अर्बन कंपनी हि एक ऑनलाईन कंपनी आहे.येथील कामगार पार्टनर म्हणून काम करतात.ग्राहकाने रेटिंग कमी दिले किंवा तक्रार केली की कंपनी आयडी ब्लॉक करून टाकतात.हे कामगार बाईक वरुन प्रवास करतात अपघात झाला तर विमा नसतो. गेल्या पाच वर्षापासुन दर पत्रक वाढलेले नाही,उलट दर पत्रकामध्ये पन्नास टक्के कपात केली आहे.पार्टनर म्हणुन असल्याने कामगार कायदे लागु होत नाही.त्यामुळे कामाचे तास फिक्स नाहीत,सुट्टी नाही,ओव्हर टाईम नाही इतर कोणतेही कामगार कायदे लागु नाही सात आठ वर्षे काम करुन सुद्धा अचानक आयडी बंद होऊन जाते म्हणजेच कामावरून अपमानास्पद काढले जाते.त्याचे म्हणणे मांडण्याचा त्यांना अधीकार नाही.अर्बन कंपनीच्या या अन्याया विरुध्द भांडुपमध्ये सेंटर ऑफ़ इंडियन ट्रेड युनियन (CITU) संलग्न मुंबई श्रमिक संघाचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड हेमकांत सामंत,महाराष्ट्र गीग वर्करयुनियन चे अध्यक्ष कॉम्रेड मनोज यादव व ऑल इंडिया गीग वर्करयुनियन चे अध्यक्ष एडवोकेट सौमित्र भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक १ मार्च रोजी भांडुप येथे सभा घेण्यात आली.सभेत कामगारांनी आपल्यावर होणार्या अन्याया विरुध्द आपले म्हणणे मांडले.व मॅनेजमेंट बरोबर पुढील लढाई लढण्यास आपण तयार आहोत असे सांगितले. एडवोकेट सौमित्र भट्टाचार्य व मनोज यादव यांनी सर्वांनी एकत्र मिळुन हि लढाई लढलो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. ऑल इंडिया लेव्हल वर आपण ही लढाई लढु असे सांगितले तसेच कॉम्रेड हेमकांत सामंत यांनी मिंटीग न घेण्याबाबत भांडुप पोलीस स्टेशन वरुन दबाव येत असल्याचे सांगितले.त्यांना आम्ही योग्य उत्तर दिले असल्याचे सांगितले विक्रोळी पोलीस स्टेशन मध्ये हि मॅनेजमेंट अधिकारी आणि काही कामगार यांच्या समोर चर्चा झाली असे सांगितले.आणि जर तुम्ही एकजुट असाल तर भांडुप सिटु केंद्र नेहमी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.
संदीप राजापूरकर 7400358270 यांस कडून
