प्रेम करायला लागू, त्याच दिवशी एका नवीन भारताचे निर्माण होईल. कारण, जो स्वार्थी असतो त्याला कधीही निस्वार्थी म्हटले जात नाही. 


   आजच्या जगात प्रत्येकजण प्रेम करतो, पण त्यामागे कुठेतरी अपेक्षा, पैसा किंवा वैयक्तिक फायदा दडलेला असतो; जिथे स्वार्थ असतो तिथे प्रामाणिकपणाला किंमत राहत नाही. आजच्या दूषित वातावरणामुळे समाजातील मूल्ये ढासळत चालली आहेत, पण हे वातावरण बदलण्याचे काम आपल्यालाच करावे लागेल.त्यासाठी निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा आणि मूल्ये यांवर आधारित काम करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण आपले विचार बदलू, तेव्हाच समाजाचे विचार बदलतील. प्रेम हे केवळ शब्दांतून व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आणि इतरांच्या समस्या दूर करण्याच्या प्रयत्नांतून दिसले पाहिजे.पण हे साध्य कसे होणार? आपले मन वारंवार भटकत असते, त्याला शांत आणि एकाग्र कसे करायचे? याचे एकच उत्तर आहे.निस्वार्थी बनणे आणि योग्य विचारांची (सत्संगाची) संगत धरणे. जेव्हा आपण चांगल्या विचारांशी जोडले जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक रोग मुक्त, पर्यावरण मुक्त आणि व्यसनमुक्त समाज व कुटुंब घडवण्याची ताकद आपल्यात निर्माण होते.हेच काम आपल्याला आर सी एम च्या माध्यमातून करायचे आहे. 

   आपली सकाळची सुरवात दात तोंड स्वच्छ करून होते. त्यासाठी प्राकृतिक व हर्बल तत्वाने बनविलेला टूथपेस्ट, दंतमंजन आणि उच्च गुणवत्ता ब्रश वाले ब्रश लागतात. त्यानंतर अंगोळसाठी लागणारे साबण,शांपू,त्यानंतर चहा,कॉपी, नसता,कांदेपोहे,शिरा,वडा,उपमा,उसळ,मिसळ त्यासाठी वापरलेल जाणारे अन्न धान्य तेल,दुपारचे जेवण,त्यासाठी लागणारे अन्न धान्य,मिट मिरची मसाला हे चांगले दर्जेदार असले तर स्वस्थ आहार स्वस्थ परिवार पाहण्यास आपल्याला भेटेल. म्हणजेच आपल्याला निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारचे शुद्ध अन्न धान्य,तेल,मिट,मिरची,मसाला आवश्यक आहे. ते आपल्याला आजकाल मार्केट मध्ये आपण पाहतो किती नीतीमत्ता सोडून लोक स्वार्थीपणे धंदा करतात. त्यांना लोकांच्या आरोग्याची,पर्यायवरणाची,कोणतीच पर्वा नाही.अशा लोकां  पासून प्रथम आपण सावध झालो पाहिजे. आणि कुटुंबातील, नात्यातील,परिसरातील मित्रमंडळींना सावध केले पाहिजे. त्यांना आर सी एम च्या उत्कृष्ट उत्पादनाची माहिती दिली पाहिजे.सर्वांना रोग मुक्त, पर्यावरण मुक्त आणि व्यसन मुक्त राहण्यासाठी आर सी एम उत्कृष्ट गुणवत्ता असलेले उत्पादन घेण्यासाठी तयार केले पाहिजे तरच नव भारत निर्माण होईल. 

    आर सी एम RCM Consumer products Pvt.Ltd.Spl – ६, RCM Worid RllCO Growth Centre,Hamirgarh, Bhilwara Rajasthan.येथे देशभरातील विविध राज्यातील विविध जाती धर्माचे लोक केवळ एक उपभोग घेणारे ग्राहक म्हणून आले होते.त्यांची राहण्या,खाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.इथे कोणी गरीब श्रीमंत नव्हता सर्व एका मोठ्या हॉल मध्ये पाचशे हजारच्या संख्येने एक रात्र दोन दिवस एकत्र कुटुंबासारखी गुण्यागोविंदाने भाईचारा बनवून राहिले. ही खूप प्रेरणादायी लक्षवेधी ऐतिहासिक घटना पाहण्यास मिळाली.यातून सेवा,स्वावलंबन,स्वास्थ्य, संस्कार,महिला सशक्तीकरण यावर भर देऊन आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याचे जन आंदोलन पाहण्यास मिळाले. 


      “रिटेल की ताकद” चा मराठी अर्थ किरकोळ विक्रीची ताकद होतो,उत्पादन करणाऱ्या कंपनीचे उत्पादन सरळ ग्राहकाच्या घरापर्यंत पोचवणारी राष्ट्रीय साखळी निर्माण करणारी निस्वार्थी सेवा देणारी कंपनी तिलोकचंद छाबडा यांनी स्थापन केली आहे. तिचे नांव आहे आर सी एम. आयु. सिद्धार्थ उदेभान हिवराळे,माणिकराव हिवराळे यांच्या आग्रहामुळे भिलवाडा राजस्थान येथे जाण्याची सुवर्ण संधी मिळाली.ते पाहून खूप प्रभावित झालो.माझ्यातील पत्रकार जागा झाला तिलोकचंद छाबडा उर्फ टी सी सर यांना लोकांमध्ये सहज मिसळून राहतांना बोलतांना पाहून खूप आश्चर्य वाटले. एक उद्योगपती साधी राहणी उच्च विचार सरणी सकाळी ६ वाजता थंडीच्या दिवसात गुरुकुल मध्ये जीवन जगण्याचे विचार सांगतो. विचार कसे करावे?. जीवन कसे बदलावे?. ते निस्वार्थी प्रेमातून नव भारत निर्माण करण्याचे स्वप्न पाहत नाही तर साकार करण्यासाठी लाखों लोकांना प्रेरणा देतात.आणि विचार करण्यास भाग पडतात. विचार बदला, जीवन घडवा: निस्वार्थ प्रेमातून नवभारताचे निर्माण करा.प्रत्येकाने ते अंमलात आणले तर शंभर टक्के बदल झाल्याशिवाय राहणार नाही. 

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *